आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे भावविश्वमी काझी झाले तर जसे काही कयामतच आली होती:पुरुष म्हणाले- घरी राहा, मुले जन्माला घाल; धर्म बायकांना कुठे कळतो?

काझी झुबेदा खातून4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजीत मीठ कमी असेल तर घटस्फोट, डाळीत मीठ जास्त असेल तरी घटस्फोट. एखादी महिला तिच्या आईच्या अंत्यविधीला गेली आणि उशिरा घरी आली, तरी नंतर घटस्फोट झाला. महिलेने स्वत:च्या ताटात मटणाचे दोन तुकडे जास्त ठेवले म्हणून घटस्फोट. मेलवर घटस्फोट, व्हॉट्सअ‍ॅवर घटस्फोट. घटस्फोट देणारा पुरुष आणि मिळवून देणाराही पुरुषच. महिलांना कोणतेही अधिकार नाही, भरपाई नाही. रोज घटस्फोट, घटस्फोट, घटस्फोट. मी कंटाळले होते.

तिहेरी तलाकच्या बहाण्याने काझींनी महिलांची अवस्था भिकाऱ्यासारखी केली होती. त्यांना ना मुलीचे वय दिसत, ना मुलाचे वय. घटस्फोट हा विनोद असल्यासारखे वाटत होते. मी म्हणाले आता पुरे झाले. आम्ही सरकारकडे हक्क मागणार नाही आणि काझींकडे देखील जाणार नाही. स्वतःची लढाई स्वत:च लढणार. महिलांना काझी बनवूयात. कुराण आणि राज्यघटना त्यासाठी परवानगी देते.

इथूनच माझा काझी होण्याचा प्रवास सुरू झाला. 2016 मध्ये, 15 महिलांनी माझ्यासोबत जयपूरमध्ये काझी होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. 3 महिन्यांनी आम्ही काझी झालो.

मग काय, काझींच्या मोठा संताप झाला. जणू काही मोठे संकट आले होते. ते म्हणू लागले - तुम्ही स्त्रीया आहात, तुम्हाला अर्थ कळत नाही. घरी राहा आणि मुले जन्माला घाला. तुम्ही लोकांसमोर स्टेजवर लग्न कसे करू शकता? लोकांसमोर तोंड उघडणार का?

जे कधीच घडले नाही ते आता देखील होणार नाही. तुम्ही स्त्रिया कोणत्याही परिस्थितीत लग्न लावू शकत नाहीत, पण मीही ठरवले होते की जे आधी घडले नाही ते आता होत राहील.

सध्या कोलकाता आणि मुंबईत 2 विवाह झाले आहेत, जे महिला काझींनी केले आहेत. मुलींचा हट्ट असा होता की, महिला काझीकडूनच लग्न लावले जावे. मात्र, हे सर्व सहजच घडलेले नाही. यासाठी प्रदीर्घ लढा लढला गेला. आम्ही बरेच काही गमावले आहे.

हे तीन वर्षांपूर्वीचे छायाचित्र आहे. मुंबईत एका मुलीचा विवाह महिला काझीकडून लावून घेतला जात आहे.
हे तीन वर्षांपूर्वीचे छायाचित्र आहे. मुंबईत एका मुलीचा विवाह महिला काझीकडून लावून घेतला जात आहे.

आता मी तुम्हाला माझ्या कथेत थोडे मागे म्हणजे त्या आधीच्या काळात नेईल.

माझे नाव काझी झुबेदा खातून असे आहे. मुंबईतील भेंडी बाजार येथे जन्म आणि लहानाची मोठी झाले. मी 10 वर्षांची असताना माझ्या आईचे निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले. आम्ही नऊ भावंड होतो आणि मी सर्वात मोठी होते. सावत्र आई फारशी चांगली नव्हती, पण तिच्याबद्दल मला विशेष काही सांगायचे नाही. ती जशी होती तशीच बरी होती.

मी 16 वर्षांची असताना शेजारच्या मुलाच्या प्रेमात पडले. तेव्हा माझी एंगेजमेंट झाली होती, पण मी माझ्या प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम होते. घरच्यांनी खूप समजावलं की, मुलगा काही कामाचा नाही, कमावत नाही, आयुष्यभर पश्चाताप करशील, पण मी कोणाचं ऐकलं नाही. प्रेमाचे भूत माझ्यावर स्वार झाले होते.

घर सोडले आणि एकट्या मुलाशी लग्न केले. मुलाचे संपूर्ण कुटुंब निकाहमध्ये सहभागी झाले होते. माझ्या बाजूने फक्त माझी बहीण उपस्थित राहू शकली.

कुटुंबीयांचा प्रेमविवाहाला विरोध होता. मी एका उच्चभ्रू कुटुंबात लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती, पण मला माझे प्रेम मोडायचे नव्हते.
कुटुंबीयांचा प्रेमविवाहाला विरोध होता. मी एका उच्चभ्रू कुटुंबात लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती, पण मला माझे प्रेम मोडायचे नव्हते.

