आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषनौदलाचा नवा ध्वज छत्रपतींना समर्पित:363 वर्षांपूर्वी उभारले 'स्वराज्याचे आरमार', इंग्रजांनाही भरली होती धडकी

नीलेश भगवानराव जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यागच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवस्यमेव करावे."

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रात केलेला वरील उल्लेख आरमाराप्रति त्यांची असलेली दूरदृष्टी दर्शवतो. भारताच्या इतिहासात सर्वात आधी स्वतःचे आरमार उभे करण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. 1659 मध्ये त्यांनी मराठ्यांच्या आरमाराचे मुहूर्तमेढ रोवली होती.

वास्तविक 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण- भिवंडीचा परिसर काबीज केला होता. त्यामुळे सिद्धीशी शिवाजी महाराजांचा संघर्ष होणे अपरिहार्य होते. सिद्धीचा सामना करायचा असल्यास तसेच इंग्रज, डज, पोर्तुगीज, फ्रेंच या सर्वांना स्वराज्यापासून दूर ठेवायचे असल्यास आरमार असणे आवश्यक होते. हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते.

भारताच्या इतिहासात आरमार उभारणारा पहिला किंबहुना एकमेव राजा अशी शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताच्या नवीन नौदल ध्वजाचे अनावरण केले. त्यावेळी हा नवा ध्वज शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे सांगितले. पूर्वीचा ध्वज हा गुलामगिरीचे प्रतीक होते, ते काढून टाकण्यात आले आहे.

स्वराज्याच्या आरमारात सर्वाधिक तारवे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी स्वतंत्र जहाज बांधणीचे कारखाने उभे केले. कल्याण जवळील दुर्गाडी किल्ल्यावर आरमाराचा कारखाना उभा करण्यात आला. इतिहासातील काही पुराव्यानुसार स्वराज्याच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याचे दिसून येते.

शिवकालीन नौकांचे प्रकार पाहा

सौजन्य : गुगल
सौजन्य : गुगल

संदेशवाहक होडी : या होड्या आकाराने सर्वात लहान होत्या. त्यांना व्हलवता येत असे. त्यावर डोलकाठी नसे. कधीकधी त्यावर एखादे शीड देखील लावलेले असत.

पाण्याची नौका : या प्रकारच्या होड्यांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्याची ने-आण करण्यासाठी करणत येत होता.

मचवा : हे देखील छोट्या आकाराचे जहाज होते. त्याला व्हलवता येत होते. मचवावर साधारण 25 ते 40 सैनिक राहत असत. त्वरीत हालचाल हे या जहाजांचे वैशिष्ट होते. यावरील शस्त्रांमध्ये तोफांचा वापर होत नव्हता. तर छर्रे आणि ठासणीच्या बंदूका असणाऱ्या सैनिकांची तुकडी यावरुन समुद्री प्रवास करत होती.

सौजन्य : गुगल
सौजन्य : गुगल

शिबाड : शिवाजी महाराजांच्या आरामाराला वस्तूंचा किंवा दारुगाळा आणि शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी या प्रकारी जहाजे वापरली जात होती. यावर एक डोलकाठी आणि शिड लावलेली असत. या जहाजांना व्हलवता येत नव्हते. तर केवळ वाऱ्याच्या आधारे ही जहाजे एकाच दिशेने जात असत.

सौजन्य : गुगल
सौजन्य : गुगल

गुराब : हे जहाज शिबडापेक्षा मोठे असून त्यावर 2 किंवा 3 डोलकाठ्या लावलेल्या होत्या. तसेच प्रत्येक डोलकाठीवर 2 चौकोनी शिड असत. गुराबेवर जहाजाच्या लांबीशी काटकोनात प्रत्येक बाजूने 5-7 तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे. यावर सुमारे 100-150 सैनिक असत.

सौजन्य : गुगल
सौजन्य : गुगल

तिरकती : हे तीन डोलकाठ्यांचे जहाज होते. याचा वापर छोट्या-मोठ्या कामांसाठी केला जात होता.

पगार : ही एक प्रकारची छोटी होडी असे.

जहाज बांधणीची कला

शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराला जहाज बांधणी कला शिकवण्यासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. आम्ही आमचे आरमार सिद्धी विरोधात संघर्षासाठी तयार करत असल्याचे महाराजांनी जाहिर केले होते. मात्र, मराठ्यांचे आरमार तयार झाले तर पोर्तुगीजांनाही धोका निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे कालांतराने पोर्तुगीज अधिकारी पळून गेले. त्यानंतर मराठ्यांच्या आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पालदी-मुसलमान यांचा समावेश होता.

आरमाराच्या ताफ्यातील जहाजांचे वैशिष्ट्ये

महाराजांच्या आरमारामधील ही सर्व जहाजे उथळ बांधणीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत. नाळीकडील भाग खूपच निमुळता व उघडा असे, त्यामुळे त्यांना समुद्राचे पाणी कमी घर्षणाने कापता येई. नाळीवर आलेले पाणी उघडेपणामुळे दोन्ही बाजूंनी वाहून जाई.

भारतीय नौसेनेचा नवीन ध्वज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताच्या नवीन नौदल ध्वजाचे अनावरण केले.
भारतीय नौसेनेचा नवीन ध्वज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताच्या नवीन नौदल ध्वजाचे अनावरण केले.

आता पाहा नौसेनेचा झेंडा बदलला म्हणजे नेमके काय केले?

संत जॉर्ज यांचे संकल्पीत चीत्र. सौजन्य : गुगल
संत जॉर्ज यांचे संकल्पीत चीत्र. सौजन्य : गुगल

तिसर्‍या धर्मयुद्धादरम्यान संत जॉर्ज हे योद्धा संत म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले होते. त्यांचीच स्मृती म्हणून लाल रंगाचे मराठीमधील अधिक (प्लस) चे चिन्ह दर्शवणाऱ्या लाल क्रासचा वापर करण्यात आला होता. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यामुळे इंग्रजांच्या ध्वजाप्रमाणेच भारतीय नौदलाच्या ध्वजावरही हे लाल रंगाचे क्रास कायम होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर नौदलाच्या नावात बदल झाला तरी हा लाल क्रास कायम होता. आता हा क्रास काढण्यात आला आहे.

भारतीय नौदलाच्या झेंड्यात झालेले बदल.
भारतीय नौदलाच्या झेंड्यात झालेले बदल.
बातम्या आणखी आहेत...