आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे भावविश्वप्रेमविवाह केल्याने वडील म्हणाले - 'नाक कापलेस':सासरी रोज 400 पोळ्या लाटल्या, नर्सची नोकरीही केली; आता महापौर

किशोरी पेडणेकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी किशोरी पेडणेकर, वरळी नाका, मुंबईची रहिवासी आहे. वडील गिरणी कामगार होते. आई घरकाम करायची. एका छोट्याशा घरात आम्ही 20 लोक राहत होतो. दहावी पूर्ण होताच मी माझ्या वर्गमित्रासोबत घरातून पळून जाऊन लग्न केले.

माझे पालक 12 वर्षे माझ्याशी बोलत नव्हते. मी त्यांच्या इज्जतीशी खेळले, मी मराठा आणि पती ओबीसी असल्याने तु अमाचे नाक कापले, असे ते म्हणत होते.

मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आधी प्रेमविवाह, नंतर नर्सची नोकरी, नंतर राजकारणात आले.

मला अजूनही आठवतं, माझ्या लहानपणी आजूबाजूचे लोक संध्याकाळच्या चहा-नाश्त्यात बिस्किटे किंवा नमकीन खात असत. रस्त्यावरून जाताना माझे लक्ष्य त्यावर गेले की, माझ्याही तोंडाला पाणी सुटायचे. मात्र, आई आम्हाला चहासोबत शिळ्या पोळ्या देत असे.

त्यावेळी काही मुलांकडे लाल निळ्या रंगाच्या लांबलचक छत्र्या असायच्या आणि आम्ही पावसात प्लास्टिकची पन्नी घालून शाळेत जायचो. मला नेहमी वाटायचं की, आपलीही अशी छत्री असती तर. वडील म्हणायचे की, पुस्तके सुद्धा प्लास्टिकमध्ये गुंडाळून घे. मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे मी शाळेत जाणे टाळायची.

मी अभ्यासात फार हुशार नव्हते, पण नापास झाले नाही. दहावीत गेल्यावर माझे एका मुलावर प्रेम जडले. तो सुद्धा दहावीत होता आणि तो ओबीसी समाजाचा होता. वास्तविक तेव्हा मला त्याची जात माहीती नव्हती.

10 वी झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला कळाले की, तो मुलगा ओबीसी आहे. घरातील सदस्य कोणत्याही परिस्थितीत हे लग्न मान्य करणार नाहीत हे मला माहीत होते. त्या काळी ओबीसीशी लग्न करणे म्हणजे आज जसे हिंदू-मुस्लिम विवाहाचा मुद्दा होतो, तसाच प्रकार होता.

घरातून पळून जाऊन लग्न करायचं असं आम्ही ठरवलं. मी घरातून पळून जाऊन माझ्या वर्गात शिकणाऱ्या एका ओबीसी मुलाशी लग्न करत असल्याचे मोठ्या बहिणीला सांगितले. यावर बहिणीने मला खूप खडसावले आणि समजावले पण मी तीचे ऐकले नाही.

मी माझ्या बहिणीला सांगितले की, मी प्रेमात पडले तेव्हा त्याची जात विचारली नाही. मला माहित आहे की, माझा नवरा मला आनंदी ठेवेल. माझ्यासाठी ते पुरेसे आहे. असे बोलून मी बहिणीला गप्प केले.

मी घरातून पळून आले आणि आम्ही दोघांनी लग्न केले. त्यावेळी मी 17 वर्षांची होते. माझ्या सासूबाईंचे खूप पूर्वीच निधन झाले होते. माझे पती आणि ननंद यांचा सांभाळ त्यांच्या नानीने म्हणजेच आजीने केला होता. त्या वेळी सासरी मेस चालवली जात होती. घरी दररोज 25 डब्बावाल्यांच्या 300 ते 400 पोळ्या बनवल्या जात होत्या. त्या बदल्यात ते आम्हाला पैसे द्यायचे.

लग्नानंतर पोळ्या बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. रोज 400 पोळ्या लाटाव्या लागत होत्या, आणि हे काम खूप अवघड होतं. पण नातं जपायचं असेल तर सगळं मनापासून स्वीकारावं लागतं हे मला माहीत होते. मी काही नाही म्हणू शकत नव्हते, कारण लग्नाचा निर्णय माझा होता.