इतर मुलींप्रमाणे माझीही खूप स्वप्ने होती, पण माझ्या सासरच्या घरी पहिल्याच दिवसापासून माझी स्वप्ने भंग होवू लागली. ऐकायला कुणी नव्हतं, माझ्याशी बोलायला कुणी नव्हतं. काही दिवसांनी अब्बू बरोबर होते, असे वाटले.

निदान पुरेसे अन्न तरी मिळायला हवे होते. सासरच्या घरी खायला चपाती आणि थोडी भाजी मिळाली तर तुमच्यावर कोणी उपकार केल्याचे जाणवत होते. एका छोट्या खोलीत 6 लोक राहत होते. अधूनमधून पतीकडे पैसे मागितले तर तो साफ नकार देत असे. तिथे मला प्रत्येक वस्तूसाठी म्हणजे धान्यासाठी, कपड्यांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी तरसावे लागले. हळुहळू मी ते माझे नशीब म्हणून स्वीकारले. वाटले होते, जसे-तसे करुन दिवस निघून जातील.

मात्र, तसे झाले नाही. मी कुठेही फिरायला घराबाहेर पडले की, शेजारी कशी आहेस, अशी विचारपूस करायचे. एवढे विचारल्यावरच नवरा सर्वांसमोर मारहाण करायचा. आता हे सहन होणार नाही, असं वाटलं.

अखेरीस एके दिवशी हताश होऊन मी अब्बूच्या घरी गेले. ते घरी नव्हते. सावत्र आई म्हणू लागली की आमच्या घरी येऊ नको. तुला एक लहान बहीण पण आहे. तु घरी आली तर तीच्याशी कोणी लग्न करणार नाही. त्यानंतर मी कधीच माझ्या घरी गेले नाही.

दरम्यान, मी गरोदर राहिली, पण जेवण न मिळाल्याने मला खूप भूक लागत होती. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. सगळी दुकाने बंद होती, रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते. दुकानांमध्येही पाणी शिरले होते. रेशन दुकानातून डाळ, तांदूळ यांसारख्या वस्तू रस्त्यावर वाहत असल्याचे पाहिले. मग काय, मी रस्त्यावर उतरून डाळ-तांदूळ उचलू लागले. अशे माझे हाल होते.

काय करावे, कोणाला सांगावे, कोणाकडे जावे हेच कळत नव्हते.

दरम्यान माझ्या मुलचा जन्म झाला, पण हा आनंदही फार काळ टिकला नाही. सहा महिन्यांनी त्याला कावीळ झाला. पैशांअभावी त्याला उपचार मिळू शकले नाहीत आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मी वेडी झाले होते. दिवसभर दर्ग्यावर बसून रडायचे. मला अब्बूबद्दल थोडी आपुलकी होती, म्हणून मी कधी कधी त्यांच्याकडे भेटायला जायचे.

एके दिवशी अब्बू काही लोकांसह वांद्रे बँड स्टँडवरील जत्रेला जायला निघाले होते. मीही त्यांच्या सोबत निघाले. आमच्यासोबत काही शेजारी देखील होते. आम्ही सर्वांनी चर्चबाहेरही फोटो काढले. मी तो फोटो नवऱ्याला दाखवला, तेव्हा त्याने मला रात्रभर मारहाण केली. तु फोटो का काढला म्हणून तो मला मारत होता. मी रात्रभर ओरडत राहिली, विनवणी करत राहिली, पण तो मारत राहिला.

सकाळ झाल्यावर मी ठरवले की, मी आता येथे राहणार नाही आणि घरातून निघून जाईल. आणि मी घरातून पळून गेले. दुसरीकडे नवरा माझ्या मागे चाकू घेऊन लागला होता. त्याच्या डोक्यात भूत घुसले होते, त्याला माझा खुन करायचा होता. भेंडी बाजारात मी इकडे तिकडे रस्त्यावर जीव वाचवत फिरत होते. पण कुठलाच मार्ग दिसत नव्हता.

यानंतर मी पोलिस ठाण्यात पोहोचले. माझ्या नवऱ्याला मला मारायचे असल्याचे पोलिसांना सांगितले, पण मतद मिळाली नाही. अखेरीस मी वडिलांचा एक मित्र, महताब काझी यांच्याकडे गेले. त्यांना सांगितले की, मला घटस्फोट हवा आहे, मला घटस्फोट मिळवून द्या. त्यांनी माझ्या पतीला बोलावून घटस्फोट मिळवून दिला. त्यानंतर मी अब्बूसोबत आमच्या घरी परत आले.

येथे सावत्र आईने घरात भांडणे सुरू केले. ती अब्बूला सांगू लागली की झुबेदा इथेच राहिली तर मी विष खाईन. अब्बू काळजीत पडले. त्यांनी मला माझ्या बहिणीच्या घरी सोडले. 20-25 दिवस तिथे राहिले. आमचे एक शेजारी अब्दुल गफूर शेख होते. मी त्यांच्याबरोबर जत्रेला गेले होते. त्यांची बायको वारल्यावर अब्बूने माझे त्यांच्याशी लग्न लावून दिले.

