आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शून्यातून गाठले शिखर:मंदीत नोकरी गेली; पत्नीचे दागदागिने विकून कारखाना उभारला, उलाढाल 100 कोटींवर

मुंबई (मनीषा भल्ला)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलोपार्जित जागेवर हर्षपाल यांनी हर्बल फॅक्टरी उभारली, विदेशी बाजारात १०० वर उत्पादन

कोरोना काळात नोकऱ्या जात असताना उत्तराखंडमधील हर्षपाल सिंह यांची कहाणी आदर्शवत ठरावी. २००७-०८ च्या जागतिक मंदीत त्यांची नोेकरी गेली. तेव्हा त्यांना ६७०० रुपये पगार मिळायचा. मात्र हर्षपाल निराश झाले नाहीत. त्यांनी पत्नीचे दागिने विकून २ लाख रुपये जमवले आणि हर्बल प्रॉडक्ट्सचा छोटा कारखाना उभारला. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल १०० कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी आपल्या अख्ख्या गावालाच रोजगार दिला आहे. 

हर्षपाल हे उत्तराखंडच्या शेतकरी कुटुंबातील आहेत. मायक्रोबायोलॉजी व फूड सॅम्पलिंगचे शिक्षण घेतल्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी हेल्थकेअर व फूड सॅम्पलिंगच्या क्षेत्रात नोकरी सुरू केली. सोनिपतमध्ये त्यांचे काम सुरू असतानाच २००६ मध्ये मंदीचे ढग येऊ लागले होते. ते म्हणाले, तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मात्र मला स्टार्टअप सुरू करायचे होते. मी पत्नी बीनाचे दागिने विकून २ लाख रुपये गोळा केले. गुजरातच्या नवसारीत एक छोटा कारखाना उभारला. बीना त्याचे काम पाहू लागली, माझी नाेकरी सुरूच होती. डाळिंबाच्या रसापासून २ किलो पावडर तयार करण्याची पहिली ऑर्डर अमेरिकेहून मिळाली. 

दरम्यान, माझी नोकरी गेली. मी फॅक्टरीत काम करू लागलो. हर्बल प्रॉडक्ट्स अॅब्स्ट्रॅक्टच्या व्यापारासाठी अंबे फायटोऍक्स्ट्रॅक्ट्स कंपनी सुरू केली. माेठ्या कारखान्याच्या जागेसाठी २ कोटींची गरज होती. इतका पैसा नव्हता म्हणून उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये जामरिया गावातील वडिलोपार्जित जमिनीवर कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला. गावात २ कोटींच्या मशीन लावल्या. २०१२ मध्ये तो उभारला. कच्च्या मालासाठी गावकऱ्यांनाच प्रशिक्षण दिले. ६ लोकांपासून सुरू झालेल्या या कारखान्यात आता १०० कामगार आहेत. 

अॅमेझॉनसोबत डील केली : हर्षपाल यांच्या कंपनीत तयार आवळा, हळद, आले, गिलोय, तुळशी, काेरफड, काळीमिरीसह १०० उत्पादनांचा अर्क जगभरात जातो. हर्षपाल यांनी अॅमेझॉनसोबत सॅनिटायझरचा करार केला आहे.

0