आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर:ताटापर्यंत पोहोचली महागाईची आग, 20 वर्षात एका दिवसाच्या थाळीचे बिल 3 पटीने वाढून झाले 78 रुपये

लेखक: नीरज सिंह6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईचा परिणाम रोजच्या जेवणातील आपल्या ताटावरही दिसू लागला आहे. एका संशोधनात्मक विश्लेषणानुसार, गेल्या 20 वर्षांत एका दिवसाच्या थाळीचे बिल 23 रुपयांवरून 78 रुपयांपर्यंत वाढले आहे. म्हणजेच यामध्ये 3 पटीहून अधिकची वाढ झाली आहे. हे विश्लेषण घाऊक महागाई निर्देशांकाच्या डाटावर आधारित आहे. एवढेच नाही तर तेल आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने महागाईने 8 वर्षांचा उच्चांक गाठला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, उपभोक्ता मूल्य निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 7.79% पर्यंत वाढली आहे. अशा स्थितीत, गेल्या 20 वर्षांत आपले ताट कसे महाग झाले हे जाणून घेऊया? या कालावधीत कोणत्या वस्तूंमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे? याचे कारण काय?

किराणा सामानाची साप्ताहिक बिले 10 वर्षांत 68% वाढली

दिल्लीत राहणाऱ्या 34 वर्षीय पूजा सांगतात की, गेल्या काही वर्षांत आमचे किराणा बिल अचानक खूप वाढले आहे. आता आम्हाला आमच्या 3 लोकांच्या कुटुंबासाठी एका आठवड्याच्या किराणा सामानासाठी 4000 रुपये खर्च करावे लागतात जे 2012 मध्ये लग्नानंतर पहिल्यांदा केलेल्या खरेदीच्या दुप्पट असल्याचेही त्या म्हणाल्या. पूजा सांगतात की, या काळात मुलगा झाला आणि ‘वर्क फॉर्म होम’ मुळेही त्यात थोडी वाढ झाली आहे. वास्तविक आम्ही 10 वर्षांपूर्वी जितका खर्च करत होतो आता त्याच्या दुप्पट खर्च करत आहोत.

गणितामधील आकडेमोडच्या माध्यमातून आपण हेच समजून घेऊयात. 3 जणांच्या कुटुंबाला आठवडाभरात 5 लिटर दूध, 2 किलो तांदूळ, 2 किलो मैदा, 1 लिटर तेल, डाळी, 1 डझन केळी, 1 किलो सफरचंद आणि 2 किलो कांदे या मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. घाऊक आणि किरकोळ किंमत माहिती प्रणाली (WPI) नुसार, मार्च 2012 च्या तुलनेत या वस्तूंच्या किमती मार्च 2022 मध्ये म्हणजे 10 वर्षांमध्ये 68% वाढल्या आहेत.

त्याच वेळी, उपभोक्ता अन्न मूल्य निर्देशांक (CPI) नुसार, जानेवारी 2014 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये देशातील एका कुटुंबाद्वारे खाल्लेल्या अन्नपदार्थांच्या किमती 70% वाढल्या आहेत. जागतिक कारणांमुळे ही वाढ झाली असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. म्हणजेच कमोडिटीच्या (कृषी उत्पादने) किमती, तेल आणि गॅसच्या किंमती आणि अमेरिका फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदर वाढ तसेच लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळीवर झालेला परिणाम आदी.

नेमकी महागाई कशी मोजतात?

महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढण्याचा दर. भारतात महागाई वर्षानुवर्षे मोजली जाते. म्हणजेच, एका महिन्याच्या किमतींची तुलना मागील वर्षाच्या त्याच महिन्याच्या किमतींशी केली जाते. या दरावरून त्या कालावधीत एखाद्या ठिकाणी राहण्याचा खर्च किती वाढेल याचा अंदाज लावता येतो.

जगभरातील अनेक अर्थव्यवस्था महागाई मोजण्यासाठी WPI ला त्यांचा आधार मानतात. मात्र, भारतात असे नाही. आपल्या देशात WPI सोबत CPI हे देखील महागाईचे मोजमाप मानले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक आणि पत धोरण ठरवण्यासाठी घाऊक महागाई नाही तर किरकोळ चलनवाढीला मुख्य पॅरामीटर मानते. WPI आणि CPI यांचा एकमेकांवर प्रभाव असतो. अशा प्रकारे WPI वाढेल, नंतर CPI देखील वाढेल.

घाऊक किंमत निर्देशांक (WPI) बाजारातील वस्तूंच्या सरासरी किमतीत झालेली वाढ मोजतो. घाऊक बाजार म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी, जी व्यापारी, किरकोळ विक्रेते किंवा कंपन्या करतात. या निर्देशांकाचा उद्देश बाजारपेठेतील उत्पादनांच्या हालचालींचा मागोवा घेणे आहे, जेणेकरून मागणी आणि पुरवठ्याची स्थिती जाणून घेता येईल.

या निर्देशांकात सेवा क्षेत्राच्या किंमतींचा समावेश नाही किंवा तो बाजारातील ग्राहकांच्या किंमतींची स्थिती दर्शवत नाही. आधी WPI मोजण्यासाठी आधारभूत वर्ष 2004-2005 होते. मात्र, एप्रिल 2017 मध्ये सरकारने ते बदलून 2011-12 केले. ग्राहक म्हणून, तुम्ही आणि मी घाऊक खरेदीचा भाग नाही. आपण किरकोळ बाजारातून वस्तू खरेदी करतो. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) त्याच्याशी संबंधित किंमतींमध्ये बदल दर्शविण्याचे काम करते.

गेल्या 8 वर्षांत खाद्यपदार्थांच्या किमतीत दर महिन्याला 4.4% झाली वाढ

सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती 7.68% जास्त होत्या. नोव्हेंबर 2020 नंतरचा हा उच्चांक आहे. जानेवारी 2014 ते मार्च 2022 या कालावधीचा विचार केल्यास, दर महिन्याला खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये सरासरी 4.483% वाढ झाली आहे. म्हणजे जानेवारी 2014 मध्ये ज्या मालाला 100 रुपये भाव होता तो आता 170 रुपये झाला आहे.

एप्रिलमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे महागाई वाढली का?

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच, एप्रिलमधील उच्च महागाईची आकडेवारी धक्कादायक नाही किंवा त्यात अचानक वाढ झालेली नाही.

ऑक्टोबर 2019 पासून किरकोळ महागाई सातत्याने वाढत आहे. या काळात केवळ एकदाच महागाई दर 4% वर आला होता. या व्यतिरिक्त दर महिन्याला हा दर सतत 6% वर राहिला आहे. 2022 च्या सुरुवातीपासून म्हणजे रशियाच्या युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वीच भारतातील चलनवाढीचा दर 6% च्या वर आहे.

बातम्या आणखी आहेत...