तो एक चांगला माणूस होता. त्याच्यासोबत आयुष्य छान चालू होतं. एके दिवशी माझ्या नंदेचा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला की, अब्बूने अम्मीला पाण्याच्या पाईपने खूप मारले आहे. हे ऐकून मी त्यांच्या घरी गेले. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तीच्या सोबत दादरच्या सैतान पोलिस चौकीत गेले.

मी पहिल्यांदाच पोलिस चौकीत दुसऱ्या महिलेसाठी गेले होते. मी नंदेच्या नवऱ्याला तुरुंगात पाठवले आणि तिथे त्यालाही मारहाण झाली. त्याच दिवशी मी ठरवले की आता मी अशा महिलांना मदत करेन. त्या दिवसानंतर मी मागे वळून पाहिले नाही. माझ्याकडे पैसे नव्हते, परंतु माझ्या स्वत: च्या जखमा होत्या, ज्या मी कायम ताज्या ठेवल्या होत्या.

इथून माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली. तिहेरी तलाक कायदा बनण्याआधीची गोष्ट आहे. माझ्याकडे घटस्फोटाची प्रकरणे असायची. अनेक प्रकरणांमध्ये घटस्फोटाचे कारण असे होते की, माझ्या पायाखालची जमीनही सरकत होती. एकदा काझीने बँकेतील पैसे असलेल्या एका फॉर्मवर एका महिलेला तलकनामा पाठवला, तेव्हा त्या पाकिटाच्या बाहेर बँकेचा पत्ताही लिहिला होता.

महिलेला वाटले की तिच्या पतीने तिला चेक पाठवला आहे, तर तो तलकनामा होता. त्यावर तीने सही केली आणि घटस्फोट घेतला. ती रडत रडत माझ्याकडे आली. मी काझीकडे गेले आणि त्यांच्याशी खूप भांडले. कसे तरी, महिलेला 75,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली.

रोज स्त्रिया काही ना काही समस्या घेऊन माझ्याकडे येत असतात. मी त्यांना प्रत्येक पातळीवर मदत करण्याचा प्रयत्न करते.
रोज स्त्रिया काही ना काही समस्या घेऊन माझ्याकडे येत असतात. मी त्यांना प्रत्येक पातळीवर मदत करण्याचा प्रयत्न करते.

आणखी एक गोष्ट होती, मी महिलांच्या हक्कासाठी लढत होते, पण निर्णय फक्त काझी पुरुषच घेत होते. ही लढत अपूर्ण राहत असल्याचे मला वाटले. यानंतरच मी काझी होण्याचा निर्णय घेतला, परंतु पुरुष काझींनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक व्यासपीठावरून ते आमच्या विरोधात बोलू लागले. प्रसारमाध्यमांद्वारे प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धमक्याही दिल्या.

एवढं होऊनही आम्ही मागे हटलो नाही, तेव्हा त्यांनी आमच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मुलांना भडकवायला सुरुवात केली. याचा परिणाम मुलांवरही झाला आणि मी या विषयावर त्यांच्याशी वाद घातला.

माझा मोठा मुलगा माझ्याशी दोन दिवस सतत भांडत होता. मग मी रागाने त्याला माझी गोष्ट सांगितली. मी ज्या गोष्टीतून गेले ते सर्व सांगितले. त्यानंतर माझा मुलगा मला काहीच बोलला नाही. आणि त्याने नेहमीच मला पाठिंबा दिला.

तसेच आम्ही हाजी अली मध्ये महिलांना प्रवेश नसल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आम्हाला टार्गेट करण्यात आले. इतकेच नाही तर न्यायालयातही आमचा अपमान करण्यात आला. अधिकारी, समाजातील लोक, कोणीही आम्हाला साथ दिली नाही. महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वांनी तोंडात दह्याची गुळणी धरली.

आता एक चांगले झाले की लोक मला साथ देत आहेत. माझ्या मोहिमेत सामील होत आहेत. अनेक पुरुषही माझ्या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत.
आता एक चांगले झाले की लोक मला साथ देत आहेत. माझ्या मोहिमेत सामील होत आहेत. अनेक पुरुषही माझ्या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत.

मला आठवतंय जेव्हा नूरजहाँ साफिया आणि मी हाजी अलीच्या प्रतिनिधीशी बोलत होतो, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला की, ‘तुम्ही तर माझ्याशी बोलायला देखील नको. घराच्या बाहेरही पडयला नको होते. तुम्ही हिजाब न घालता घरातून बाहेर पडला आणि माझ्याशी बोलत देखील आहात. काही लाज वाटते की नाही.’

चर्चेचा मार्ग बंद करण्यात आल्याचे दिसल्यावर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो. तेथे दर्ग्याच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ‘महिलांना मासिक पाळी येते, त्यांच्या रक्ताने भिजलेले पॅड त्यांच्या पायावर इकडे तिकडे पडलेले असतात. स्त्रियांची सावली देखील चांगली नसते.’ एवढे करूनही आम्ही केवळ मुंबई उच्च न्यायालयात जिंकलो नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जिंकलो.

काझी झुबेदा खातून यांनी या सर्व गोष्टी दिव्य मराठी नेटवर्कच्या रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...