आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक दिन विशेष:कोरोना लसीची पहिली चाचणी करून घेणारे शिक्षक, 2 लाख मृत्यूंनी झोप उडाली होती, स्वत:वर केली लसीची चाचणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्याहून / मनीषा भल्ला
२६ एप्रिल २०२०. या दिवशी जगात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक झाली होती. फक्त १६ दिवसांत मरणाऱ्यांची संख्याही दुप्पट झाली होती. भारतात त्या दिवशी ४५ लोकांचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या या आकड्यांनी अस्वस्थ होणारे बंगालचे शिक्षक चिरंजीत धीबर यांच्या मनात चलबिचल झाली. ३० वर्षांचे हे शिक्षक त्या दिवसांत कोलकात्यापासून किमान २०० किमी दूर दुर्गापूर या आपल्या गावी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या १४,००० लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात व्यग्र होते. पण मृत्यूंचा आकडा बघून त्यांची झोप उडाली. दुसऱ्या दिवशी कोरोना लसीच्या चाचणीची बातमी वाचली. त्यांना वाटले, लस हा एकमेव उपचार आहे, ज्यामुळे मृत्यु रोखता येतील. मग मी यासाठी नक्की मदत करीन. त्यांनी त्याच दिवशी २७ एप्रिलला आयसीएमआर या लसीची मानवी चाचणी स्वत:वर करावी यासाठी निवेदन दिले. खरे तर हा निर्णय घेणे सोपे नव्हते. त्यांच्या आई-वडिलांसाठी हे भयानक आणि भीतिदायक होते.

त्यामुळे सुरुवातीला ते नाराज झाले, पण चिरंजीत यांनी त्यांची समजूत घातली. चिरंजीत यांचे वडील तपन कुमार दुर्गापूर स्टील प्लांटमध्ये सीनियर टेक्निशियन आहेत व आई प्रतिमा गृहिणी आहेत. २२ जुलैला चिरंजीतला ओडिशाच्या आयएमएस अँड एसयूएस हॉस्पिटलच्या प्रिव्हेन्शन अँड थेराप्युटिक क्लिनिकल ट्रायल युनिटच्या लॅबमध्ये चाचणी करण्यासाठीचा मेल मिळाला. २४ जुलैला ते लॅबमध्ये पोहोचले. पुढच्या चार-पाच दिवसांत त्यांच्या बऱ्याच चाचण्या करण्यात आल्या. चिरंजीत म्हणतात, मला ही चाचणी स्वत:वर करायची होती, कारण देशाची जबाबदारी पहिल्यांदा तरुणांनी घेतली पाहिजे.

शक्ती : सरकारी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम
इंग्रजी भाषेत पदव्युत्तर पदवीधारक असणारे चिरंजीत म्हणतात की, शिक्षकाचे आयुष्य हे मुलांना शिकवणे किंवा त्यांच्यात बदल करणे इतकेच मर्यादित नाही, विशेषत: प्राथमिक शिक्षकांचे. त्यांनी मुलांचे ऑडिओ आणि व्हिडिओ होण्याची गरज आहे. पण सर्व शाळांमध्ये या सुविधा उपलब्ध नाहीत. म्हणून मी माझ्या ट्रायपॉड आणि मोबाइलने हे काम करू शकतो. आमच्या शाळेने नवीन प्रयोग केला आहे, आम्ही मध्यान्ह भोजनासाठी शिजवल्या जाणाऱ्या भाज्यांचेही उत्पादन केले आहे आणि यामध्ये मुलांची मदत घेतो. शाळेत किचन गार्डन आहे. माझ्या वर्गात नाटके, ड्रॉइंग आणि खेळही खेळले जातात.