आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Story Of War In Galvan 'Chinese Soldiers Used To Tell Us The Song' Tan Dole Mera Mana Dole 'on Loudspeakers, Then Say Winter Is Coming, Leave The Post, This Land Is Neither Ours Nor Yours

ग्राउंड रिपोर्ट 5:1962 मध्ये एलएसीवर चिनी लाउडस्पीकरवर ऐकवायचे ‘तन डोले...’ म्हणायचे- हिवाळा येतोय, मागे सरका आम्ही पण निघून जाऊ

लेह2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1962 च्या भारत-चीन संघर्षातील कॅप्टन ताशींनी सांगितले रोचक किस्से

उपमिता वाजपेयी

लेह शहरापासून 15 किमी अंतरावर वसलेल्या स्टोक गावात राहतात ऑनररी कॅप्टन फुन्शुक ताशी. 1962 च्या भारत चीन युद्धावेळी गलवान घाटीत ते तैनात होते. कॅप्टन ताशींचे वय आता 84 वर्षे आहे. ताशी सांगतात, की एक दिवस त्यांना आदेश मिळाला होता, की संपूर्ण युनिटसह त्यांना दौलत बेग ओल्डी आणि गलवानच्या दिशेने रवाना व्हायचे आहे. ते आपल्या युनिटला सोबत घेऊन पायीच लेहपासून दौलत बेगल ओल्टी आणि गलवानपर्यंत पोहोचले होते. 250 किमीचा प्रवास त्यांनी पायी केला. कॅप्टन ताशी सांगतात, त्यावेळी अन्न आणि पाणी नेण्यासाठी घोडे तसेच याक होते. पण, शस्त्रास्त्र आम्हाला आपल्या खांद्यावर न्याव्या लागायच्या.

कॅप्टन ताशी लष्कराच्या 14 जेएंडके मिलिशियामध्ये भरती झाले होते. युद्धाच्या वेळी ते अल्फा कंपनीचा भाग होते. ताशी म्हणाले, "आम्ही गलवान पर्यंत आणि त्यानंतर एलएसीपर्यंत पोहोचलो. त्या पलिकडे चीनचे सैनिक सुद्धा आले होते. दोघांनीही आप-आपले बंकर तयार ठेवले होते. दो ते तीन महिने त्याच ठिकाणी बसलो. डम्पिंग झोनमध्ये अन्न यायचे. हेलिकॉप्टर जीवनावश्यक वस्तू टाकायचे आणि याक किंवा खेचरांवरून आमच्यापर्यंत पोहोचवले जात होते."

चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये त्यावेळी काय चालायचे याची आठवण येताच कॅप्टन ताशी गालातल्या गालात हसतात. ते म्हणाले, "चिनी सैनिक लाउडस्पीकरवर आम्हाला गाणी ऐकवायचे. 'तन डोले मेरा मन डोले' हे गाणे ते लावत होते. गाणी ऐकून आमचे लक्ष त्यांच्याकडे जात होते. हे पाहताक्षणी चिनी म्हणायचे, हिवाळा येत आहे. मागे सरका. आम्ही सुद्धा निघून जाऊ. असेही हा भूखंड न तुमचा आहे न आमचा आहे." ते पुढे म्हणाले, चीनची पोस्ट उंचीवर होती आणि आमची खाली. तरीही ज्या ठिकाणावरून आम्ही पाणी आणत होतो ते ठिकाण एकच होते. जेव्हा चिनी सैनिक पाणी घेऊन वर जायचे तेव्हा आम्ही त्या ठिकाणी पाणी घ्यायला जात होते. असेच एक-एक करून भारतीय आणि चिनी सैनिक एकाच ठिकाणचे पाणी घेत होते.

गलवानवरून परत येण्याचा किस्सा सुद्धा ताशी यांनी सांगितला. ते म्हणाले, "आम्हाला आदेश मिळाले होते की आता पोस्ट सोडा. आंधार पडताच आम्ही तयारीला लागलो. रलाना झालो तेव्हा 2-3 जण मागे राहिले. उरलेले साहित्य नष्ट करण्यासाठी ते थांबले होते. त्या साहित्यावर रॉकेल टाकून आग लावली आणि तेथून सगळेच निघालो.

तो भाग चीनच्या तावडीत जाणार होता. त्यामुळेच आम्ही आमची साहित्ये नष्ट केली. त्या ठिकाणी केवळ एक खोरे होते. ते खोरे बंद केल्यास आम्हाला चिनी सैनिकांनी पकडले असते. आम्हाला पोस्टवर पकडण्याचीच चिनी सैनिकांची तयारी होती. यानंतर हळू-हळू आम्ही निघून गेलो. यानंतर कधीच गलवानला गेलो नाही.

ताशी म्हणाले, "गलवान दोन्ही ठिकाणी सपाट आहे. मध्यभागी एक खोरे आहे. या खोऱ्यातच खोल दरी आहे. या खोऱ्यात चीनच्या दिशेने पाणी येत असते. नाला खूप मोठा नाही पण उन्हाळ्यात पाणी असते आणि थंडीमध्ये बर्फ होते."

कॅप्टन ताशी 1988 मध्ये निवृत्त झाले होते. तेव्हापासूनच ते स्टोक गावात राहतात. गलवानमध्ये त्यांनी ज्यांच्यासोबत मिळूव चिनी सैनिकांचा सामना केला ते सैनिक सुद्धा याच आणि जवळपासच्या गावात राहतात. युद्ध झाल्यास दोन्ही देशांच्या सैनिकांना खूप नुकसान होईल असे ताशी म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...