आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sushant Singh Rajput Death Case Vs CBI, Mumbai Police Investigation। 677 Days, 4 Officers, Know Every Fact

सुशांतच्या डेथ अ‍ॅनिव्हर्सरीवर बिग रिपोर्ट:677 दिवस, 4 अधिकाऱ्यांचा तपास, USचीही घेतली मदत; वकील म्हणाले- गळा दाबला

लेखक: अक्षय बाजपेयी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणणारे एम्सचे सुधीर गुप्ता यांनी मला तोंडी सांगितले होते की, सुशांतच्या मानेवरील जखमा या गळा दाबल्याच्या खुणा आहेत, फाशीच्या नाहीत. नंतर गुप्ता यांनीच याला आत्महत्या म्हटले. मी अजूनही तेच विचारतोय, जिथे सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता, तिथे त्याच्या शेजारीच एक बेड होता. जर त्याने हात-पाय हलवले असते तर तो बेडवर गेला असता. लटकत असताना बेड त्याच्या बॉडीला टच करत होता. मग तो कसा मरणार?'

हा प्रश्न सुशांत सिंहच्या कुटुंबाच्या वतीने खटला लढणारे वकील विकास सिंह यांनी दिव्य मराठीशी बोलताना उपस्थित केला आहे.

सुशांतच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील तीन मोठ्या एजन्सी CBI, NCB आणि ED या प्रकरणात गुंतल्या आहेत, परंतु निकाल अद्यापही आलेला आहे.

CBIने 6 ऑगस्ट 2020 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासाला 677 दिवस उलटले तरी तपास यंत्रणा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.

तर, या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय एजन्सीने चार वरिष्ठ अधिकारी, गुजरात केडरचे 1994 बॅचचे IPS मनोज शशिधर, 2004 गुजरात केडरचे IPS गगनदीप गंभीर, 2007 बॅचचे IPS नूपुर प्रसाद आणि SP अनिल यादव यांना CBI मध्ये नियुक्त केले आहे. सीबीआयच्या पीआरओनेही दिव्य मराठीकडे पुष्टी केली आहे की, या टीममध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अशा परिस्थितीत दिव्य मराठीने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेतले, ते आता या प्रकरणाकडे कसे पाहतात. आम्ही गेल्या दोन वर्षांची टाइमलाइनही तयार केली आहे. वाचा आणि पाहा आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडले

सर्वप्रथम या प्रकरणाची टाइमलाइन पाहा, गेल्या दोन वर्षांत काय-काय घडले…

सुशांतच्या वडिलांपासून ते घटनास्थळी प्रथम पोहोचलेल्या इन्स्पेक्टपर्यंत दिव्य मराठीने बातचीत करण्यात प्रयत्न केला-

आधी जाणून घ्या कोणत्या तपास यंत्रणेचा तपास कुठपर्यंत पोहोचला

  • CBI

सुशांत मृत्यू प्रकरणात CBIने आजपर्यंत एकही अटक केलेली नाही किंवा आरोपपत्रही दाखल केलेले नाही. या प्रकरणी सीबीआयने रियासह 6 जणांवर गुन्हा दाखल केला असला तरी गेल्या दीड वर्षांत CBI च्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही.

सीबीआयच्या पथकाने रियाच्या कुटुंबीयांची तासन्तास चौकशी केली. सुशांतच्या कर्मचार्‍यांची आणि कुटुंबीयांचीही बरीच चौकशी झाली. संपूर्ण क्राईम सीन सुशांतच्या घरी पुन्हा तयार करण्यात आला. कूपर रुग्णालयाचे डॉक्टर आणि प्रथम आलेल्या मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांचीही प्रश्नोत्तरे झाली.

नोव्हेंबर 2021 मध्ये सीबीआयने अमेरिकेकडेही मदत मागितली होती. सीबीआयला सुशांत सिंहच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंटवरून हटवलेला डेटा पाहायचा आहे. कदाचित यामुळे काही लिंक मिळेल असे त्यांना वाटते. परंतु हा डेटा सीबीआयला मिळाला की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही.

याबाबत आम्ही सीबीआयच्या PROला विचारले असता त्यांनी सांगितले की, तपास सुरू आहे, आता काही सांगू शकत नाही. त्याचवेळी या प्रकरणी सीबीआयकडून आरटीआयद्वारे माहिती मागवण्यात आली होती, त्यामुळे त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला, मात्र फाईल बंद झालेली नाही, अजूनही तपास सुरू आहे.

मात्र, सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिव्यमराठीला ही आत्महत्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही फक्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, कोणत्या परिस्थितीत त्याने असे पाऊल उचलले.

