आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Steve Jobs Was A Hard Working Boss, A Team Of Smart People And The Ability To Make The Best Product In The World.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओरिजिनल:स्टीव्ह जॉब्ज होते कर्तव्यकठोर बॉस, हुशार लोकांची टीम बनवून जगातील सर्वोत्कृष्ट उत्पादन बनवायच्या कौशल्यामुळेच अॅपल ठरली महान

बिल फर्नांडिस7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज स्टीव्ह जॉब्ज यांची नववी पुण्यतिथी, त्यांचे मित्र अॅपलचे एम्प्लॉई नंबर-१ बिल सांगताहेत स्टीव्ह होण्याचे महत्त्व

मी स्टीव्हला १२ वर्षांच्या वयात सातवीत भेटलो. आम्ही दोघे लाजाळू व मुलांसोबत खेळण्यात संकोच करायचो. यामुळेच आमची मैत्री झाली. त्या वेळी आईने जपानी पद्धतीने घर सजवले होते व स्टीव्हला ते खूप आवडले. जपानी डिझाइनमुळे प्रभावित होऊन कमी जागेत जास्त वस्तू ठेवण्याबाबत स्टीव्हमध्ये आवड निर्माण झाली. पुढे अॅपलच्या डिव्हाइसमध्ये हीच गोष्ट दिसली, जी कंपनीच्या यशाचे मोठे कारण ठरले. आठवीत आम्ही दोघांनी इलेक्ट्रॉनिक प्रकल्पावर काम केले. यानंतर आम्ही दोघे सतत इलेक्ट्रॉनिक्सबाबतच विचार करायचो. आम्ही १९६०-७० च्या दशकात सॅन फ्रान्सिस्को शहरात वाढलो नसतो तर आमची आवड शक्यतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये नसती. आमच्या गल्लीत अभियंत्यांचा भरणा होता. आम्हाला गॅरेजमध्ये काम करण्यासाठी पार्ट््स मिळायचे व समस्या सोडवण्यासाठी मदतही. मला माझ्या हौसेने अभियंता बनवले व जॉब्जला हुशार लोकांची टीम बनवायला आवडायचे. ते उत्साही उद्योजक होते. त्यांनी अभियांत्रिकी कौशल्याचा वापर अनोखी टीम बनवण्यात केला, ज्यात जगातील उत्कृष्ट सेलिंग प्रॉडक्ट बनवण्याची क्षमता हवी. यामुळे आज जॉब्जशिवायही अॅपल जगातील सर्वात महान कंपनी आहे. त्यांना पहिला अभियंता मिळाला वॉज म्हणजे स्टीव्ह वॉज्निएक. वॉज माझा शेजारी होता. वॉजला संगणक तयार करायची आवड होती. त्यावर ते खूप काम करायचे. हा उत्साह जॉब्जला आवडला. दोघे चांगले मित्र झाले. दोघांनी ब्लू बॉक्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने जगभरात मोफत काॅल करणारे डिव्हाइस बनवले. तो हिप्पीज मूव्हमेंटचा काळ होता व जॉब्ज भारतात गेले. यादरम्यान वॉज यांनी मोठ्या पडद्यावर व्हिडिओ गेम खेळण्यासाठी एक सर्किट बनवले. भारतातून परतलेल्या जॉब्ज यांनी पाहिले की, वॉज लाेकांना फुकटात सर्किट देत आहे. जॉब्ज म्हणाले की, आपण या सर्किटला डिव्हाइसमध्ये बदलून विकायला हवे. १९७५ मध्ये जॉब्ज यांनी त्याला डिव्हाइस केले व ७०० डॉलरमध्ये अटारी कंपनी विकली. त्याच वर्षी वॉज यांचे संगणकही तयार झाले व व्हिडिओ गेमच्या सर्किटने कॉम्प्युटरच्या डिझाइनला आणखी तंतोतंत केले. १ एप्रिल १९७६ रोजी दोघांनी अॅपल सुरू केली व मी पहिला कर्मचारी झालो. आम्ही तिघांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. १९७७ मध्ये अॅपल लिस्टेड झाली. रॉड होल्ट अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख झाल्या. कंपनी लिस्टेड झाल्यानंतर मी कर्मचारी क्रमांक- ४ झालो. वॉज पहिला, जॉब्ज दुसरा, रॉड तिसरी. १८ महिन्यांनंतर मी अॅपल सोडून जपानला गेलो. १९८१ मध्ये परतलो व जॉब्जकडे नोकरी मागितली. मला पुन्हा कर्मचारी क्रमांक ४ मिळाला व जॉब्जचा ड्रीम प्रोजेक्ट मॅकिनटॉशचा भाग झालो. जॉब्जसोबत आम्ही भविष्यात जगायचो व जग बदलणाऱ्या प्रकल्पावर काम करायचो. जॉब्ज खूप चांगला मित्र होता, मात्र खूप कडक बॉसही होता. १९८६ मध्ये संचालक मंडळाशी मतभेद झाल्याने जॉब्जनी राजीनामा दिला व नेक्स्ट कंपनी सुरू केली. १९९५ मध्ये जॉब्जची नवी कंपनी पिक्सरचा आयपीओ आला व जॉब्ज अब्जाधीश झाले. १९९७ मध्ये जॉब्ज अॅपलमध्ये परतले व अॅपलला सर्वात महान कंपनी बनवले. - शब्दांकन रितेश शुक्ल.

आज मी अॅपलला लांबून बघताे तेव्हा दिसते की स्टीव्ह जॉब्ज व मी टेक्निकली हुशार होतो. मात्र जॉब्जकडे हुशार लोकांची टीम उभी करायचे कौशल्य होते. ते एक उत्साही उद्योजक होते, ज्याला आपल्या टीममुळे जगातील उत्कृष्ट डिव्हाइस तयार करणे जमायचे.-बिल फर्नांडिस

जॉब्ज स्वत : डेसिग्नेशन ठरवण्याचे स्वातंत्र्य द्यायचे

बिल फर्नांडिस स्टीव्हच्या ड्रीम प्रोजेक्ट मॅकिनटॉशचा भाग होते. मात्र, १९९३ मध्ये अॅपलची स्थिती बिघडल्याने त्यांची नाेकरी गेली. ते सांगतात, जॉब्जसह आम्ही सर्व स्वत:ला कलाकार समजायचो. जसे कलाकार त्यांच्या कलाकृतीवर स्वाक्षरी करतात तसेच मॅकिनटॉशच्या पॅकिंगवर आमच्या स्वाक्षऱ्या असायच्या. जॉब्ज यांनी आम्हाला आमचे डेसिग्नेशन ठरवायचे स्वातंत्र्य दिले होते. माझे होते-मास्टर ऑफ इल्युजन्स.

बातम्या आणखी आहेत...