आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्चशिक्षकांना पगार जास्त, तिथे विश्वास कमी:भारतात 19 हजार पगार, विश्वास 61%; जर्मनीत पगार जास्त विश्वास कमी

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

युनेस्कोच्या रिपोर्टमध्ये भारतातील सरकारी आणि खासगी शिक्षकांचे सरासरी पगार सुमारे 19,000 रुपये असल्याचे म्हटले आहे. तर 43% शिक्षक कोणत्याही व्यावसायिक कराराशिवाय काम करतात आणि त्यांचा सरासरी पगार महिन्याला फक्त 17 हजार आहे. वास्तविक, ज्या देशांमध्ये शिक्षकांना चांगले पगार मिळतात, तेथे जनता त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे, असे नाही.

ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) ने आपल्या सदस्य आणि भागीदार देशांमधील शिक्षकांच्या पगारावर एक अभ्यास केला आहे. त्याच वेळी, IPSOS ने 28 देशांमधील विविध व्यवसायांवर असलेल्या लोकांच्या विश्वासाचा निर्देशांक जारी केला आहे. या दोन्ही मधील तुलनात्मक अभ्यास धक्कादायक आहे.

OECD च्या अभ्यासानुसार, लक्झेंबर्ग आणि जर्मनी हे देश शिक्षकांच्या पगाराच्या बाबतीत प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आहेत. भारत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. IPSOS इंडेक्समध्ये शिक्षकांवरील विश्वासाच्या बाबतीत भारत 5 व्या क्रमांकावर आहे, तर जर्मनी 14 व्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या, काय आहे शिक्षकांचा पगार आणि त्यांच्यावरील विश्वासाचे गणित…

भारतातील सरकारी शिक्षकांचे सरासरी पगार खासगी शाळेतील शिक्षकांपेक्षा दुप्पट

 • युनेस्कोच्या स्टेट ऑफ एज्युकेशन फॉर इंडिया 2021 च्या अहवालानुसार, भारतातील सरकारी शाळेतील शिक्षकांचे सरासरी मासिक वेतन 26,381 रुपये आहे. आहे. तर खासगी शाळांमधील शिक्षकांचे सरासरी मासिक वेतन 13099 रुपये आहे.
 • सरकारी आणि खासगी अशा दोन्ही शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षकांना सर्वात कमी पगार आहे. सरकारी शाळांमध्ये सरासरी मासिक वेतन 9440 रुपये, तर खासगी शाळांमध्ये ते 8946 रुपये आहे.
 • पगाराव्यतिरिक्त, सरकारी शाळांमधील 41% शिक्षकांना पीएफ, पेन्शन, ग्रॅच्युइटी, आरोग्य सेवा आणि मातृत्व लाभ मिळतात. तर खासगी शाळांमधील 59% शिक्षकांना पगाराशिवाय इतर कोणतेही लाभ मिळत नाहीत.
 • भारतात, सर्व प्रकारचे सरकारी आणि खासगी शिक्षकांचा एकत्रीत विचार केल्यास, सरासरी वार्षिक वेतन फक्त 2.36 लाख रुपये आहे. म्हणजेच महिन्याला सुमारे 19 हजार रुपये.
 • ब्राझीलमध्ये OECD सदस्य देशांमध्ये शिक्षकांना सर्वात कमी पगार मिळतो, परंतु येथेही शिक्षकांचे किमान सरासरी वार्षिक वेतन 11.16 लाख रुपये आहे.

