आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातमिळनाडू सरकार रेल्वे पोलिसांकडून जारी व्हिडिओ, यात एक व्यक्ती रेल्वेत काही लोकांना मारताना दिसत आहे.
बिहारच्या रेल्वे स्थानकांवर अचानक तमिळनाडूतून येणाऱ्या मजुरांची गर्दी वाढायला लागली. तमिळनाडूच्या शहरांत बिहारच्या मजुरांवर हल्ल्याचे दावे करणारे व्हिडिओ व्हायरल झाले. म्हटले गेले की हे हल्ले हिंदी भाषिकांवर केले जात आहेत.
बातमी पसरली की तमिळनाडूच्या तिरुप्पुर आणि शिवकटमध्ये बिहारी मजुरांना मारहाण केली जात आहे. या हल्ल्यांचे वास्तव जाणून घेण्यासाठी मी तमिळनाडूतून बिहारला आलेल्या आणि अजूनही तिरुप्पुरमध्ये असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यात जे सत्य कळाले, ते भाषावादापेक्षा पोटाचे जास्त आहे.
तमिळनाडूत काम करणाऱ्यांनी या हल्ल्यांमागे असलेली जी कहाणी सांगितली, वाचा...
आम्ही ज्या कामासाठी 700 रुपये घेतो, स्थानिक लोक त्यासाठी 1000 रुपये मागतात...
'कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आम्ही हजारो किलोमीटर दूर आलो आहे. 2000 रुपये भाडे देऊन, 4 दिवस रेल्वेतून प्रवास करत, तहान-भूक विसरून, 6 राज्य ओलांडून तमिळनाडूत येतो. बिहारमध्येच काम मिळाले तर इथे का येऊ.'
हे सांगणारे बिहारच्या मोकामातील संदीप कुमार गेल्या 10 वर्षांपासून तमिळनाडूच्या तिरुप्पुरमध्ये राहत आहेत. मी त्यांना विचारले की बिहारच्या लोकांवर हल्ले का होत आहेत? हे ऐकताच ते तमिळनाडूच्या लोकांऐवजी आपल्या सरकारवर राग व्यक्त करतात.
ते म्हणाले, 'खरा मुद्दा रोजगाराचा आहे. बिहारमधून आम्ही इथे कामाच्या शोधात येतो. इथे आल्यावर जितके मिळते, ते घेऊनच काम करतो. स्थानिक लोक जास्त मजुरी मागतात. मी स्टील कंपनीत काम करतो. रोजचे 700 रुपये मिळतात. स्थानिक लोक याच कामासाठी 1000 रुपये मागतात.'
यामुळेच तुमच्यावर हल्ला होत आहेत का? उत्तर मिळाले, 'बघा, काही ना काही तर सुरू राहते. इथल्या लोकांना आमचा राग येतो, कारण आम्ही त्यांच्या राज्यात येऊन कमी पैशांत काम करतो. मात्र असेही नाही की ते आम्हाला मारतच आहेत. मी तर इथेच आहे आणि परत जात नाही.'
नंतर संदीप रागाने म्हणतात, 'जर बिहारमध्ये कंपन्या असत्या, तर आम्ही इतके दूर का आलो असतो. मी पाटण्यातही काम केले. पण मजुरी इतकी कमी होती की त्यातून घर चालत नव्हते. तिथल्या तुलनेत इथे चांगले पैसे मिळतात, त्यामुळे आम्ही इथे येतो.'
तुमच्यावरही असा हल्ला झाला का, इथल्या लोकांशी भांडण झाले का? उत्तर मिळाले - 'नाही. झाला असता तर इतके दिवस टिकलो नसतो. मात्र कमी पैशांत काम करू तर इथल्या लोकांना आमचा राग येणारच ना.'
स्थानिक लोक वेळेवर येतात-जातात, आम्ही कमी पैशांत जास्त वेळ थांबतो...
तिरुप्पुरमध्ये टाईल्सचे काम करणारे कार्तिक कुमार 2010 पासून इथे आहेत. आम्ही त्यांना हल्ल्यांविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, 'पूर्ण भांडण कामाचे आहे. तुम्ही सोशल मीडियात पाहा. तिथले लोक आंदोलन करत आहेत. आम्हाला काम हवे. उत्तर भारतीय इथे नको.'
