आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या भावनगरमध्ये 24 फेब्रुवारी रोजी हेतल राठोडचा लग्नाच्या विधींदरम्यान मृत्यू झाला. तिला ह्रदयविकाराचा झटका आला. ती मंडपातच पडली. घरच्यांनी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनलाही हार्ट अटॅक आला होता. 47 वर्षीय सुश्मिताला अॅक्टिव्ह लाईफस्टाईल असूनही हार्ट अटॅक आला होता.
या दोन घटनांचा उल्लेख यासाठी कारण एकिकडे सुश्मिता फिटनेस फ्रीक आहे तर दुसरीकडे कमी वयाची एक मुलगी आहे, जिला आधी कोणताही त्रास नव्हता.
काही वर्षांपूर्वीपर्यंत हे मानले जात होते की महिलांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी असते. मात्र हळू-हळू लोकांची ही समजूत मोडून पडली. आता अनेक संशोधन आणि घटनांनी सिद्ध केले आहे की महिलाही हार्ट अटॅकपासून सुरक्षित नाही. विशेषतः त्या, ज्या आपल्या मेनोपॉजमध्ये असतात. तर 60 वर्षांनंतर पुरुष आणि महिला दोघांनाही हार्ट डिसीजचा धोका समान असतो.
भारतात महिलांना वेगाने ह्रदयाचे आजार होत आहेत
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज रिस्क फॅक्टर कोलॅबरेशनने भारतात महिलांमध्ये ह्रदयाच्या आजारांचा वाढता आलेख आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यू दरावर एक अभ्यास केला आहे.
अभ्यासानुसार, भारतात 2017 मध्ये ह्रदयाच्या आजारांमुळे सुमारे 41 लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 18 लाख महिला आणि 23 लाख पुरूष होते. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांत ह्रदयाचे आजार वाढले आहेत. महिलांत हा वेग स्थूल, मधुमेह, धुम्रपान आणि ओरल इन्फेक्शनमुळे वाढला आहे.
अमेरिकेतही हार्ट अटॅकमुळे जास्त महिलांचा मृत्यू
अमेरिकेत 6 कोटींपेक्षा जास्त महिला कोणत्या ना कोणत्या ह्रदयाच्या आजारासोबत जगत आहे. ह्रदयाचे आजार अमेरिकन महिलांच्या मृत्यूमागील प्रमुख कारण आहे आणि याची कोणतीही वयोमर्यादा नाही.
अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसीनुसार, 2020 मध्ये हार्ट डिसीजमुळे 3 लाखांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू झाला. संशोधनात हेही समोर आले की केवळ 56% अमेरिकन महिलांनाच कळते की हार्ट डिसीज त्यांच्यासाठी धोकादायक आहे.
महिलांत सर्वात सामान्य हार्ट डिसीज कोरोनरी आर्टरी
रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत सांगतात की महिलांत सर्वात जास्त होणारा ह्रदयाचा आजार कोरोनरी आर्टरी डिसीज आहे. यात ह्रदयाच्या दुसऱ्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या नळींमध्ये प्लाकमुळे ब्लॉकेज येते.
मेनोपॉजनंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्यांच्यात आर्टरी डिसीजची शक्यता वाढते. महिलांना अॅरीथीमियामुळे हार्ट अटॅकची शक्यता जास्त राहते. यात ह्रदय खूप हळू किंवा अनियमित पद्धतीने धडकते. हे आर्टिलियल फिब्रिलेशनचे उदाहरण आहे.
महिलांत तिसरा धोका 'हार्ट फेल्युअरचा' वाढत आहे. या स्थितीत ह्रदय इतके कमजोर होते की ते शरीराच्या दुसऱ्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचवू शकत नाही. ही स्थिती सर्वात गंभीर असते.
महिलांत उशीराने ह्रदयाच्या आजाराचे निदान
अनेक महिलांत ह्रदयाच्या आजाराची लक्षणे हार्ट अटॅकची मेडिकल इमर्जन्सी येईपर्यंत दिसत नाही. महिलांत ह्रदयाच्या आजाराची लक्षणे वेगळी असल्याने त्यावर कुणाचेही लक्ष जात नाही. महिलांत लक्षणेही हळू-हळू समोर येतात.
