आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Success In The Search For Geeta's Relatives Who Went To Pakistan By Train At The Age Of Eighth Year?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पाकिस्तानातून आलेल्या मूकबधिर गीताचे जिंतूरशी नाते; तिने केलेल्या वर्णनानुसार मंदिर-नदी आढळली, जन्मखूणही पटली

महेश जोशी | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल साडीतील महिला मीना वाघमारे-पांढरे गीताची आई असल्याचा दावा करत आहेत. - Divya Marathi
लाल साडीतील महिला मीना वाघमारे-पांढरे गीताची आई असल्याचा दावा करत आहेत.
  • आठव्या वर्षी रेल्वेने पाकमध्ये गेलेल्या गीताच्या नातेवाइकांचा शोध घेण्याच्या मोहिमेला यश?

पाकिस्तानातून भारतात परतलेल्या मूकबधिर गीताचे कुटुंबीय शोधण्याच्या मोहिमेत तिचे नाते मराठवाड्यातील जिंतूरशी असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील एका कुटुंबाने गीताचे आपण पालक असल्याचा दावा केला होता. त्यानुसार गीताच्या बालपणीचे संदर्भही आता जुळू लागले आहेत. गीता सांगते तसे देवीचे मंदिर आणि नदी येथे आहे. तिच्या शरीरावरील जन्मखूणही पटली आहे. आता डीएनए चाचणीनंतर निर्णय घेतला जाईल.

डीएनए चाचणीनंतर निर्णय :

ज्ञानेंद्र पुरोहित म्हणाले, वाघमारे कुटुंबीयांतील सदस्यांची डीएनए चाचणी करून ते गीताच्या डीएनएशी जुळवले जातील. यानंतर कुटुंबाकडे सोपवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. हे करतानाच गीता पुन्हा परभणी मुक्कामी येत असून पहल फाउंडेशनचे अनिकेत शेलगावकर, रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक संतोषकुमार सोमाणी हे गीताच्या गावाचा शोध घेणार आहेत.

ते मंदिर अन् बेलफुले... :

जिंतूरच्या मीना वाघमारे-पांढरे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. वाघमारे कुटुंबीय जिंतूरच्या तुळजाभवानी मंदिराबाहेर बेलफुले विकायचे. गीता ८ वर्षांची असताना बसमध्ये बसून परभणीला आणि तेथून सचखंड रेल्वेने अमृतसर तसेच पुढे लाहोरला गेल्याचा मीना यांचा दावा आहे. मुलीच्या शरीरावर जळाल्याची खूण असल्याचे मीना सांगतात. तशीच खूण गीताच्या शरीरावरही आहे. मीना यांचे पती सुधाकर वाघमारे यांचे निधन झाल्यावर त्यांनी दिनकर पांढरे यांच्याशी विवाह केला. आता त्या औरंगाबादच्या वाळूज-पंढरपूर येथे राहतात. गीता येत असल्याचे समजल्यावर त्या जिंतूरला तिला भेटण्यासाठी आल्या होत्या. गीता मात्र वाघमारे कुटुंबीयांना ओळखण्यास नकार देत आहे.

मंदिरात बहिणी विकायच्या बेल-फुले :

मीना वाघमारे यांच्यासोबत त्यांची मुलगी बसंती वाघमारेही (लग्नानंतर पूजा बनसोडे) जिंतुरात आल्या होत्या. बसंती गीतापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत. “दिव्य मराठी’शी बोलताना त्या म्हणाल्या, “गीता आणि मी लहानपणी जिंतूरच्या तुळजाभवानी मंदिराबाहेर परडी घेऊन बेलफूल विकत असू. मंदिरात आम्ही खेळायचो. ती खूप चंचल होती. अनेक वर्षे शोध घेतल्यावर निराशाच पदरी आली. ती परतल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. गीता आमचीच बहीण असावी, यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय.’ बसंती विवाहानंतर गंगाखेडच्या चिंतामणी मंदिरात राहतात. त्यांचे पती मंदिरात पुजारी आहेत.

पंजाबी ड्रेसमधील महिला बसंती वाघमारे-बनसोडे गीताची बहीण असल्याचा दावा करत आहे.
पंजाबी ड्रेसमधील महिला बसंती वाघमारे-बनसोडे गीताची बहीण असल्याचा दावा करत आहे.

१५ वर्षे पाकिस्तानात वास्तव्य... :

वयाच्या आठव्या वर्षी चुकून रेल्वेत बसून लाहोरला पोहोचलेली मूकबधिर गीता १५ वर्षे तेथे राहिली. २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने तिला भारतात आणण्यात आले. इंदूरच्या आनंद व मोनिका पुरोहित यांच्या आनंद सर्व्हिस सोसायटीत ती राहत आहे. सांकेतिक भाषातज्ज्ञ ज्ञानेंद्र यांनी संवाद साधल्यावर गीताचे गाव मराठवाडा-तेलंगण सीमेवर असल्याचे संकेत मिळाले. परभणीतही नुकताच गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला होता.

भाऊ पण हरवला :

बसंती यांचा भाऊ गणेशही ८ वर्षांचा असताना हरवला आणि दहा वर्षांनी सापडला. त्या वेळी तो हिंदी बोलायचा. त्याला औरंगाबादेत बालगृहात ठेवले होते. तेथून तो पुन्हा १० वर्षांपूर्वी बेपत्ता झाला. त्याचे वय आता २५ ते २८ असावे.

बातम्या आणखी आहेत...