आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरNASA चंद्रावर पाठवणार लेडी पुतळे:आर्टेमिस-1 मोहिमेत रेडिएशनचा अभ्यास, मिशनकडे जगाचे डोळे

लेखक: प्रज्ञा भारतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

3 नोव्हेंबर 1957 - लायका नावाची कुत्री अंतराळात जाणारी पहिली प्राणी ठरली होती. सोव्हिएत संघाने तिला पाठवले होते. या मोहिमेदरम्यान लायकाचा मृत्यू झाला.
3 सप्टेंबर 2022 - आता 65 वर्षांनंतर अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा 3 हायटेक मॅनिकिन्स म्हणजेच दोन महिला आणि एक पुरुषाचा पुतळा चांद्र मोहिमेवर पाठवत आहे.
या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया की, NASA मानवाऐवजी पुतळे अंतराळात का पाठवत आहे. हे विशेष का आहे आणि नासा याद्वारे काय माहिती गोळा करू इच्छिते...
NASA मून मिशनवर पुतळे का पाठवत आहे?
अंतराळात किरणोत्सर्ग खूप जास्त असतो. अनेकदा अंतराळवीरांना कर्करोगही होतो. त्यामुळेच चंद्रावर पुन्हा मानवाला पाठवण्याच्या तयारीतीलल अमेरिकेकडून आर्टेमिस-1 मिशनमध्ये मानवाऐवजी पुतळे पाठवले जात आहेत. या पुतळ्यांना मॅनिकिन्स म्हणतात आणि या प्रकारचे खास मॅनिकिन्स वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जातात.
यांचे नाव आहे हेल्गा, जोहर आणि मूनिकिन कॅम्पोस. एकत्रितपणे त्यांना फँटम्स संबोधले जाते. हे पुतळे जर्मनीची एरोस्पेस सेंटर DSR ने बनवले आहेत. मूनिकिन कॅम्पोस नाव असलेला तिसरा पुतळा पुरुषाचा आहे.
NASA चे हे पुतळे मानावासारखेच आहे. मानवाच्या शरिरातील पेशीसारख्या प्लास्टिकपासून ते बनवण्यात आले आहेत. यातही मानवाप्रमाणे हाडे, त्वचा आणि फुफ्फुस असतील.

हेल्गा आणि जोहरसारख्या पुतळ्यांचा वापर करून कँसरवरील उपचारात रेडिएशनच्या योग्य डोसविषयीही माहिती गोळा केली जाऊ शकते.
हेल्गा आणि जोहरसारख्या पुतळ्यांचा वापर करून कँसरवरील उपचारात रेडिएशनच्या योग्य डोसविषयीही माहिती गोळा केली जाऊ शकते.

हेल्गा आणि जोहरची रचना महिलांच्या शरीरासारखी आहे. अंतराळात महिलांच्या शरीरावर किरणोत्सर्गाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ते पाठवले जात आहेत.

तिसरा पुतळा मूनिकिन कॅम्पोस चंद्रावर मानवांना जाणे किती कठिण असू शकते हे तपासण्यासाठी पाठवला जात आहे. अंतराळाविषयीचे आकलन वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगाचा हा एक भाग आहे.

मूनिकिन कैंपोस रॉकेटच्या कमांडर सीटवर असेल.
मूनिकिन कैंपोस रॉकेटच्या कमांडर सीटवर असेल.

हजारो सेन्सर्स किरणोत्सर्गाचा परिणाम मोजणार
मानवाच्या शरीरावर ज्या ठिकाणी किरणोत्सर्गाचा परिणाम जास्त होतो त्या ठिकाणी पुतळ्यावर सेन्सर्स लावण्यात आले आहेत. लॉन्चपासून पृथ्वीवर परत येण्यापर्यंत हे सेन्सर्स मानवाच्या शरीरावर किरणोत्सर्गाच्या संभाव्य परिणामांची नोंद घेईल.