महिलेला कोणत्या प्रकारचा ह्रदयाचा आजार आहे, या आधारे लक्षणे वेगळी असू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांनंतर महिलांत ह्रदयाचा आजार झाल्यावर पायात सूज, वजन वाढणे, झोप न येणे, चिंता, बेशुद्ध होणे, खोकला आणि आवाजात खरखर जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
महिलांत दुसऱ्या आजारांचे हार्ट अटॅकशी कनेक्शन
एसएस इनोवेशनचे फाऊंडर आणि गुरूग्राम कार्डिओथोरेसिक सर्जन डॉ. सुधीर प्रेम श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे की, हार्ट डिसीजच्या कोणत्याही महिलेला आधीच एखादा आजार नसतो. काही तर खूप निरोगी जीवनशैली जगत असतात. मात्र तणाव, चिंता आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनले आहेत. प्रदूषणासारखे घटकही हार्ट अटॅकचे कारण बनतात. तथापि महिला उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करतात. माहितीचा अभाव आणि आरोग्याकडे दुर्लक्षही महागात पडते.
हार्मोन्सचाही ह्रदयावर परिणाम होतो
हार्मोन्स आपल्या शरीराचे रासायनिक संदेशवाहक आहेत आणि शरीरातील प्रत्येक घडामोडीचा भागही असतात. हार्मोन्स शरीरातील प्रत्येक कृतीवर परिणाम करतात. ज्यात ह्रदयही आहे. पुरुष आणि महिला दोघांच्या शरीरात वेगळ्या प्रकारचे अॅस्ट्रोजेन हार्मोन्स असतात.
रिम्सचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत म्हणतात की अॅस्ट्रोजनमुळे महिला मेनोपॉजच्या आधीपर्यंत हार्ट डिसीजपासून सुरक्षित असतात. महिलांत मेनोपॉजच्या आधी अॅस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असते. अॅस्ट्रोजेन ह्रदयासाठी चांगले हार्मोन मानले जाते आणि मेनोपॉजनंतर दोन्हींच्या पातळीत फरक होतो. अॅस्ट्रोजेन कमी आणि प्रोजेस्टेरॉन वाढते. यामुळेच महिलांच्या वाढत्या वयासह हार्ट डिसीजची शक्यताही वाढते.
वाढत्या वयासोबत शरीरात हार्मोन्स असंतुलन
महिलांत वाढत्या वयासोबतच शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते. नंतर शरीरात अनेक हार्मोन्स कमी होऊ लागतात. अशात महिलांना अन्नातून सर्व पोषण मिळत नाही. डॉ. प्रशांत धुम्रपान हे ह्रदयाच्या आजारासाठी महत्वाचा घटक मानतात. या वयात संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीची गरज आणखी वाढते.
हार्मोन्स संतुलित राहावे यासाठी किशोरवयापासूनच हा आहार घ्यावा
रांचीच्या मेडिका रुग्णालयाच्या सीनियर डाएटिशिएन डॉ. विजयश्री म्हणतात की मुलींनी किशोर वयापासूनच आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. ब्लॉसम पीरिडय म्हणजेच किशोरावस्थेदरम्यान मुली जे खातात, तेच आयुष्यभर उपयोगी ठरते.
जीवनशैली बदलल्याने हार्मोन्स संतुलनात होईल मदत
कार्डियोथोरेसिक सर्जन डॉ. सुधीर प्रेम श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे की मेनोपॉजदरम्यान हार्मोन्सचे संतुलन आहार आणि निरोगी जीवनशैलीद्वारे राखले जाऊ शकते. यासाठी आपल्या दिनचर्येत व्यायाम, हेल्दी डाएट आणि स्वतःला तणावमुक्त ठेवावे लागेल.
नियमित व्यायामाचे अनेक फायदे आहेत. यामुळे हाडे आणि स्नायूंना मजबुती आणि ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत होते. या सर्व गोष्टी हार्मोन्स संतुलित करण्यात कामी येतात.
निरोगी आहाराला दिनचर्येचा भाग बनवा. कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन नियंत्रणात असावे. आहार आणि गट हेल्थवर विशेष लक्ष दिल्याने शरीराचे हार्मोन्स अॅक्टिव्हेट करणे, त्यांचे संतुलन राखणे आणि ते रिलीज करण्यास मदत होते. सर्वात महत्वाची गोष्ट तणावापासून दूर राहा. तणाव तुमच्या अॅड्रिनल ग्लँडवर खूप दबाव टाकते. ज्यामुळे सेक्स हार्मोन निर्माण होऊ शकत नाही.
ग्राफिक्सः सत्यम परिडा
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.