आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Swati Mohan Interview: Indian Upbringing Played A Major Role In My Success; Do Not Consider Any One Achievement As Success, Do Not Break Through One Failure: Swati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी मुलाखत:NASA च्या मिशन मंगळ मोहिमेत महत्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती म्हणाल्या- यशात भारतीय संस्काराचा सर्वात मोठा वाटा

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकदा यश मिळाले की माणूस यशस्वी होतो असे नाही
  • भारतीय संस्कार आणि मूल्ये हीच सर्वात मोठी शिकवण

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे अत्याधुनिक रोव्हर पर्सीवरेन्स गुरुवारी रात्री मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले. अमेरिकेच्या या यशाचा भारतीयांनादेखील अभिमान आहे. कारण, रोव्हर यशस्वीरित्या लँड करून टचडाउन कन्फर्म होईपर्यंत त्याची सर्वात पहिली माहिती देणाऱ्या फ्लाइट कंट्रोलर स्वाती मोहन भारतीय वंशाच्या आहेत. माथ्यावर टीक्यासह अतिशय धैर्याने पर्सीवरेन्सच्या प्रत्येक पावलाची घोषणा करणाऱ्या स्वाती नासामध्ये गाइडेन्स, नेव्हीगेशन आणि कंट्रोल्स ऑपरेशनच्या प्रमुख आहेत. स्वाती वर्षभराच्या होत्या तेव्हाच त्यांचे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाले. त्यांच्याशी दैनिक भास्कर समूहाने एक्सक्लूसिव्ह बातचीत केली आहे.

रोव्हरच्या लँडिंगच्या वेळी मनात काय सुरू होते?
मी इतकी एकाग्र होऊन काम करत होते की मला काहीच सूचत नव्हते की माझ्या सभोवताल काय होत आहे. मी माझे कार्य पूर्ण करण्यातच इतके मशगूल होते की मला उभे होऊन आपला आनंद देखील व्यक्त करता आलेला नाही.

मिशन फेल ठरण्याची भीती होती का?
होय. पर्सीवरेन्सचे लँडिंग यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी आम्ही खूप वेळ दिला. खूप नियोजन केले होते. त्यामध्ये काही अनपेक्षित घडल्यास दृश्यांना पाहून त्याचा अंदाज लावणे सुद्धा या नियोजनाचा भाग होता. मी सर्वच योजनांची एक शीट तयार केली होती. माझ्या मॉनिटरच्या खाली फ्लोचार्ट ठेवण्यात आला होता. लँडिंग नियोजनाप्रमाणे नाही झाल्यास काय करावे आणि काय बोलावे हे सर्व त्यावर लिहिले होते. आम्ही अशा परिस्थितीतून गेलो आहोत. लँडिंग होताच भूतकाळ झालेल्या चुका विसरून गेलो.

लँडिंगपूर्वी रात्रभर झोप आली की नाही?
मी झोप घेण्याचा खूप प्रयत्न केला पण पहाटे 4:30 वाजता जाग आली. लँडिंगची तयारी करताना लवकरात लवकर कसे उठता येईल याचा देखील सराव करत होते. पण, यशानंतर सेलिब्रेट करताना आम्ही रात्री पार्टी केली. मला जगभरातून फोन आले.

भारताचा या यशाशी काही संबंध?
मी पेनसिल्वेनियात राहत होते. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीला गेले. मी तर हेच म्हणणार की भारतीय संस्कारांची यात खूप महत्वाची भूमिका आहे. माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वात मोठी शिकवण आहे.

तुमच्या यशातून भावी पिढीला काय शिकता येईल?
आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यावर ठाम राहा. कुठलाही एक अनुभव किंवा एक यश तुम्हाला खूप यशस्वी किंवा पराभूत करू शकत नाही. यश असो की अपयश त्या अनुभवातून तुम्ही काय आणि कसे शिकलात हे सर्वात महत्वाचे असते. हे अनुभव तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतात.

बातम्या आणखी आहेत...