आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे भावविश्वलग्नाच्या बहाण्याने प्रियकराने मुलीला काश्मीरला नेले:मुलाच्या काका-वडिलांनी बलात्कार केला, तक्रार केली तर अ‍ॅसिड हल्ला

अमनजोत कौर रामूवालिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी पंजाबमधील अमनजोत कौर रामुवालिया आहे. मला दोन गोष्टींमुळे ओळखले जाते... पहिली- मी परदेशात जंगलात, समुद्रात ज्या लोकांचे मृतदेह सापडतात त्यांना भारतात आणण्याचे काम करते. माझ्या कुटुंबासाठी हे काम धर्मासारखे आहे. गेल्या 40 वर्षांपासून आम्ही परदेशातून मृतदेह आणण्याचे काम करत आहोत. पूर्वी माझे वडील कारायचे आता मी 10 वर्षांपासून हे करत आहे.

दुसरे- अनेक वेळा एखाद्या मुलीला परदेशात कैद केले जाते. तिचे शोषण होते. नवीन लग्न झालेल्या स्त्रियाही माझ्याकडे येतात. त्यांच्या हातावरची मेहेंदी देखील उतरलेली नसते. पोटात मूल असून त्यांचे नवरे परदेशात पळून जातात. मी त्यांच्या हक्कांसाठी लढते आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते.

आज मी तुम्हाला अशाच 4 कहाणी सांगत आहे, ज्यांनी माझे हृदय आणि मन हेलावून टाकले...

पहिली कहाणी- सुमारे 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका तरुणाचा सौदी अरेबियात मृत्यू झाला. तो एका सिमेंट कारखान्यात ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा. काही कारणास्तव ट्रकमध्ये थोडीशी अडचण आल्याने तो वाकून ट्रकखाली पाहत होता आणि ट्रकमध्ये भरलेले सिमेंट त्याच्या अंगावर पडले. त्या सिमेंटमध्ये केमिकल मिसळले होते. यामुळे तो तरुण चांगलाच भाजला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही बातमी त्या तरुणाच्या पालकांना मिळताच ते इकडे तिकडे भटकत होते. कोणीतरी त्यांना माझ्याबद्दल सांगितले. तेव्हा ते माझ्याकडे आले आणि त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली.

नवदीप सुरी (भारतीय राजदूत) यांच्या मदतीने मी कसा तरी त्या तरुणाचा मृतदेह सौदी अरेबियातून दिल्लीला आणला. तो 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. अंत्यसंस्काराला जावे असे वाटले. दिल्लीहून लखनौला विमान पकडले.

ती लखनौ विमानतळावर उतरले तेव्हा मुलाचा मृतदेहही त्याच फ्लाइटमध्ये असल्याचे मला कळले. मृतदेह घेऊन त्याच्या गावी पोहोचलो तेव्हा तिथे तीन-चार गावातील लोक आमची वाट पाहत होते. मृतदेह गाडीतून बाहेर काढताच तिथे एकच शांतता पसरली.

मुलाचे घर खाजाचे होते. छतावरून खोलीत प्रकाश येत होता, कारण छत तुटलेल्या अवस्थेत होते. बैठकीच्या खोलीतच दोन लहान जनावरे बांधलेली होती. मी त्याच्या अंत्यसंस्कारातून परत आले, पण कित्येक महिने मला झोप येत नव्हती. यासाठी मला उपचार घेण्याची गरज भासली.

बरेच लोक मला प्रोत्साहन देतात. त्यांच्या या विश्वासामुळे आणि मदतीमुळेच मी हे काम करू शकत आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंजाब पोलिसांनी माझा सन्मान केला.
बरेच लोक मला प्रोत्साहन देतात. त्यांच्या या विश्वासामुळे आणि मदतीमुळेच मी हे काम करू शकत आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंजाब पोलिसांनी माझा सन्मान केला.

दुसरी कहाणी- काही महिन्यांपूर्वीची आहे. थायलंडमध्ये एका व्यक्तीची फसवणूक झाली. वैयक्तिक वैमनस्यातून काही लोकांनी त्याच्या खिशात बनावट आयडी टाकून त्याला पुलावरून ढकलून दिले. त्या व्यक्तीचे आई-वडील एवढंच म्हणायचे की, मॅडम, शेवटचा मुलाचा चेहरा दाखवा, पण मी काहीच करू शकत नव्हते. कारण जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा थायलंड सरकार मृतदेह किंवा राख त्यांच्या तब्येत ठेवते. मी त्या व्यक्तीच्या पालकांची हात जोडून माफी मागितली कारण मी त्यांना मदत करू शकत नव्हते.

मुलांच्या वाटेकडे पाहताना कधी कधी आई-वडिलांचे म्हातारे डोळे पाणावतात. त्यांचे मूल आता परत येणार नाही हे त्यांना कोणी समजवायचे? त्यांचा मुलगा या जगातून गेला. मी त्या मुलांचा मृतदेह घेऊन त्यांच्या गावी पोहोचते तेव्हा आई-वडिलांच्या शोकाने हृदय कासावीस होऊन जाते. तरुणांचे मृतदेह भारतात आणून मी दगडासामान झाले आहे.

तिसरी कहाणी - एजंटने त्याच्या मुलीला अंधाऱ्या खोलीत बंद केले. त्यानंतर एजंटने तिला एका शेखला विकले. दिवसा मुलगी शेखच्या घरची कामे करायची आणि रोज रात्री तिच्यावर बलात्कार होत असे. एक महिना, दोन महिने... असेच चालत गेले.

