आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या वर्तनानेच मिळते यश:यशस्वी लीडर्सच्या सवयीच त्यांचा स्वभाव बनतो

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेतृत्व हे खरे तर एक वर्तन आहे, जे हळू-हळू वेळेनुसार स्वभाव आणि सवयीत बदलते. बहुतांश यशस्वी लीडर्स योग्य निर्णय घेणारे असतात. त्यांना अनेक चांगल्या सवयी असतात. जर तुम्हालाही एक यशस्वी लीडर बनायचे असेल, तर तुम्ही जगातील टॉप लीडर्सच्या या सवयी नक्कीच अंगिकारल्या पाहिजे.

आज मॅनेजमेन्ट मंत्रामध्ये जाणून घ्या, टॉप लीडर्सना कोणत्या सवयी असतात...

1. नेहमी स्वतःला उपलब्ध ठेवतात - एखाद्या लीडरने नेहमी उपलब्ध राहणे, तसे दिसणे खूप गरजेचे आहे. यशस्वी लीडर्स असेच करतात. त्यांची सवय असते सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असणे. असे केल्याने ते त्यांच्या टीमवर चांगला प्रभाव पाडतात.

2. जे शिकवतात ते स्वतःही करतात - जर तुम्हाला वाटते की लोकांनी सर्वोत्तम काम केले पाहिजे, तर तुम्हाला त्यांना हे दाखवावे लागेल की सर्वोत्तम काम कसे केले जाते. तुम्हाला दररोज तुमच्या मूल्यांसह जगावे लागेल. यशस्वी लीडर्स हेच करतात. ते प्रत्येक कामात प्रामाणिकता जपतात. ते स्वतःची विश्वासार्हता कायम ठेवतात. ते लोकांना जे करण्यास सांगतात त्यापेक्षा खूप जास्त ते स्वतः करतात.

3. जेव्हा लोकांना संशय असतो, तेव्हा आत्मविश्वासाने राहतात - आत्मविश्वास असलेले लीडर प्रत्येक आव्हानाचा सामना संपूर्ण आत्मविश्वासाने करतात. जर लीडरमध्येच आत्मविश्वास नसेल तर त्याचे कर्मचारीही नर्व्हस राहतील. एक यशस्वी लीडर केवळ स्वतःच कॉन्फिडन्ट नसतो तर तो त्याच्या टीमलाही आत्मविश्वासयुक्त ठेवतो.

4. नकारात्मकतेतही सकारात्मक राहतात - यशस्वी लीडर्स कायम सकारात्मक राहतात. नकारात्मक लोकांत राहूनही ते सकारात्मक राहतात. ते आपल्या टीममध्येही सकारात्मकतेचा शोध घेतात. आव्हानांच्या काळातही ते आपले सकारात्मक विचार कायम ठेवतात.

5. दुसऱ्यांच्या विचारांना आव्हान देतात - बहुतांश यशस्वी लीडर्सना आपल्या सहकाऱ्यांचे विचार, त्यांची क्षमता, कौशल्य आणि त्रुटींविषयी चांगली माहिती असते. असे लीडर्स आपल्या टीमला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतात. त्यांना कधीही कम्फर्ट झोनमध्ये जाऊ देत नाही.

6. बोलण्यापूर्वी दुसऱ्यांना ऐकतात - काही लीडर्स आपले पद, आपल्या वाईब्समधून लोकांना अनकम्फर्टेबल करतात. पण यशस्वी लीडर्स त्यांच्या भोवती असा ऑरा निर्माण करतात की लोकांना त्यांच्याशी काहीही शेअर करण्याची भीती वाटत नाही. यशस्वी लीडर्स आपल्या टीमला बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते आधी ऐकण्यात आणि नंतर बोलण्यात विश्वास ठेवतात.

बातम्या आणखी आहेत...