आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सकाळची वेळ. नामांकित मनाेविकार तज्ज्ञांच्या आेपीडीबाहेर एका १४ वर्षांच्या मुलाला पकडून त्याचे आई-वडील बसले होते. मुलगा भानावर नव्हता...”लेट जा जमीन पे...’, “छुप जा यार... मरवाएगा क्या..’ असे काहीतरी बडबडत होता. मध्येच चिडून हिंसक होत होता. मागील आठवड्यात “पब्जी’वर बंदी आणल्यानंतर त्या मुलाची ही अवस्था झाली. सध्या अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लॉकडाऊनच्या पाच महिन्यांच्या काळात अनेक किशोरवयीन मुले गेमिंगच्या जाळ्यात अडकली अन् एकदम यावर बंदी आल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे मनोविकार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पब्जी खेळणाऱ्यांमध्ये
मानसिक संतुलन बिघडण्याची कारणे
> मेंदूला सतत एकच एक क्रिया करण्याची सवय अन् यावर एकदम बंदी आल्याने अस्वस्थता वाढली
> गेम खेळताना व्हर्च्युअल जगातच मुले वावरू लागली
> कुटुंबातील संवाद हरवला
> मित्र, नातेवाइकांकडून मिळणारा आधार कमी झाला
> गेम खेळताना व्हर्च्युअल मैत्री होते, पण त्यांच्याकडून भावनिक आधार कधीही मिळत नाही.
आहारी गेल्याने झालेले दुष्परिणाम
>चिडचिडेपणा वाढला. दैनंदिन जगण्याची पद्धत बदलली
>मित्र, कुटुंब, नातेवाइर्क यांच्यापासून मुले दूर गेली
> दारू, चरस, गांजापेक्षा गेमिंगचे व्यसन भयंकर
> हिंसक स्वभाव वाढला, प्रसंगी आई-वडिलांनाही शिवीगाळ अन् टोकाचे भांडण
> रात्रभर जागरण केल्याने आरोग्याचे प्रश्न.
मित्र, कुटुंबीयांशी दुरावा वाढल्याचा परिणाम
गेमिंगमुळे मुलांमधील हिंसकपणा वाढत आहे. आठवडाभरात माझ्याकडे उपचारासाठी ६ प्रकरणे आली. पब्जीवर एकदम बंदी आणल्याने त्यांच्या स्वभावात प्रचंड बदल झाले. सांभाळून घेणारे मित्र, कुटुंबीय यांच्याशी संवाद नसल्याचे हे दुष्परिणाम आहेत. डॉ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ, औरंगाबाद.
काय करायला हवेत उपाय
> मुले मोबाइलमध्ये काय पाहत आहेत याकडे लक्ष द्यावे.
> मुलांना न रागवता त्यांच्या कलाने घेऊन इतर खेळांमध्ये त्यांची रुची वाढवावी.
> पालकांनी अधिकाधिक वेळ देऊन मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात.
> मार्निंग वॉक प्राणायाम, योगा अशा गोष्टींत मुलांना गुंतवावे
> कुटुंबासाठी इंटरनेट वापराची नियमावली बनवून त्यावर सगळ्यांनी अंमल करावा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.