आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेने व्हाल म्हातारे:स्मरणशक्ती कमी होईल, यकृतही खराब; शिल्पा आणि मसाबाचे साखरेला गूडबाय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे 2500 वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा केमिकलच्या सहाय्याने रिफाईन्ड शूगर म्हणजेच साखरेचा वापर केला गेला. येथून साखर बनवण्याची पद्धत चीन, पर्शिया, इस्लामिक देश आणि मध्य पूर्वेतील देशांपर्यंत गेली.

मध्ययुगीन कालखंडापर्यंत साखरेकडे एक दूर्मिळ आणि महागडा मसाला म्हणून बघितले जात होते. प्रत्येक घरात साखर दिसत नव्हती. आज ही स्थिती अशी आहे की भारतात एक व्यक्ती वर्षभरात सरासरी 18 किलोपर्यंत साखरेचा वापर करतो.

हल्ली साखर सोडण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक लोक शूगर डिटॉक्स चॅलेंज घेत आहेत. फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ताने अलिकडेच सांगितले की 30 दिवसांपर्यंत ती गोड न खाता कशी राहिली. जॅकलीन फर्नांडिस आणि शिल्पा शेट्टीसारखे सेलिब्रिटी साखरेपासून फारक घेत आहेत.

आज कामाच्या गोष्टीत याच शूगर डिटॉक्सविषयी बोलूया. याचे फायदे जाणून घेऊया आणि हे करण्याची योग्य पद्धतही समजून घेऊया...

प्रश्नः साखरेमुळे शरीराला काय नुकसान होते?

उत्तरः जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे असे नुकसान होऊ शकते...

  • उच्च रक्तदाब आणि ह्रदयाच्या आजाराचा धोका वाढतो.
  • शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. मधुमेह होऊ शकतो.
  • अल्झायमरचाही धोका होऊ शकतो.
  • दातांत कॅव्हिटीची समस्या येऊ शकते.
  • साखरेचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो.
  • साखर खाल्ल्याने पांढऱ्या रक्तपेशी 50 टक्क्यांपर्यंत कमजोर होतात. यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
  • सेक्स हार्मोनमध्ये गडबडी होते. ज्यामुळे सेक्स ड्राईव्ह कमी होतो.
  • अनिद्रेची समस्याही होऊ शकते.
  • नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हरची समस्या येऊ शकते. यामुळे लिव्हरमध्ये फॅट स्टोअर होतो.
  • शरीरात ग्लुकोज कमी होतो यामुळे जास्त भूक लागते. यामुळे वजन वाढू शकते.
  • स्किनवर पिंपल्स आणि डाग होऊ शकतात.
  • नेहमी शरीरात सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो.

प्रश्नः शूगर डिटॉक्स वास्तवात काय आहे?

उत्तरः जेव्हा तुम्ही अन्नातून अॅडेड शूगर घेणे विशिष्ट कालावधीपर्यंत बंद करता तेव्हा त्याला शूगर डिटॉक्स म्हणतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास तुम्ही साखर खाणे टाळता, किंवा तुम्ही अशी गोष्ट खात नाही ज्यात वरून साखर मिसळली आहे, यालाच शूगर डिटॉक्स म्हणतात.

प्रश्नः शूगर डिटॉक्स किती दिवस करू शकता?

उत्तरः तुम्ही 7 दिवस, 21 दिवस किंवा 30 दिवसांसाठी करू शकता.

प्रश्नः शूगर डिटॉक्ससाठी काही खास नियम आहे का?

उत्तरः यासाठी असा कोणताही नियम नाही, ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला फक्त याकडे लक्ष द्यायचे आहे की तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यातून साखर कशी दूर कराल. म्हणजे तुम्हाला पोषण मूल्य असलेल्या गोष्टी खायच्या आहेत. गोड सोडा, केक, पेस्ट्री, मिठाई, पॅक्ड फ्रुट ज्यूस आणि काही मसाल्यांपासून दूर राहायचे आहे. तुम्ही केचअप खाऊ शकत नाही कारण याच्या एका मोठ्या चमच्यात 4 ग्रॅम साखर असते. म्हणून तुम्ही जे काही खाल ते यादृष्टीने तपासा.

प्रश्नः साखर अचानक काही दिवसांसाठी कमी केल्याने मेंदूला कशा प्रकारची समस्या होऊ शकते?

