आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यमराठी नॉलेज सिरीज:वाफ घेतल्याने कोरोनात लाभ, मात्र हा रामबाण उपाय नाही; यात छाती मोकळी होण्यास क्षणिक मदत, संसर्ग संपत नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, यामुळे श्वासोच्छ्वास सुधारेल
  • एका सामान्य व्यक्तीसाठी अर्ध्या तासाचा व्यायाम योग्य, मात्र अापल्या प्रकृतीनुसारच व्यायाम निवडा

कोरोना काळात श्वासावर आलेल्या संकटामुळे अखेर श्वास कसा घ्यावा याची जिज्ञासा लोकांमध्ये वाढली आहे. आपला श्वासोच्छ्वास कसा सुधारावा, यासाठी किती व्यायाम करावा अशा प्रश्नांसाठी दैनिक भास्करचे पवनकुमार यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली, त्यातील काही अंश...

डॉ. अरविंद अग्रवाल
सीनियर कन्सल्टंट, इंटर्नल मेडिसिन, श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट

अशात पूर्ण तंदुरुस्त लोकही गंभीर संसर्गाला बळी पडत आहेत. शारीरिक तंदुरुस्ती आजार टाळण्यासाठी कितपत फायदेशीर आहे?
कोविड संसर्ग कुणालाही होऊ शकतो. मात्र, संसर्गानंतर आजाराचे गांभीर्य बऱ्याच प्रमाणात व्यक्तीच्या मूळ आरोग्यावर अवलंबून असते. कोविड संसर्ग केवळ श्वसनप्रणालीवर नव्हे, तर संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे गंभीरपणाचे आकलन आधीच करणे योग्य नाही. तरीही मूळ अारोग्य योग्य ठेवल्यास अनेक आजारांशी लढण्यात त्याचा उपयोग होतो.

जिम बंद आहे. धावणे, सायकलिंगसारखे व्यायाम होत नाहीत. घरातील हलका व्यायाम स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरेसा आहे का?
संसर्गाच्या या टप्प्यात घरातच राहणे आणि व्यायाम करणे दोन्ही खूप आवश्यक आहे. यासाठी योग, स्ट्रेचिंगसारख्या पर्यायांचा घरात कमी जागेतही अवलंब केला जाऊ शकतो. यासोबत श्वासाचा व्यायाम करा. २-३ मिनिटांपर्यंत हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. याचा फुप्फुसाला फायदा होईल. तणाव निवळण्यास मदत मिळेल.

एका व्यक्तीस तंदुरुस्त राहण्यासाठी किती वेळ व्यायाम पुरेसा आहे, याचे काही मापदंड आहेत का?
प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, वय, शारीरिक क्षमता आणि आजार (असेल तर) यानुसार व्यायामाची निवड केली पाहिजे. एखादा लठ्ठपणाने त्रस्त असेल तर त्याने अचानक अवघड व्यायाम केल्यास अडचणी येऊ शकतात. एका सामान्य प्राैढ व्यक्तीने दिवसात कमीत कमी अर्धा तास व्यायामासाठी काढला पाहिजे. ज्येष्ठांसाठीही हलका व्यायाम व स्ट्रेचिंग लाभदायक आहे.

सोशल मीडियानुसार, एक मिनिट श्वास रोखू शकत असाल तर कोरोनाचा धोका कमी आहे, असे सांगितले जाते. हे खरे आहे का?
गाेंधळात टाकणाऱ्या माहितीपासून दूर राहा. केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. श्वासाचे व्यायामाचे श्वसनासाठी निश्चितच लाभदायक आहेत. मात्र, याला केळव श्वास रोखण्याच्या क्षमतेशी जोडणे योग्य नाही.

वाफ घेणे श्वासोच्छ्वास सुधारण्यास किंवा संसर्ग कमी करण्यात फायदेशीर आहे का?
फुप्फुसांच्या अनेक समस्यांमध्ये वाफ घेण्यास सांगितले आहे. नाक चोंदले असले तर आराम मिळतो. दिवसात दोन ते तीन वेळा वाफ घेतल्याने कोविडच्या अनेक रुग्णांना फायदा झाला आहे. मात्र, हा रामबाण उपाय नाही.

बातम्या आणखी आहेत...