पगार कमी पण शिक्षकांवर विश्वास जास्त

 • IPSOS च्या ट्रस्ट युनिफॉर्मिटी इंडेक्सनुसार, शिक्षकांवरील विश्वासाच्या बाबतीत भारत 5 व्या क्रमांकावर आहे.
 • भारतात 61% लोक शिक्षकांना विश्वासार्ह मानतात. 64% लोक सैन्याला विश्वासार्ह मानतात, तर 64% शास्त्रज्ञांना विश्वासार्ह मानतात.
 • IPSOS इंडेक्समध्ये भारतासोबत नेदरलँड आणि तुर्कस्तानही 5 व्या क्रमांकावर आहे. इथेही केवळ 61% लोक शिक्षकांना विश्वासार्ह मानतात.
 • परंतु नेदरलँड्समध्ये शिक्षकांचे किमान वार्षिक सरासरी वेतन 37 लाख रुपये आणि तुर्कीमध्ये 24 लाख रुपये आहे.
 • त्याचप्रमाणे 4 देश, स्वीडन, बेल्जियम, कोलंबिया आणि हंगेरी हे देखील 9 व्या स्थानावर आहेत. शिक्षकांवर तेवढाच विश्वास असूनही येथील शिक्षकांच्या पगारात मोठी तफावत आहे.
 • हंगेरीमध्ये शिक्षकांचे किमान सरासरी वार्षिक वेतन 13 लाख आहे, तर स्वीडनमध्ये ते 34 लाख आहे. कोलंबियामध्ये 17 लाख, तर बेल्जियममध्ये 32 लाख आहे.
 • OECD नुसार, शिक्षकांना सर्वाधिक पगार देणाऱ्या 10 देशांपैकी फक्त चार देश शिक्षकांवर अवलंबून असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये आहेत.
 • आश्चर्याची बाब म्हणजे या पॅरामीटरमध्ये यापैकी फक्त एक नेदरलँड भारताच्या बरोबरीत आहे. उर्वरित तीन स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका भारताच्या मागे आहेत.
 • OECD नुसार, शिक्षकांना सर्वाधिक पगार देणाऱ्या लक्झेंबर्गचा IPSOS सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, येथील शिक्षकांच्या कामगिरीवर बरेच संशोधन झाले आहे.
 • जानेवारी 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 3 वर्षांच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की 40% विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे शिक्षकांशी विशेष संबंध वाटत नाही. 11% विद्यार्थ्यांना शिक्षकांशी अजिबात संबंध वाटत नाही.

भारतातील 94% शिक्षकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याची भीती आहे... नॉर्वेमधील 12% शिक्षकांना नोकरी सोडण्याची इच्छा

 • युनेस्कोच्या अहवालानुसार, भारतातील शिक्षकांसाठी तणावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची नोकरी गमावण्याची भीती. 94% शिक्षकांनी असे म्हटले आहे की, ते यामुळे तणावाखाली आहेत.
 • याशिवाय 90% शिक्षक विद्यार्थ्यांच्या वाईट वागणुकीमुळे आणि 85% कमी नेतृत्वामुळे तणावाखाली आहेत.
 • त्याच वेळी, OECD अभ्यास दर्शवितो की, उच्च पगार असूनही, अनेक सदस्य देशांमध्ये शिक्षक नोकरी सोडू इच्छितात.
 • नॉर्वेमध्ये सर्वाधिक 12% शिक्षक म्हणतात की, त्यांना ही नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची आहे.

कोरोनाच्या कठीण काळात भारतीय शिक्षकांनी संपादीत केला विश्वास

 • IPSOS चे सर्वेक्षण 2020-21 दरम्यान करण्यात आले. यामध्ये 28 देशांतील IPSOS सदस्यांना सुमारे 30 विविध व्यावसायिकांची यादी दाखवण्यात आली.
 • लोकांना विचारण्यात आले की, यापैकी कोणते प्रोफाइल ते त्यांच्या देशात अधिक विश्वासार्ह मानतात आणि कोणते कमी विश्वासार्ह मानतात.
 • कोरोनाच्या काळातील परिणाम असा झाला की, लोकांनी सर्वात विश्वासू डॉक्टर आणि नंतर वैज्ञानिक मानले.
 • या दोन व्यावसायिकांनंतर तिसर्‍या क्रमांकावर शिक्षक हे सर्वाधिक भरवशाचे मानले जात होते. कोरोनाच्या काळात शिक्षकांनी ज्या पद्धतीने स्वत:ला बदलून ऑनलाइन शिक्षणात कामगिरी बजावली, त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला.
 • कोरोनाचा काळ हा शिक्षकांसाठीही सर्वात तणावाचा काळ होता. अमेरिकेतील कोरोनाच्या काळातील तणावामुळे आता 30% पेक्षा जास्त शिक्षकांनी नोकरी सोडली आहे किंवा ते सोडण्याच्या तयारीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...