'हे बरोबरही आहे. जर आमच्या राज्यात कंपन्या असत्या, रोजगार असता आणि आमच्याऐवजी बाहेरच्या लोकांना काम मिळाले असते तर आम्हीही आंदोलन केले असते.'
तिथले लोक आणि तुमच्या कामाच्या पद्धतीत काय फरक आहे? ते म्हणतात, 'जर तमिळनाडूचे लोक काम करत असतील, तर ते घड्याळ पाहून येतात आणि जातात. सव्वा 5 वाजता त्यांचा वेळ संपल्यावर ते निघून जातात. आम्ही लोक काम करत राहतो. रात्री साडेआठपर्यंतही काम करतो. ते लोक जास्त पैसे मागतात. आम्ही कमी पैशांत काम करतो. आमची मजबुरी आहे. दोन रुपये कमी मिळाले तरी करावे लागेल.'
'आमच्याकडे काम मिळत नाही, म्हणून दुसरीकडे येतो'
बिहारच्या सिकंदरात राहणारे कार्तिक म्हणतात, 'आम्ही तमिळनाडूत 200-400 रुपयांत काम करतो. जर आमच्याकडेच काम मिळाले, तर आम्ही कमी पैशांत तिथेही काम करू. हा पैसा आपल्या राज्याच्या प्रगतीत वापरता येईल. बिहार पुढे जाईल. आम्ही मेहनती लोक आहोत. आमच्या कुटुंबाला चांगल्या स्थितीत ठेवू इच्छितो, पण काय करणार, आम्हाला ही मेहनत दुसऱ्या राज्यांत जाऊन करावी लागते.'
मी काही विचारू इच्छिते, त्याआधीच कार्तिक मध्येच थांपबवत म्हणतात, 'तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या वाढदिवसाला आमचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव त्यांना केक भरवतात. आमच्या सुरक्षेविषयी चकार शब्द बोलत नाही. तेही नाही आणि मुख्यमंत्री नीतिश कुमारही नाही. त्यांना सांगा की आम्ही तिकडे यासाठी जातो, कारण आपल्याकडे काम मिळत नाही. जर काम मिळाले तर आम्ही तिकडे का जाऊ?'
कार्तिक कुमार यांना जेव्हा हल्ल्यांच्या व्हायरल व्हिडिओंविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, 'आम्ही फेसबूकवर बघितले होते. आम्हाला ऐकायला मिळते, पण आमच्यासोबत असे झाले नाही.'
तुमच्या एखाद्या निटकवर्तीयाची हत्या किंवा भांडण झाले? ते म्हणाले, िथे काम करणाऱ्या राजस्थानी, गुजराती, बिहारी लोकांची दुकानेही आहेत. तमिळनाडूचे लोक हिंदीतील बॅनरही फाडतात. म्हणतात इथे काम करायचे आहे तर तमिळ लिहा आणि बोला.
ते पुन्हा म्हणतात, 'तमिळ आमच्यावर चिडतात, कारण आम्ही तिथे काम करायला जातो. आम्ही जास्त काम करतो, पैसे कमी घेतो. ते लोक कामाच्या हिशेबाने पैसे घेतात.'
'आम्हाला म्हणतात की तुम्ही कमी पैशांत काम का करतात?'
तिरुप्पुरहून बिहारच्या जमुईत परतलेले अजीत कुमार म्हणाले, 'आम्ही टाईल्स दगडांचे काम करतो. आम्ही पाटण्यातही काम केले. मात्र इथे पैसे मिळाले नाही. म्हणून बाहेर जायला लागलो. तिथे आम्हाला 600 रुपये मजुरी मिळायची. तिथले लोक या कामासाठी 800 रुपये मागतात. म्हणूनच ते आम्हाला म्हणतात - तुम्ही लोक कमी पैशांत काम करतात. आम्ही म्हणतो की काय करावे, इतके दूर आलो आहोत, तर काम तर करावेच लागेल.'
याच्या आधी कुठे-कुठे काम केले, उत्तर मिळाले - 'पंजाब, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतही काम केले. बिहारमध्ये तर कामच नाही. मग कुठेतरी करावेच लागेल.' तिथेही असेच होते का? उत्तर मिळाले, 'नाही, तिथे इतके झाले नाही. पण लोक तर चिडतातच. जर आम्ही तिथे गेलो तर त्यांच्या कामाची आमच्यासोबत वाटणी होणारच ना.'