त्या शेखचा ड्रायव्हर पाकिस्तानी होता. दररोज तो त्या मुलीवर अत्याचार होताना पाहायचा. त्याने एके दिवशी मुलीला सांगितले की, तू माझ्या फोनवरून तुझ्या घरी फोन कर आणि संपूर्ण हकीकत सांग आणि येथून पळून जा. पाकिस्तानी ड्रायव्हरच्या फोनवरून मुलीने वडिलांना अमृतसरला बोलावले.

फोन वाजल्यावर मुलीचे वडील माझ्याकडे आले. मी तोच नंबर डायल केला ज्यावरून ती कॉल करत होती. ड्रायव्हर म्हणाला की, तो माझे त्या मुलीशी बोलणे करून देईल. मी मुलीला तिथला पत्ता मागितला, पण तिथे इंग्रजीत लिहिलेले काहीही नव्हते. एके दिवशी शेख कुटुंबीयांनी पाकिस्तानी रेस्टॉरंटमधून जेवण मागवले, त्यानंतर मुलीने मला उर्दूमध्ये लिहिलेला तिथला पत्ता पाठवला.

भारतीय दूतावास आणि माझी माणसे तिथे गेल्यावर पहिल्या दिवशी शेखच्या घरी मुलगी सापडली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गेलो तेव्हा पाकिस्तानी ड्रायव्हरने मुलीच्या ठिकाणाचा इशारा दिला. आम्ही त्या मुलीला शेखच्या तावडीतून सोडवले.

दुबईहून ती अनवाणी अमृतसरला पोहोचली. तिने मला अंगावरील जखमा दाखवल्या, काम केले नाही तर शेखची पत्नी तिला चटके द्यायची. शेख तिला मारहाण करायचा. 18 वर्षांच्या मुलीचे आयुष्य त्यांनी नार्कासामान करून ठेवले होते.

ती एका गरीब बापाची मुलगी होती आणि एकदम निरागस होती. एका मुलीला कोणतीही चूक न करता इतकी शिक्षा भोगावी लागत असतांना मला शांत झोप कशी येईल. त्या मुलीची एंगेजमेंट झाली होती, ती म्हणाली मॅडम माझे लग्न मोडेल आणि माझे वडील बरबाद होतील. या प्रकरणी आम्ही मौन बाळगले.

चौथी कहाणी- चंदीगडची एक मुलगी होती. तिचे वय 18 वर्षांच्या आसपास होते. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत काश्मीरला गेली. तेथे त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय त्याच्या वडिलांनी, काकाने इतकेच नाही तर मुलाच्या मित्रांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एका महिन्यानंतर मुलाने तिला चंदीगडला बसमध्ये बसवले.

कशीतरी मुलगी माझ्यापर्यंत पोहोचली. त्या मुलावर गुन्हा दाखल करायचा आहे असे ती मला म्हणाली. आम्ही याप्रकरणी तक्रार केली. एके दिवशी कोणीतरी मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकले. या प्रकरणानंतर अनेक महिने मी झोपू शकले नाही.

NRI मुले लग्न होताच मुलीच्या हातावरची मेहेंदी उतरत नाही तोवरच परदेशात जातात. नंतर या मुली गर्भवती राहतात. लहान मुलांसह मुली इकडे तिकडे भटकत राहतात. त्यांच्या सासरचे त्यांना घरात ठेवत नाहीत असे त्या सांगतात. शिवाय स्वतःचे आई-वडील शत्रू होतात.आई वडीलच मुलीच्या चारीत्यवर संशय घ्यायला लागतात.

समाज अशा महिलांकडे घाणेरड्या नजरेने पाहतो. अशा अनेक महिला मझ्याकडे मदतीसाठी येतात. माझ्या स्वतःच्या आयुष्यात अशी अनेक वादळे आली आहेत, पण या महिलांच्या वेदना मी देखील सहन करते.

माझे वडील बलवंत सिंह रामुवालिया केंद्रीय मंत्री राहिले आहेत. पूर्वी ते रात्र रात्रभर घरी नसायचे. आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही राहिले. जेव्हा मला, माझ्या भावाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या भावाला कॅनडामध्ये माझ्या मामाकडे पाठवले. लहान बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिल्यावर वडिलांनीही तिलाही कॅनडाला पाठवले.

तेव्हा मी पटियाला येथील पंजाब विद्यापीठात शिकत असे. मास्टर्स करत होते. मला मारण्यासाठी दहशतवादी विद्यापीठात आले. यामुळे मला शिक्षण सोडावे लागले. माझे लवकर लग्न झाले. लग्नासाठी माझी मानसिक तयारी नव्हती. माझी भावंडे लहानपणी माझ्यापासून दूर गेली. संपूर्ण आयुष्य घाबरत घालवले. आता कधीही एखादी वाईट बातमी असे नेहमी वाटत होते.

मला आठवते की, मी लहानपणी जेव्हा कधी रडत असे, तेव्हा माझी आई म्हणायची, गुरु गोविंद सिंहजींनी आपल्या मुलांचे बलिदान दिले आणि तू तुझ्या वडिलांचे बलिदान देऊ शकत नाही का? आईने असं बोलल्यावर मी शांत होऊन जात असे. मी माझ्या परिस्थितीतून शिकले आहे की संकट म्हणजे त्रास, त्या संकटातून आपण कसे बाहेर पडू हे महत्त्वाचे आहे. लग्नानंतरही चढ-उतार आले, पण त्यातून मार्ग काढला.

माझा असा विश्वास आहे की, महिलांचे लैंगिक शोषण झाले तरी त्यांचे जगणे थांबत नाही,लग्न तुटले तरीही जगणे थांबत नाही हे जग कोणासाठीच संपत नाही त्यामुळे आपले जीवन जागत राहा.

बातम्या आणखी आहेत...