फुफ्फुस, पोट, युटेरस आणि बोन मॅरोसारख्या भागांवर रेडिएशनचा परिणाम बघण्यासाठी सेंसर्स लावण्यात आलेत.
फुफ्फुस, पोट, युटेरस आणि बोन मॅरोसारख्या भागांवर रेडिएशनचा परिणाम बघण्यासाठी सेंसर्स लावण्यात आलेत.

हेल्गा आणि जोहरसाठी ड्रेस कोड
जोहरला रेडिएशनपासून बचावासाठीचा जॅकेट घातला जाईल. या जॅकेटला अॅस्ट्रोरेड नाव देण्यात आले आहे. तर दुसऱ्या हेल्गा पुतळ्याला जॅकेटशिवाय पाठवले जाईल. हे खास जॅकेट अॅस्ट्रोरेड पॉलिइथिलीनपासून बनले आहे. जे जोहरला हानिकारक प्रोटॉन्सपासून वाचवेल. हे त्याचे वरचे शरीर आणि युटेरेस कव्हर करेल.
या मिशनच्या माध्यमातून हेल्गा आणि जोहरवर रेडिएशनच्या परिणामांची तुलना केली जाईल. भविष्यात अंतराळात जाणाऱ्या मानवांना अधिक चांगली सुरक्षा कशी दिली जाईल हे संशोधकांना यातून कळेल.

जोहरला रेडिएशन प्रोटेक्शन जॅकेट घातल्याचे फोटो दिसते. तर तिच्याजवळ असलेल्या हेल्गाला जॅकेट नाही. इस्रायलच्या स्पेस एजन्सीच्या स्टार्टअप कंपनीने हे बनवले आहे.
जोहरला रेडिएशन प्रोटेक्शन जॅकेट घातल्याचे फोटो दिसते. तर तिच्याजवळ असलेल्या हेल्गाला जॅकेट नाही. इस्रायलच्या स्पेस एजन्सीच्या स्टार्टअप कंपनीने हे बनवले आहे.

अंतराळात लेडी पुतळे पाठवण्यावर जोर का?
NASA महिलांचे पुतळे अंतराळात का पाठवत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. हे पुतळे बनवणाऱ्या जर्मनीच्या एअरोस्पेस सेंटरचे मात्रोश्का अॅस्ट्रोरेड रेडिएशन एक्सपेरिमेंटचे प्रमुख वैज्ञानिक थॉमस बर्गर म्हणतात की, 'महिला अंतराळवीरांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच आम्ही महिलांचे पुतळे बनवले. याचे कारण हेही आहे की, सामान्यपणे महिलांच्या शरीरावर रेडिएशनचा जास्त परिणाम होतो.'
नासाच्या टेस्टनुसार महिलांच्या शरीराला अंतराळातील किरणोत्सर्ग झेपत नाही

नासाच्या आर्टेमिस-1 मिशनमधील 30% इंजीनियर्स महिला आहेत.
नासाच्या आर्टेमिस-1 मिशनमधील 30% इंजीनियर्स महिला आहेत.

फळांवर बसणाऱ्या माशाही प्रथमच गेल्या होत्या अंतराळात
20 फेब्रुवारी 1947 रोजी फळांवर घोंगावणाऱ्या माशाही अंतराळात पाठवण्यात आल्या होत्या. एखादा सजीव अंतराळात पाठवण्याची ही पहिली वेळ होती. यानंतर उंदीर, माकड, बेडूक, कुत्रा असे अनेक प्राणी अंतराळात पाठवण्यात आले.

प्रथम अंतराळात पाऊल ठेवणारी कुत्री - लायका.
प्रथम अंतराळात पाऊल ठेवणारी कुत्री - लायका.

मानवाने 1969 मध्ये प्रथम चंद्रावर ठेवले पाऊल
NASA ने जुलै 1969 मध्ये प्रथम अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले होते. 21 जुलै 1969 मध्ये अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले होते.
मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या प्रयत्नात NASA चे मिशन आर्टेमिस-1
आता 53 वर्षांनंतर NASA पुन्हा चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या प्रयत्नांच्या अंतर्गत 3 सप्टेंबर रोजी आपले अंतराळयान ओरियन चंद्रावर पाठवणार आहे. नासाच्या या मोहिमेला आर्टेमिस-1 हे नाव देण्यात आले आहे. हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाही, तर ते चंद्राभोवती फिरेल.

