आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शिक्षक दिन विशेष:सैन्याच्या पॅराशूटचे छत करून शाळा उघडली, अध्यापनाची आवड पाहून सैन्याने मदत केली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-पाकिस्तान सीमेवर शाळा चालवणारे शिक्षक लोबजंग जोटपा

लेहवरून / मोरूप स्टेनजिन
लडाखच्या नुब्रा व्हॅलीमधील डिस्किट हे दुर्गम गाव. मुलांसमोरील आव्हाने व समस्या पाहून बौद्ध भिख्खू लोबजंग जोटपा यांनी ४० वर्षांपूर्वी येथे एक शाळा सुरू केली. सैन्याच्या जुन्या पॅराशूटच्या छताखाली नऊ मुलांना शिकवण्यापासून या शाळेची सुरुवात केली. आज ही शाळा दरवर्षी सुमारे ३५० गरजू मुलांना शिक्षण देत आहे. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मुलांचे भविष्य या शाळेने घडवले आहे.
नोव्हेंबर १९८०मध्ये लेह येथील लामडन सोशल वेलफेअर सोसायटी स्कूलमध्ये हिंदी आणि बोधी भाषेचे शिक्षक लोबजंग जोटपा यांनी नुब्रा खोऱ्यात पहिली इंग्रजी माध्यमिक शाळा उघडण्याच्या संकल्प करून डिस्किट गाठले. त्यांनी आपले विचार गावकऱ्यांना सांगितले तेव्हा तेही उत्साहित झाले, परंतु शाळा सुरू करण्यासाठी तेथे जागा किंवा साधने नव्हती. पहिली मोठी मदत म्हणजे गावातील एका व्यक्तीने शाळेसाठी जमीन दिली. इमारतीच्या पैशासाठी लोबजंग घरोघरी गेले. काहींनी १० रुपये दिले, तर कोणी ५० रुपये. काहींनी लाकूड दान केले, तर काहींनी बांधकाम साहित्य. त्या वेळी गावात पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नव्हती. तर लोबजंग यांनी एका शेतकऱ्याकडून पाच उंट आणून त्यावर सामान लादून आणले. त्यांचे समर्पण पाहून सैन्य अधिकारी मदतीसाठी पुढे आले आणि सैन्याच्या ट्रकमध्ये सामान आणले. अशा प्रकारे १९८३ मध्ये दोन खोल्यांची शाळा बांधली गेली. हे डिस्किट भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या ७० कि.मी. अंतरावर आहे. सीमेवरील शेवटचे खेडे टुर्टुक आणि बोगडांगच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाचे हेच साधन आहे. आज शाळेत ८० गरजू विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगची सोय आहे.

लोबजंग म्हणतात की, ते येथे रिकाम्या हातांनी आले होते. सुरुवातीला सैन्याच्या जुन्या पॅराशूटचे छत केले आणि नऊ मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. सर्व पैसे शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यात खर्च झाले. दरवाजे, खिडक्या लावू शकलो नाही. त्यामुळे थंड वाऱ्यापासून संरक्षणासाठी त्यांच्यावर पॅराशूट घालावे लागले. पहिली तुकडी १९८३-८४मध्ये बाहेर पडली. अधिक विद्यार्थी शाळेत येऊ लागले तेव्हा सरकारने मदत केली व आम्हाला मोठ्या इमारतीसाठी आणि मैदानांसाठी जमीन दिली.

- जोटपांचा जन्म नुब्राच्या पनामिक गावात झाला. - ते वयाच्या १० व्या वर्षी बौद्ध भिख्खू झाले. बौद्ध संस्थेत मॅट्रिकपर्यंत शिकले. वाराणसीत तिबेटी शिक्षण संस्थेत धर्माध्ययन केले. - शिक्षणानंतर लेहला येऊन शिक्षक झाले. 3 वर्षे लेहमध्ये शिकवले. मग नुब्रामध्ये शाळा उघडण्यासाठी आले.