वास्तविक माझी आजी सासू खूप चांगली होती. ती नेहमी म्हणायची की, दुसऱ्याच्या घरची मुलगी आपल्या घरी आली आणि हळूहळू सर्व शिकली. लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लागली. त्याला सहा हजार रुपये पगार मिळायचा. आमच्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब होती, पण हे पैसे माझी हौस पूर्ण करण्यासाठी पुरेसे नव्हते.

जेव्हा मी इतर महिलांना सुंदर साड्यांमध्ये पाहायचे तेव्हा मलाही तीच साडी नेसावी वाटत होती. दादरमध्ये रस्त्याच्या कडेला बसणाऱ्यांकडून मी 100 रुपयांना तीन साड्या खरेदी करायचे. यात माझे एक वर्ष सहज निघून जायचे. आजही मी 200 रुपयांची साडी नेसते आणि 10 हजारांची सुद्धा नेसते.

तेव्हा माझ्याकडे सोन्याचे दागिने नव्हते म्हणून मी खोटे दागिने घालून माझी हौस पूर्ण करायचे. एकदा बनावट दागिने घातल्याने शरीरावर पुरळ आणि अ‍ॅलर्जी झाली. औषधी आणि उपचारांवर खूप पैसा खर्च झाला. त्या दिवसानंतर मी बनावट दागिने घालणे बंद केले.

त्यानंतर मला मुलगी झाली. तीची काळजी घेण्याबरोबरच कामही सुरू ठेवले. ती अडीच वर्षांची झाल्यावर मलाही वाटले की, मीही काहीतरी काम करावे. जेणेकरून मी तीच्या गरजा पूर्ण करू शकेन. त्यानंतर मी नर्सिंगचा कोर्स केला. यामागचे कारण म्हणजे त्यासाठी फी जास्त नव्हती आणि लवकरच नोकरीची संधी मिळत होती.

अडीच वर्षांचा कोर्स केल्यानंतर वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची नोकरी केली. त्यानंतर जेएनपीटी रुग्णालयात कामाला सुरुवात केली. मला आठवतं की, आमचा एक वॉर्ड बॉय होता तेव्हा चंदू नावाचा.

एके दिवशी आम्ही सर्वांनी सोबत जेवण केले, चहा प्यायलो. चंदूची ड्युटी ऑपरेशन थिएटरमध्ये असायची. त्या दिवशी त्याने ऑपरेशन थिएटरमध्येच विषारी इंजेक्शन घेवून आत्महत्या केली. अनेक दिवस या धक्क्यातून मी सावरू शकले नाही. रोज त्याच्यासोबत उठायचे, बसायचे, जेवायचे, चहा प्यायचे. एक परिचारिका म्हणून ही घटना आजही मला घाबरवते.

त्या दिवसांत मुंबईत गिरणी कामगार आणि गिरणी व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू होता. माझे वडील गिरणी कामगार असल्याने मला याची जाणीव होती. गिरण्यांच्या माध्यमातून राज्याचे राजकारण माझ्यात रुजले. मी लहानपणापासून बाळासाहेबांचे विचार ऐकत होतो. वयाच्या 12व्या वर्षापासून मी राजकीयदृष्ट्या जागरूक झाले होते.

दरम्यान, माझी ओखळ गिरणी कामगारांच्या नेत्या मंदाकिनी चौहान यांच्याशी झाली. गिरणी कामगारांच्या बाजूने त्या लढत होत्या. मीही त्याच्यासोबत गिरण्यांमध्ये जाऊ लागले, आंदोलनांना जाऊ लागले.

त्या पाच फूट पाच इंच उंची असलेल्या मराठा महिला होत्या. त्याचा रंग कापसापेक्षाही गोरा होता, नऊवारी घालायच्या. त्या माईकवर बोलायला लागल्या तर मुंबईही हादरत होती. त्यांना ऐकण्यासाठी लांबून लोक येत असत.

त्या टेबलावर उभ्या राहून भाषणे देत असे. त्यांच्या टेबलाजवळ उभे राहून टेबल पकडून ठेवणे हे माझे काम होते. त्यांना भाषण देताना मी पाहत होते. घरी आल्यावर त्यांच्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करत असे.