आर्टेमिस-1 अंतराळात 42 दिवस चंद्राभोवती फिरेल.
आर्टेमिस-1 अंतराळात 42 दिवस चंद्राभोवती फिरेल.

यानंतर 2024 मध्ये आर्टेमिस-2 मोहिमेची NASA ची तयारी आहे. यात अंतराळवीर चंद्रावर पाऊल न ठेवता केवळ चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा मारून परत येतील. 2025 मध्ये NASA च्या आर्टेमिस-3 मोहिमेच्या प्रक्षेपणाची शक्यता आहे. यात अंतराळीर चंद्रावर उतरतील.

NASA च्या अपोलो 11 मोहिमेदरम्यान चंद्रावर जाणारा कुत्रा, स्नूपी डॉग खूप प्रसिद्ध झाला होता. अपोलो मोहिमेच्या यशाविषयी लोकांच्या विचारांचे दर्शन यातून होते. चार्ल्स एम स्कूल्टझ यांनी त्यांची कॉमेडी सीरिज पीनटसमध्ये हे कार्टून कॅरेक्टर बनवले होते. त्यांनी ज्या पेनाच्या सहाय्याने ही सीरिज लिहिली होती त्याची निबही आर्टेमिस-1 मधून अंतराळात जाणार आहे.

मुलांच्या मॅगझिनमधील ‘पीनट्स’ कॅरेक्टर स्नूपी डॉगची निबही आर्टेमिस-1 सोबत चंद्रावर जात आहे.
मुलांच्या मॅगझिनमधील ‘पीनट्स’ कॅरेक्टर स्नूपी डॉगची निबही आर्टेमिस-1 सोबत चंद्रावर जात आहे.

यांच्यासह मुलांच्या आवडीचे चार लीगोही चांद्रमोहिमेवर जाणार आहेत. नासा आणि लीगो ग्रुप एकत्रितपणे लहान मुलांना अंतराळाबद्दल सांगण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून काम करत आहे.

नासा आणि लीगो ग्रुप मुलांना आर्टेमिस-1 बद्दल सांगण्यासाठी ऑनलाइन क्लासेस ‘बिल्ड टु लॉन्च’ घेत आहेत.
नासा आणि लीगो ग्रुप मुलांना आर्टेमिस-1 बद्दल सांगण्यासाठी ऑनलाइन क्लासेस ‘बिल्ड टु लॉन्च’ घेत आहेत.

अपोलो 11 मोहिमेचे मेमेंटो आणि इंजिनाचा छोटा तुकडाही चंद्रावर जाणार
नासाच्या अपोलो 11 मोहिमेचा मेमेंटो, चंद्राच्या पृष्ठभागावरून आणलेले छोटे दगड आणि मिशनच्या रॉकेट इंजिनचा एक तुकडाही आर्टेमिस-1 सह चंद्रावर जाणार आहे.

अपोलो 11 मिशनच्या रॉकेटचा हा छोटा नटही आर्टेमिस-1 सोबत चंद्रावर जाणार आहे.
अपोलो 11 मिशनच्या रॉकेटचा हा छोटा नटही आर्टेमिस-1 सोबत चंद्रावर जाणार आहे.

याशिवाय आर्टेमिस-1 मधून वेगवेगळ्या झाडांचे बीसुद्धा चंद्रावर जाणार आहे. नासाने अपोलो 14 मोहिमेदरम्यानही असे बी पाठवले होते. ते परत आणून मून ट्री नावाने लावण्यात आले होते. झाडांवर स्पेस रेडिएशनच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी असे केले जाते. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांचे झेंडे, पिन आणि पॅचही मोहिमेत सोबत असतील. ते पुन्हा परत आणून या देशांना परत केले जातील.

बातम्या आणखी आहेत...