आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Tell This Clearly And Simply To The Children Who Have Lost Close Friends In Corona, Do Not Delay In Telling, Take Expert Advice On Changing The Behavior Of Children

कोरोनामध्ये जवळची व्यक्ती गमावल्यास:मुलांनी स्वतःला जबाबदार समजू नये, म्हणून त्यांना स्पष्ट आणि थेट शब्दांत सांगा; वर्तन बदलल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला. कोविड - 19 मुळे अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत, तर अनेक मुले अनाथ झाली आहेत. असे अनेक लोक आहेत ज्यांना सांभाळण्यासाठी कुटुंबातील एकही सदस्य आता या जगात राहिला नाही.

लॅन्सेटच्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे 1.19 लाख मुलांनी त्यांचे पालक किंवा त्यांची प्रायमरी केअर गिव्हर म्हणजे प्राथमिकरित्या मुलांची काळजी घेणारे गमावले आहेत. यापैकी 25,500 मुलांनी त्यांची आई गमावली, तर 90,751 मुलांनी त्यांचे वडील गमावले. त्याचप्रमाणे असे अनेक मुले आहे ज्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक गमावले आहेत.

मुले कोरोनामुळे घरांमध्ये बंद असताना मानसिक आरोग्याच्या समस्येशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत, बरेच पालक चिंतित आहेत की, आधीच अस्वस्थ असलेल्या आपल्या मुलाला त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, हे कसे सांगायचे?

मुलांशी स्पष्ट आणि थेट बोला
अमेरिकेची नॅशनल अलायन्स फॉर चिल्ड्रेन ग्रीफनुसार, मुलांना जेव्हा एखाद्याच्या निधनाबद्दल सांगायचे असल्यास त्यांना स्पष्ट आणि थेट सांगा. मुले गोंधळात पडतील अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलू नका. काय झाले आहे आणि आपण शोक का करीत आहोत हे त्यांना समजू द्या. एखाद्या व्यक्तीच्या शरीराने काम करणे थांबवले म्हणजेच त्याचा मृत्यू झाला, अशा पद्धतीने लहान मुलांना समजवून सांगायला हवे.

मानसशास्त्रज्ञ लिसा डामोरे यांनी युनिसेफशी केलेल्या संभाषणात म्हटले आहे की, मुलांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तील कायमचे गमावले आहे, हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु हे सांगताना मोठ्यांनी हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की, यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर फारसा परिणाम होणार नाही.

अशा प्रकारे मुलांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूबद्दल सांगा....

 • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्य मुलांपासून लपवू नये किंवा सत्य सांगण्यास विलंब करु नये.
 • जेव्हा तुम्ही मुलांना हे सांगाल तेव्हा त्यांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि त्यांना त्यांच्या दुःखावर मात करण्यास मदत होईल.
 • तुम्ही मुलांशी काय बोलाल आणि तुम्ही त्यांना कसे सांगाल याचा आधी विचार करा.
 • मुलांशी बोलण्यासाठी सुरक्षित आणि शांत ठिकाणी बसा.
 • जर लहान मुल त्याच्या खेळणी किंवा त्यासारख्या इतर कुठल्या वस्तूसोबत कम्फर्टेबल असेल तर ती गोष्ट ज्याच्याकडे ठेवण्यास सांगा.
 • मुलांशी हळू बोला आणि थोडावेळ थांबा जेणेकरून तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करत आहात हे त्याला समजेल.
 • जर तुम्ही मधूनमधून बोललात तर तुम्ही तुमच्या भावनांवरही नियंत्रण ठेवू शकाल.
 • हे सर्व ऐकल्यानंतर मुले देखील अनेक प्रश्न विचारतील, म्हणून तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असावे.
 • बऱ्याच वेळा अशा गोष्टी ऐकल्यानंतर मुले स्वतःला त्यासाठी जबाबदार मानू लागतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलाने त्याचे वडील गमावले असतील, तर त्याला असे वाटते की त्याने आपल्या वडिलांचे ऐकले नाही, म्हणून ते त्याला सोडून गेले. म्हणून, त्याच्याशी बोलत असताना, निश्चितपणे समजावून सांगा की यात कोणाचा तरी दोष आहे, विषाणूने त्याच्या वडिलांच्या शरीरावर हल्ला केला होता, ज्यामुळे त्यांना श्वास घेता येत नव्हता आणि त्यांचा मृत्यू झाला.

मुलांचे दुःख त्यांच्या विकासाच्या टप्प्यावर अवलंबून असते
अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनुसार, मुलांचे दुःख त्यांच्या विकासाच्या टप्प्यावर अवलंबून असते. म्हणजेच मुलाचे वय काय आहे, त्याची विचार करण्याची क्षमता किती आहे, त्याचे दु:ख या गोष्टींवर आधारित असते.

अमेरिकेतील ग्रीक समुपदेशन तज्ज्ञ मीन्स-थॉम्पसन म्हणतात की, ते मुलांचे वय, त्यांच्या मेंदूचा विकास, मृत्यूच्या अपरिवर्तनीय स्वरूपाची त्यांची समज यावर आधारित आहे. लहा मुल जसजसे त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जातो तसतसे त्याला दुःख नवीन आणि वेगळ्या प्रकारे समजते.

मेरीलँडमध्ये मुले आणि त्यांच्या दुःखावर काम करणा-या थेरपिस्ट लिंडा गोल्डमन सांगतात की, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की मुले प्रौढांपेक्षा वेगळ्या प्रकारे दुःख व्यक्त करतात. बऱ्याच वेळा मुले असे काही खेळ खेळताना दिसतात जे लोकांना खूप विचित्र वाटतील पण प्रत्यक्षात ते त्याद्वारे त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात.

निकटवर्तीयांच्या मृत्यूच्या दुःखामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही, यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा...

 • मुले ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतात किंवा ज्यांना आपले मानतात, त्यांनी मुलांची सतत काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे.
 • नवजात किंवा लहान मुलांना फिजिकल कॉन्टॅक्ट, कडलिंग, सिंगिंगच्या माध्यमातून सतत जाणवू द्या की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि त्याची काळजी घेता.
 • मुलांची दैनंदिन दिनचर्या राखण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, त्यांचा होमवर्क, व्यायाम, खेळण्याची वेळ पूर्वीप्रमाणे ठेवा.
 • जर मुलाच्या वागण्यात काही बदल झाला असेल तर त्याला शिक्षा देण्याऐवजी हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की तो त्याचे दुःख सांगू शकत नाही.
 • मुलांबरोबर खेळणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांनाही याबद्दल सांगा, जेणेकरून तेही मुलाला आधार देऊ शकतील, त्यांना समजून घेऊ शकतील.

नॅशनल अलायन्स फॉर चिल्ड्रन्स ग्रीफनुसार, जर जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर समजल्यानंतर मुलांच्या वागण्यात काही बदल जाणवला तर समजून घ्या की ते त्यांच्या दुःखातून सावरण्यास सक्षम
नाहीत, त्यांना तज्ज्ञाची गरज आहे...

बातम्या आणखी आहेत...