2002 मध्ये नोकरी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, नोकरी सोडल्यामुळे घरात पैशाची अडचण निर्माण झाली होती. यानंतर पती अतिरिक्त काम करू लागले. जो काही मोकळा वेळ असेल ते टॅक्सी चालवायला जायचे. अशा प्रकारे आम्ही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकप्रकारे सांभाळली होती.

माझी उंची खूप कमी होती. लोक मला बुटकी-फुटकी म्हणायचे, पण राजकारणात आल्यानंतर मी ठरवले, इतके मोठे काम करायचे की, माझ्या उंचीपेक्षा माझ्या कामाची उंची जास्त असली पाहिजे.

2002 मध्ये मला नगरसेवक करण्यात आले. त्यानंतर सोबतचा ताफा वाढतच गेला. महिलांचे प्रश्न ऐकून सोडवायला सुरुवात केली. नव्वदच्या दशकाचा तो काळ असा होता की, लग्नानंतर लोक स्त्रियांना रस्त्यावर सोडायचे. अशा अनेक महिला माझ्याकडे येऊ लागल्या.

अनुराधा नावाची एक तेलुगु मुलगी होती. ती रडत माझ्याकडे आली. तिच्या नवऱ्याने तिला विनाकारण सोडून दिले होते. मी तिच्या पतीशी बोलले, तेव्हा त्याने मला सांगितले की, कारण असे काही नाही, फक्त ती मला आवडत नाही. मी म्हणाले की, ती आवडत नाही हे रस्त्यावर सोडून देण्याचे कारण असू शकत नाही.

एके दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये त्या मुलीशी बोलत होते. त्याच वेळी तीच्या नवऱ्याने मला मारायला दहा गुंड पाठवले. त्यावेळी माझ्या कार्यालयात आणखी तीन महिला कर्मचारी होत्या. गुंडांना वाटले की स्त्रिया आहेत, त्या घाबरतील, पण त्या दहा गुंडांना आम्हा तिघींनी केलेली मारहाण त्यांना अजूनही आठवत असेल.

ज्या महिलांनी राजकारणात कोणत्याही प्रकारची तडजोड केली, त्या जागेवरच राहिल्या, पण माझ्यासारख्या स्त्रिया कुणी रुळावरून उतरताना दिसताच चंडीचे रुप घेतात. मी कोणावरही अत्याचार होताना पाहू शकत नाही.

एकदा मी विरोधी पक्षाच्या एका नेत्याच्या गाडीवर फटाके फेकले. त्यांची कार जळाली. आयुष्य अशा असंख्य कथांनी भरलेले आहे. माझ्यात एकच ताकद होती की, मला कधीही भीती वाटली नाही.

राजकारणात अनेक पुरुषांनी मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, अपमानही केला, पण मी 2C नियम कधीच सोडला नाही. म्हणजेच भ्रष्टाचार किंवा चारित्र्याशी तडजोड केली नाही. या दोन पंखांनी महिला लांब उड्डाण करतात. मी नगर सेविकेतून महापौर आणि आता तीन विधानसभांची उपनेता झाले आहे. उपनेतेपदी विराजमान झालेली मी शिवसेनेतील पहिली महिला आहे.

कोविडचा काळ माझ्यासाठी फारसा चांगला नव्हता. रुग्णालयांमध्ये नर्सेस आणि डॉक्टरांची कमतरता होती. अशा परिस्थितीत मी माझी जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार केला आणि पुन्हा नर्सचा ड्रेस घातला. माझ्या परिसरातील सर्व रुग्णालयातील लोकांना सांगितले की, मला गरज असेल तेव्हा फोन करा.

मी दिवसा माझ्या वॉर्डात काम करायचे आणि नंतर नर्सचा गणवेश पर्समध्ये ठेवायचे आणि नगरसेविकेची भूमीका पार पाडत होते. मला कुठेही फोन यायचे, दिवसा किंवा रात्रीची पर्वा न करता मी कामावर निघून जायचे. अनेकवेळा असे घडले की, मी तीन दिवस झोपले नाही.

माझ्यासाठी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, माझ्या भावाला कोविड झाला होता. तो स्वतः चालत दवाखान्यात गेला. मी त्याच ICU मध्ये होते, जिथे त्याला दाखल केले होते, पण मी त्याला रोज मरताना पाहिलं. मी त्याला वाचवू शकले नाही.

या सर्व गोष्टी किशोरी पेडणेकर यांनी दिव्य मराठी नेटवर्कच्या रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्याशी शेअर केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...