उत्तरः साखर खाणे बंद करणे किंवा कमी करणे ऐकायला जितके सोपे वाटते तितकेच कठीण आहे. जसे तुम्ही साखर खाणे सोडता, तसे हे खाण्याच्या तल्लफसह ते सोडण्याची काही लक्षणेही जाणवतात. याची लक्षणे तशीच असतात जशी निकोटिन सोडणाऱ्यांत दिसतात.

न्युरोलॉजिस्ट आणि सेंटर फॉर हीलिंग न्युरोलॉजीचे फाऊंडर इलीन रुहॉय म्हणतात की, साखर एक अशी गोष्ट आहे जी मेंदूमध्ये डोपामाईन आणि ओपिऑईड रिलीज करण्यास मदत करते. जसेही तुम्ही साखर खाणे सोडता, मेंदू अतिरिक्त डोपामाईन आणि ओपिऑईडसाठी तृषार्थ होतो. यामुळे अशी लक्षणे दिसतात.

प्रश्नः साखर न खाल्ल्याने दुसऱ्या काय समस्या येऊ शकतात?

उत्तरः साखर शरीरात ग्लुकोज म्हणजेच ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. जर तुम्ही साखरेच्या जागी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटयुक्त आहार जसे- ओटस, फळ, भाज्या इ. खात असाल तर तुम्हाला जास्त फरक पडणार नाही. कारण तुमचे शरीर कॉम्प्लेक कार्बोहायड्रेट तोडून सिंपल शूगरमध्ये बदलते. यातून तुम्हाला ऊर्जा मिळते. पण तुम्ही हे खात नाही, तर साखर सोडल्याने 5-7 दिवसांत तुमचा रक्तदाब सामान्यपेक्षा कमी होतो. याशिवाय फॅट आणि इन्सुलिनचे प्रमाणही कमी होऊ शकते.

साखर सोडल्यानंतर या अडचणी येऊ शकतात

  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • चिडचिडेपणा

प्रश्नः मला शूगर डिटॉक्स करायची इच्छा नाही मात्र साखर खाणे कमी करायची इच्छा आहे. असे करू शकत नाही कारण सहसा गोड खायची इच्छा होते. काय करू?

उत्तरः साखरेऐवजी या पर्यायांचा वापर करा

  • फळेः जेवल्यानंतर काही गोड खावेसे वाटत असेल तर फळे खाऊ शकता.
  • गूळः दूध-चहा साखरेशिवाय पिला जात नसेल तर गुळाचा वापर करा. गूळ पचन, अस्थमा, खोकला आणि सर्दीच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. गूळ खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
  • मधः मधाला लोक सुपरफूड मानतात. यात व्हिटामिन बी6, झिंक, आयर्न, पोटॅशियम आणि अँटि-ऑक्सिडन्टस आढळतात, जे प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
  • खजूरः खजुरात मॅग्नेशियम, आयर्न आणि पोटॅशियम आढळते. हे कार्बोहायड्रेट, प्रोटिन आणि फॅट पचनातही सहाय्यकारक आहे. हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो.
  • कोकोनट शूगरः कोकोनट शूगरमध्ये खूप मिनरल्स आढळतात. यातून कोकोनट ज्यूस बनवला जातो.
  • स्टीव्हियाः स्टीव्हियात झिरो कार्बोहायड्रेट आणि झिरो कॅलरी आढळतात. याचे कोणतेही साईड इफेक्टही नसतात.

प्रश्नः मुलांसाठी साखर किती वाईट आहे?

उत्तरः मुलांनी साखर खाल्ल्याने या समस्या येऊ शकतात...

  • साखर खाल्ल्याने वजन वाढू शकते. यामुळे टाईप-2 डायबिटिस होऊ शकते.
  • जास्त गोड खाल्ल्याने स्वभावावर परिणाम होतो. ते चिडचिडे होतात.
  • मुलांना कॅव्हिटिसह अनेक प्रकारच्या मौखिक समस्या होऊ शकतात.
  • मुलांना किडनी, डोळे, डायजेशन आणि अस्थमाचा त्रास होऊ शकतो.

ही बातमीही वाचा...

मासे खाल्ल्यावर दूध पिल्याने पडतील पांढरे डाग:चंद्राबाबू नायडूंनाही विटिलिगो, जाणून घ्या याच्याशी संबंधित मिथक आणि वास्तव