आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • The 132 Year Old Military Farm Service Supplying Milk To The Military Was Shut Down; Know Why The Indian Army Took This Decision

भास्कर एक्सप्लेनर:लष्कराला दूध पुरवठा करणारी 132 वर्षांची मिलिटरी फार्म सेवा बंद; जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सर्वप्रथम, जाणून घ्या लष्कराला हा निर्णय का घ्यावा लागला?

भारतीय लष्कराने 132 वर्षे जुने 130 मिलिटरी फार्म बंद केले आहेत. 31 मार्च रोजी ते बंद करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. तसेच दिल्ली छावणीत हे फार्म्स बंद करण्यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला. लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'देशाची 132 वर्षे उत्कृष्ट सेवा केल्यानंतर ही संघटना बंद केली जात आहे.'

सर्वप्रथम, जाणून घ्या लष्कराला हा निर्णय का घ्यावा लागला?

 • मिलिटरी फार्मची स्थापना ब्रिटीश काळात सुरू झाली. पहिले मिलिटरी फार्म अलाहाबाद येथे 1 फेब्रुवारी 1889 रोजी सुरु केले गेले. उद्देश स्पष्ट होता. लष्कराच्या छावण्या शहरांच्या बाहेरील भागात होत्या. तेथे दुधाचा पुरवठा करण्याचा सोपा मार्ग नव्हता. या कारणास्तव सैन्याने आपले मिलिटरी फार्म सुरु केले, जेणेकरून सैनिकांना ताजे आणि पौष्टिक दूध मिळू शकेल.
 • मागील वर्षापर्यंत, देशभरात 130 मिलिटरी फार्म्स कार्यरत होते. लेह आणि कारगिलसारख्या दुर्गम भागातही मिलिटरी फार्म कार्यरत होते. पण गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. विशेषतः
 • लष्करी छावण्या आता शहरांच्या अगदी जवळ आल्या आहेत. दूध पुरवठ्याबाबत आता चिंता राहिली नाही. कारण लष्कराला दूध पुरवठा करणा-या मिलिटरी फार्मचा वाटा फक्त 14% राहिला आहे. सीमेवर सैनिकांना पॅक्ड दूध पुरवले जाते.
 • यामागचे आणखी एक मोठे कारण म्हणजे यावर वार्षिक तब्बल 280 कोटी रुपये खर्च होत असे. हा खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सैन्य आपले लक्ष पूर्णपणे लढाऊ भूमिकांवर केंद्रित करू इच्छित आहे.
 • वास्तविक हा अचानक घेण्यात आलेला निर्णय नाही. 31 मार्च रोजी दिल्ली कॅन्टमध्ये झालेल्या डिसबँड प्रोग्रामच्या आधी 2013 मध्ये टप्प्याटप्प्याने मिलिटरी फार्म्स बंद करण्याची तयारी सुरू होती. हा निर्णय जून 2013 मध्ये क्वार्टर मास्टर जनरलच्या शाखेत घेण्यात आला.
 • जून 2014 मध्ये, उपसंचालक जनरल मिलिटरी फार्म यांनी ऑर्डर जारी केले की, दुध पुरवठ्याची जबाबदारी मिलिटरी फार्ममधून आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) कडे सोपवली जाईल. 2016 मध्ये, लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (सेवानिवृत्त) यांनी सैन्याच्या अनेक शाखांच्या पुनर्रचनेची शिफारस केली, ज्यात मिलिटरी फार्म्स बंद करण्याच्या सूचनेचा समावेश होता.
1989 मध्ये हे टपाल मिलिटरी फार्मच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने टपाल विभागाने जारी केले होते.
1989 मध्ये हे टपाल मिलिटरी फार्मच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने टपाल विभागाने जारी केले होते.

पहिला मिलिटरी फार्म कोणी आणि केव्हा तयार झाला होता?

