आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Surya Grahan Sutak 2021 India Timings Updated; Solar Eclipse Will Be Visible Canada, Greenland, And Russia | Solar Eclipse Of June 10 2021; News And Live Updates

दिव्य मराठी एक्सप्लेनर:10 जूनला दिसणार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण; ग्रहण किती वेळ दिसणार, भारतात दिसणार की नाही; जाणून घ्या सर्वकाही...

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूर्यग्रहण पाहताना कोणती खबरदारी घ्यावी?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण येत्या 10 जून रोजी होणार आहे. टाईम अँड डेट वेबसाइटने सांगितल्यानुसार, या वर्षी 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.,त्यामुळे हे सूर्यग्रहण केंव्हा होईल व कधीपर्यंत राहील? भारतात होणार की नाही? याबद्दल आपण सर्वकाही जाणून घेणार आहोत. या वर्षीचे पहिला चंद्रग्रहण 26 मे रोजी झाले.

सूर्यग्रहण म्हणजे काय? कोणत्या कारणामुळे ते होते? भारतात दिसू शकते का नाही आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे सर्व जाणून घ्या ...

सूर्यग्रहण म्हणजे काय?

जेव्हा पृथ्वी आणि सुर्यादरम्यान चंद्र येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. या दरम्यान, सूर्यावरून येणारा प्रकाश चंद्र मध्यभागी आल्यामुळे पृथ्वीवर पडत नाही. फक्त चंद्राची सावलीचं पृथ्वीवर पडते. परंतु, वास्तविकतेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या कारणास्तव ते तिघेही एकमेंकाना अनुरुप येतात. याला सूर्यग्रहण असे म्हणतात.

सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

नाही. भारतातील लोकांना हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये अंशतः दिसणार आहे. परंतु, उत्तर कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये पूर्णपणे दिसेल. त्यासोबतच सूर्यग्रहण जेव्हा शिगेला पोहचेल तेव्हा ग्रीनलँडचे लोक त्याला रिंग ऑफ फायरमध्ये पाहू शकतील.

रिंग ऑफ फायर म्हणजे काय?

चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षात फिरत असतो. त्यामुळे पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर कधी कमी होते तर कधी वाढत असते. जेंव्हा चंद्र पृथ्वीपासून अंतर जातो तेंव्हा त्याला अॅपोजी म्हणतात. आणि जवळ येतो तेव्हा पॅरीजी म्हणतात.

10 जूनला चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने त्याची प्रतिमा लहान दिसेल. त्यामुळे ते जेंव्हा सूर्यासमोर येईल त्याचा आकार सूर्यापेक्षा लहान असल्याने ते एका रिंग सारखे दिसेल. चंद्राच्या पृष्ठभागाच्या काठावरील काही प्रकाश पृथ्वीवर पडत राहील. जेव्हा पृथ्वीवरून पाहिले जाईल तेव्हा ते एका लाल गोल भागासारखे दिसेल. यालाच रिंग ऑफ फायर म्हणतात.

ग्रहण किती वेळ दिसणार?

टाईम अँड डेटच्या म्हणण्यानुसार, हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 1:42 ते संध्याकाळी 6.41 पर्यंत असेल. भारतात सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 5 तास असेल.

सूर्यग्रहण पाहताना कोणती खबरदारी घ्यावी?

वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. परंतु, पुढे जरी कधी सूर्यग्रहण पाहायचे झाल्यास या गोष्टींची काळजी घ्या.

  • उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण पाहू नका. सूर्यकिरण आपल्या डोळ्यांना नुकसान करू शकतात.
  • सूर्यग्रहण पाहण्यासाठी केवळ खास बनवलेल्या चष्मांचा वापर करा. साधे चष्मे वापरु नका.
  • कॅमेरा, दुर्बिणी किंवा टेलीस्कोपच्या सहाय्याने सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करू नका.
  • आपण पिनहोल प्रोजेक्टरच्या मदतीने सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहू शकता.
  • आपल्याला इंटरनेटवर पिनहोल प्रोजेक्टर बनवण्याचे सोपे मार्ग सापडतील.
बातम्या आणखी आहेत...