  • NCB

सुशांत प्रकरणाशी संबंधित सर्व अटक फक्त एनसीबीनेच केल्या आहेत. एनसीबीच्या मुंबई झोनचे प्रमुख आणि सुशांतशी संबंधित संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे सांगतात की, सुशांत मृत्यू प्रकरणात आम्ही सुमारे 30-31 जणांना आरोपी केले होते.

याप्रकरणी एकूण साडेआठ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही संपूर्ण टोळी होती आणि प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुशांत मृत्यू प्रकरणाशी संबंधित होता. आम्ही पॅडलरपासून पुरवठादारापर्यंत अनेकांना अटक केली. आता पुढील कारवाई न्यायव्यवस्थेवर आहे. सिद्धार्थ पिठाणीसह अनेक जण अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

दुसरीकडे, सिद्धार्थ पिठाणीचा खटला लढणारे ज्येष्ठ वकील तारक सय्यद म्हणाले की, एनसीबीने अनावश्यकपणे प्रत्येक प्रकरणाचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला, तर वास्तविकता काही वेगळीच आहे.

सुशांतच्या प्रकरणाचे स्वरूप बदलण्यासाठी हे संपूर्ण नाटक करण्यात आले. रिया आणि शौविकला जामीन मिळाला आहे. सिद्धार्थलाही लवकरच मिळेल.

  • ED

सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, ईडीने सुशांतच्या हत्येप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली, मात्र विशेष काही निष्पन्न झाले नाही.

पण तपासादरम्यान ड्रग्ज कनेक्शन असल्याचे निष्पन्न झालेल्या ईडीने एनसीबीला तपासात सहभागी होण्याची विनंती केली होती. सुशांतच्या वडिलांनी आरोप केला होता की, रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. या प्रकरणात ईडीला काहीही मिळाले नाही.

सॉरी, मी बोलू शकत नाही...
या संदर्भात आम्ही प्रथम मुंबई पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्याशी बोललो, कारण हीच व्यक्ती आहे जी 14 जूनला आपल्या टीमसोबत सुशांतच्या फ्लॅटवर पहिल्यांदा पोहोचली होती.

ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयने बेळणेकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. आम्ही फोन लावल्यानंतर त्यांनी उत्तर दिले.

भूषण बेळणेकर : माफ करा मी एका ठिकाणी बसलो आहे, बोलू शकत नाही...

सुशांत प्रकरणावर काही बोलू शकत नाही.
मुंबई पोलिसांनी प्रोफेशनल तपास केला नाही, त्यामुळे आम्हाला संशय आहे.

सुशांत सिंहच्या मृत्यूच्या वेळी बिहारचे डीजीपी राहिलेले गुप्तेश्वर पांडे म्हणतात की, सीबीआयचा तपास पूर्ण होण्याची वाट पाहिली पाहिजे. असा अंदाज लावणे योग्य नाही.

ते म्हणतात, 2020 मध्ये मुंबई पोलिसांनी आम्हाला तपास करण्यापासून रोखले. विनाकारण आमच्या अधिकाऱ्याला कैद केले. त्यामुळे नक्कीच केसमध्ये काहीतरी आहे, अशी शंका साऱ्या देशाला वाटू लागली. निष्पक्ष तपास होत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. आता तपास पूर्ण होण्याची वाट पाहा.

सुशांतचे नाव ऐकून मेहुण्याने फोन ठेवला
वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सुशांत सिंहचे मेहुणे ओपी सिंह यांनी आमचा प्रश्न ऐकून फोन कट केला. 14 जून, 15 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर, ओपी सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

आरोपपत्र दाखल झाले तर काय होते ते पाहू..
सुशांतचे वडील केके सिंह म्हणतात, 'प्रकरण कुठे अडकले आहे, मला माहीत नाही. तपास सीबीआयकडे आहे, तेच सांगू शकतील. 2020 मध्येच आम्ही दिल्लीतील लोकांशी बोललो. त्यानंतर काहीच झाले नाही. एजन्सीने आमच्याशी संपर्कही केला नाही. त्यांनी आरोपपत्र दाखल केल्यावर काय होते ते पाहू.

सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह म्हणतात की, कुटुंबाची आजही तीच भूमिका आहे जी दोन वर्षांपूर्वी होती. आम्हाला वाटते की सुशांतची हत्या झाली आहे. या प्रकरणी एजन्सीला नक्कीच काही सुगावा लागेल, अशी आशा कुटुंबियांना आहे.

त्याचवेळी एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी सीबीआयचा तपास सुरू असल्याचे सांगत काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, गुप्ता यांनी यापूर्वीच ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे अधिकृत वक्तव्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...