 • लष्करी छावण्या शहरापासून दूर असल्याने दूध व दुधाचे पदार्थ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जेथे कॅन्टोन्मेंट परिसर आहे, अशा ठिकाणी मिलिटरी डेअरी फार्मची रचना केली होती. 1 फेब्रुवारी 1889 रोजी इंग्रजांनी अलाहाबादमध्ये पहिले लष्करी फार्म उघडले होते. यानंतर आवश्यकतेनुसार संपूर्ण देशात डेअरी फार्म उघडण्यास सुरुवात झाली. दिल्ली, जबलपूर, रानीखेत, जम्मू, श्रीनगर, लेह, कारगिल, झाशी, गुवाहाटी, सिकंदराबाद, लखनऊ, मेरठ, कानपूर, महू, दिमापूर, पठाणकोट, ग्वाल्हेर, जोरहाट, पानागढ़ यासारख्या 130० ठिकाणी असे लष्करी फार्म सुरु करण्यात आले. 1990 च्या दशकात लेह आणि कारगिलमध्येही लष्करी फार्म उघडण्यात आले.
 • दरवर्षी या फार्म्समधून 3.5 कोटी लीटर दूध आणि 25 हजार मेट्रिक टन चारा तयार होत होता. लष्कराच्या नोंदीनुसार, स्वातंत्र्याच्या काळात या फार्म्समध्ये जवळपास 30,000 गायी आणि इतर गुरे होती. 1971 चे युद्ध असो किंवा कारगिल युद्ध, या फार्ममधून सीमेवर तैनात जवानांना ताजे आणि पौष्टिक दूध पुरवले जात असे.

मिलिटरी फार्ममधील इतर जनावरे व कर्मचारी यांचे काय होईल?

 • लष्कराने शेतातील जनावरे सवलतीच्या दरात राज्य सरकारांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रॉस-ब्रीडिंग फ्रेझवाल गायींची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे, परंतु सैन्य त्यांना राज्य व केंद्रीय दूध उत्पादक केंद्रांवर एक हजार रुपयांना विकेल.
 • मिलिटरी फार्म बंद झाल्यानंतर येथे कार्यरत स्थायी कर्मचार्‍यांची मंत्रालयाच्या इतर विभागात बदली झाली आहे. ते सेवानिवृत्त होईपर्यंत त्या त्या विभागांत सेवा देतील. मिलिटरी फार्मती रिक्त​​​​​​​ असलेली जागा सैनिकांच्या राहण्या व इतर व्यवस्थेसाठी वापरली जाईल.
लष्कराने मिलिटरी फार्म्समधील जनावे राज्य आणि केंद्र सरकारच्या दूध उत्पादन केंद्रांना अनुदानित दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.
लष्कराने मिलिटरी फार्म्समधील जनावे राज्य आणि केंद्र सरकारच्या दूध उत्पादन केंद्रांना अनुदानित दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिलिटरी फार्ममध्ये आणखी इतर कामे होतात का?

 • तसे, मिलिटरी फार्म उभारण्याचा मुख्य उद्देश सैनिकांना फक्त दुध पुरवठा करण्यापुरता मर्यादित होता. परंतु नंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) सहकार्याने सैन्याने प्रोजेक्ट फ्रेझवाल​​​​​​​ सुरू केले. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी हॉलस्टेन फ्रेझियनचा सहिवाल गायींच्या संगोपनाचा हा कार्यक्रम होता.
 • 1991 मध्ये संरक्षण मंत्रालय आणि कृषी मंत्रालयानेही या संदर्भातील करारावर स्वाक्षरी केली होती. या प्रकल्पाचे उद्दिष्ट एक असे ब्रीड बनवणे होते, जे चार टक्के बटरफॅटसह 300 दिवसांसाठी 4 हजार किलोचे उत्पादन देईल. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या कॅटल क्रॉस-ब्रीडिंग प्रोग्रामपैकी एक मानला जातो. या फार्म्सने नंतर जैव-इंधन उत्पादनावर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) बरोबर काम केले.
बातम्या आणखी आहेत...