अजीत म्हणतात, 'आम्ही तिरुप्पूरमध्ये 8-9 महिन्यांपासून राहत होतो. पहिल्यांदा इतका वाद झाला.' तुमच्यासोबत काही मारहाण किंवा भांडण झाले? उत्तर मिळाले, 'नाही, आमच्यासोबत झाले नाही, मात्र व्हिडिओमध्ये बघितले.'
हा व्हिडिओ कुठे दिसला, उत्तर मिळाले, 'फेसबूक, व्हॉटसअॅपवर बघितला'
जर तुम्हाला बिहारमध्ये काम मिळाले तर तुम्ही बाहेर जाल, उत्तर मिळाले, 'का जाऊ, तिथे जितक्या पैशांत काम करतो, त्यापेक्षा काही कमी पैशांत इथे आनंदाने काम करू. आपल्या घरी तर राहू.'
हिंदी बोलल्याने हल्ल्याचा दावा
तमिळनाडूचा तिरुप्पूर आणि शिवकट औद्योगिक भाग आहे. तिथे स्टील, कपडे आणि मार्बल-टाईल्सचे उद्योग आहेत. इथे बिहार, राजस्थानचे लोक मोठ्या संख्येने मजुरीसाठी येतात. गेल्या सुमारे एक आठवड्यापासून बिहारचे मजूर अचानक आपल्या राज्यात परतत आहेत.
त्यांचे म्हणणे आहे की उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. हिंदी बोलल्याने त्यांना त्रास दिला जात आहे. हत्याही केल्या जात आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये रक्तबंबाळ अवस्थेतील लोकांचे अनेक व्हिडिओ आहेत.
बिहार सरकारने अधिकाऱ्यांचे पथक तमिळनाडूला पाठवले
बिहारच्या विधानसभा आणि विधान परिषदेत हा मुद्दा तिथल्या सरकारने चांगलाच उचलून धरला. अर्थमंत्री विजय कुमार चौधरींनी हा बिहारी लोकांचा अपमान असल्याचे म्हटले. आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी तमिळनाडूत चौकशीसाठी एक पथक पाठवले आहे.
तमिळनाडूत हिंदी भाषेविषयीचा वाद 86 वर्षे जुना
तमिळनाडूत पहिले हिंदीविरोधी आंदोलन 1937 मध्ये सुरू झाले होते. हे आंदोलन 3 वर्षे चालले. तिथले लोक शाळेत हिंदी भाषा बंधनकारक करण्याच्या विरोधात होते. हे आंदोलन दाबण्याचे प्रयत्न झाले. तेव्हा दोन लोकांचा मृत्यू आणि 1000 हून जास्त जणांना अटक झाली. फेब्रुवारी 1940 मध्ये काँग्रेस सरकारच्या राजीनाम्यानंतर मद्रासचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड एर्स्किन यांनी हिंदी बंधनकारक करण्याचा आदेश मागे घेतला.
1946-50 दरम्यान द्रविड कळघम आणि पेरियार यांनी हिंदीविरोधात आंदोलन केले. सरकारने जेव्हाही हिंदी बंधनकारक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा याला विरोध झाला. सरकारचे हे पाऊल थांबवण्यात विरोधक यशस्वी राहिले. सर्वात मोठे हिंदी विरोधी आंदोलन 1948 पासून सुरू झाले होते.
सरकार आणि आंदोलन करणाऱ्या लोकांत एक करार करण्यात आला होता. सरकारने त्याविरोधात कायदेशीर कारवाई बंद केली आणि त्यांनी 26 डिसेंबर 1948 ला आंदोलन बंद केले. अखेर सरकारने 1950-51 च्या सत्रापासून हिंदी पर्यायी विषय ठेवला.
26 जानेवारी 1965 रोजी मद्रास राज्यात हिंदीविरोधी आंदोलनाने वेग धरला. तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी संघटना स्थापन केली आणि हिंदीविरोधी चळवळ सुरू केली. या विरोधाचे रुपांतर दंगलीत झाले आणि सुमारे 70 विद्यार्थी मारले गेले.
17 नोव्हेंबर 1986 रोजी तमिळनाडूतील पक्ष डीएमकेने नव्या शिक्षण धोरणाला विरोध केला. यातही हिंदी शिकवण्याची तरतूद होती. द्रमुक नेते करुणानिधींसह 20 हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सुमारे 21 लोकांनी आत्महत्या केली. करुणानिधींना 10 आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.