आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Supreme Court Banned In 2013, Yet Why Are You Finding Out Whether Rape Has Happened Or Not With Two Finger Test In Airforce

एक्सप्लेनर:सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये बंदी घातली, तरीही भारतीय हवाई दलात बलात्कार पीडितेची करण्यात आली टू फिंगर टेस्ट, जाणून घ्या काय आहे हीटेस्ट?

12 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर...

कोईंबतूरमध्ये एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार झाल्याची घडली आहे. विशेष म्हणजे ही महिला अधिकारी भारतीय हवाई दलातील अधिकारी आहे. महिला अधिकाऱ्याने हवाई दलातील आपल्या एका सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. महिला सहकारी फ्लाइट लेफ्टनंट आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून छत्तीसगडचे रहिवासी फ्लाइट लेफ्टनंट अमितेश हरमुखला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या घटनेनंतर महिला अधिकाऱ्याची टू-फिंगर टेस्ट केली गेली. या टेस्टवर बंदी असतानाही ही टेस्ट केली गेल्याने वाद निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने यावर गंभीर आक्षेप नोंदवला आहे. आयोग म्हणतो की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या चाचणीवर बंदी घातली आहे, तर मग ती का झाली? हे पत्र एअर चीफ मार्शलला पाठवण्यात आले आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त करत आयोगाने म्हटले आहे की, हवाई दलाच्या डॉक्टरांनीच केलेली टू फिंगर टेस्ट महिला अधिकाऱ्याच्या सन्मानाचे आणि गोपनीयतेचे उल्लंघन आहे.

टू फिंगर टेस्ट म्हणजे काय? सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी का घातली आहे? जाणून घ्या...

काय आहे टू-फिंगर टेस्ट?

 • ही चाचणी म्हणजे बलात्कारसारख्या दुष्ट कृत्याची पुन्हा यातना अनुभवण्यासमान आहे, असे मत टु- फिंगर टेस्टला विरोध करणाऱ्यांचे आहे. या चाचणीमध्ये पीडितेच्या गुप्तांगात एक किंवा दोन बोट घालून तिचे कौमार्य तपासले जाते. जर बोट सहज आतमध्ये गेले तर ती महिला सेक्स्युअली सक्रिय आहे, असे मानले जाते. अशा चाचण्या शास्त्रीयदृष्टीने पूर्णपणे नाकारण्यात आल्या आहेत.
 • या चाचणीच्या प्रक्रियेवर टीका केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या टू-फिंगर टेस्टवर बंदी घातली आहे. हे कोणत्याही पीडित महिलेच्या अधिकारांच्या विरोधात आहे. त्याशिवाय हे अवैज्ञानिक आहे, या टेस्टद्वारे बलात्कार झाला आहे ती नाही हे सांगणे अवघड आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होता?

 • लीलू राजेश विरुद्ध हरियाणा राज्य प्रकरणा (2013) मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टू फिंगर टेस्ट घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. या चाचणीमुळे बलात्कार पीडितेची गोपनीयता आणि तिच्या सन्मानाला गंभीर ठेच पोहोचते, असे न्यायालयाने म्हटले होते. ही टू फिंगर टेस्ट शारिरिक मानसिक खच्चीकरण करणारी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने यावर बंदी घालत म्हटले होते.
 • 16 डिसेंबर 2012 सामूहिक बलात्कारानंतर जस्टिस वर्मा समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या 657 पानांच्या अहवालात म्हटले आहे - टू फिंगर टेस्टमध्ये योनीच्या स्नायूंची लवचिकता दिसून येते. यावरुन ती स्त्री सेक्सुअली अॅक्टिव होती की नाही हे दिसून येते. पण संबंध तिच्या संमतीने की संमतीविरूद्ध ठेवले गेले हे समजत नाही. यामुळे ही चाचणी बंद केली पाहिजे.
 • मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही टू फिंगर टेस्ट होत आली आहे. 2019 मध्ये जवळपास 1500 बलात्कार पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात तक्रार केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही ही चाचणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. याचिकेत, चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रही या चाचणीला मान्यता देत नाही.

टू-फिंगर टेस्टिंग हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे का?

 • होय. सर्वोच्च न्यायालयाने 2013 नंतर अनेक प्रकरणांमध्ये टू फिंगर टेस्ट अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. ज्या मुलीची किंवा महिलेची ही चाचणी केली जाते, ती तिच्या गोपनीयता, सन्मान आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अधिकारांचे उल्लंघन आहे. टू फिंगर टेस्टच्या आधारावर लैंगिक संमती सिद्ध करता येत नाही.
 • बलात्कार प्रकरणात महिला किंवा मुलीची सेक्सुअल हिस्ट्री महत्त्वाची नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितले आहे. इथे फक्त संमतीचा विषय आहे आणि कोणत्या स्तरावर आणि कोणत्या स्थितीत ती संमती देण्यात आली, ते पाहावे लागेल. सुप्रीम कोर्टाने टू फिंगर टेस्टवर आधारित निकाल काल्पनिक आणि वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.

या चाचणीवर सरकार काय म्हणते?

 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही चाचणी अवैज्ञानिक असल्याचे म्हटले होते. मार्च 2014 मध्ये बलात्कार पीडितेसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यामध्ये सर्व​​​​​​​ रुग्णालयांना फॉरेन्सिक आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी वेगळा तपासणी कक्ष बनवण्यास सांगितले होते. टू फिंगर टेस्ट न करण्यासाठी कठोर सूचना जारी करण्यात आल्या.
 • मार्गदर्शनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पीडितेवर झालेल्या अत्यांचाराची माहिती घेणं आणि पीडितेची शारीरिक तपासणी करण्याबरोबरच त्यांना मानसिकदृष्ट्या समुपदेशन करण्याचा सल्ला देण्यात आला.अलीकडेच, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 'फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकॉलॉजी' या विषयाचा अभ्यासक्रम बदलला होता. यामध्ये 'सायन्स ऑफ व्हर्जिनिटी' हा विषय काढण्यात आला आहे.
 • बलात्काराच्या प्रकरणांमध्ये निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय पुरावे महत्त्वपूर्ण असतात. पण बलात्कार प्रकरणात केवळ फॉरेन्सिक पुराव्यांवर अवलंबून राहता येत नाही. कधीकधी दोन लोकांमधील संबंध परस्पर संमतीने होऊ शकतात, जे गुन्हा नाही. या कारणास्तव, याकडे केवळ अल्पवयीन मुलांच्या बाबतीत ठोस पुरावे म्हणून पाहिले जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदे काय आहेत?

 • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आधीच टू फिंगर टेस्टला अनैतिक म्हटले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले होते की, बलात्कार प्रकरणात केवळ हायमनच्या​​​​​​​ तपासामुळे सर्व काही उघड होत नाही. टू फिंगर टेस्ट मानवी हक्कांचे उल्लंघनासोबतच पीडितेला वेदना देऊ शकते. हे लैंगिक हिंसेसारखे आहे, जे पीडिता पुन्हा अनुभवते.​​​​​​​ भारतासह बहुतांश देशांमध्ये टू फिंगर टेस्टवर बंदी आहे.
बातम्या आणखी आहेत...