आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Patel Said To The Farmers, The House Cannot Function Without Women And You Are Dreaming Of Such A Big Satyagraha.

बारडोलीतून देशाला मिळाले 'सरदार':पटेल शेतकऱ्यांना म्हणाले, स्त्रियांशिवाय घर चालत नाही आणि तुम्ही मोठ्या सत्याग्रहाचे स्वप्न पाहता

पंकज रमानी9 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

सर्वात आधी 97 वर्ष जुन्या 4 दृश्यांच्यातून समजून घ्या....

दृश्य क्रमांक 1 : तारीख 30 जून 1925. तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सुरत जिल्ह्यात तैनात असलेले भारतीय पीसीएस अधिकारी एमएस जयकर यांनी एक अहवाल सादर केला. ज्युनियर सेटलमेंट ऑफिसर म्हणून जयकर यांनी सूरतच्या बारडोली तालुक्यातील 23 गावांतील शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या करात एकरकमी 30.59% वाढ करण्याची शिफारस केली. आतापर्यंत या गावांमधून 5,14,762 रुपये कर वसूल केला जात होता. जयकर यांनी तो वाढवून 6,72,273 रुपये केला.

दृश्य क्रमांक 2 : जयकर यांच्या व्यतिरिक्त, सेटलमेंट आयुक्त FGR अँडरसन यांनी कर 29.03% ने वाढवण्याची शिफारस केली आहे. या वादाच्या दरम्यान, 19 जुलै 1927 रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सीने संपूर्ण सुरत तालुक्यासाठी कराच्या दरात 21.97% वाढ करण्याचा आदेश दिला. वसुलीही त्याच वर्षी सुरू झाली.

दृश्य क्रमांक 3 : अनेक संस्थांनी पुन्हा पुन्हा विनंती केल्या. 1927 मध्ये, स्थानिक कॉंग्रेसने एक अहवाल तयार केला आणि सांगितले की, शेतकरी हा भार सहन करू शकणार नाहीत. तरीही इंग्रज मान्य झाले नाहीत, तर शेतकरी महात्मा गांधींपर्यंत पोहोचले.

1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर निराश झालेल्या गांधींनी शेतकऱ्यांना सांगितले की ‘माझा एक वकील मित्र अहमदाबादमध्ये प्रॅक्टिस करतो. तोही खूप हुशार आहे. तेच तुमच्या सोबत येतील.’

वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीत इंग्रजांना झुकवले. इंग्रजांना कर कमी करावा लागला. दैनिक दिव्य मराठी नेटवर्कचे कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पटेल यांचे चित्रण केले आहे.
वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीत इंग्रजांना झुकवले. इंग्रजांना कर कमी करावा लागला. दैनिक दिव्य मराठी नेटवर्कचे कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पटेल यांचे चित्रण केले आहे.

दृश्य क्रमांक 4 : शेतकरी वल्लभभाई पटेल यांच्याकडे गेले. पटेल म्हणाले - दोनदा विचार करा. जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुम्ही अनेक वर्षे उभे राहू शकणार नाही. शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आणि 4 फेब्रुवारी 1928 रोजी पटेलांनी बारडोली येथे सभा घेऊन सत्याग्रहाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारी ही वाढीव कर भरण्याची तारीख होती. पटेल यांनी सत्याग्रहाच्या नियोजनाची पहिली बैठक रद्द केली. ते म्हणाले - 'स्त्रियांशिवाय घर चालत नाही आणि तुम्ही एवढा मोठा सत्याग्रह करण्याचे स्वप्न पाहत आहात.

आता आपण सध्याच्या परिस्थितीत परत जाऊया. मी बारडोलीत त्याच ठिकाणी उपस्थित आहे, जिथे पटेलांच्या एका छोट्याशा उपक्रमाने बारडोलीतील 137 गावांतील महिलांनाच नव्हे, तर देशाच्या निम्म्या लोकसंख्येला स्वातंत्र्यलढ्यात नेत्या बनवले. आज येथे सरदार पटेलांचा स्वराज आश्रम आहे.

वल्लभभाई पटेल यांनी स्वराज आश्रमाला केंद्रस्थानी बनवले आणि सहा महिन्यांतच अहिंसक जनआंदोलन उभे केले. ज्यामुळे ब्रिटिश सरकारला कर वाढीच्या मुद्द्यांसाठी मॅक्सवेल-ब्रूमफिल्ड आयोगाची स्थापना करावी लागली. बॉम्बे प्रेसिडेन्सीला बारडोलीमध्ये 21.97% कर वाढीऐवजी 6.03% कर वाढवर करावी लागली. वाढीव कर न भरल्याने जप्त केलेली घरे आणि जमीनही सत्याग्रही शेतकऱ्यांना परत करावी लागली.

बारडोली महिलांसाठी देखील एक आंदोलन होते. येथीच महिलांनीच पटेल यांना सरदार ही पदवी दिली. दैनिक दिव्य मराठी नेटवर्कची कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी तो प्रसंग चित्रित केला.
बारडोली महिलांसाठी देखील एक आंदोलन होते. येथीच महिलांनीच पटेल यांना सरदार ही पदवी दिली. दैनिक दिव्य मराठी नेटवर्कची कलाकार गौतम चक्रवर्ती यांनी तो प्रसंग चित्रित केला.

12 फेब्रुवारी 1928 रोजी सुरू झालेल्या या सत्याग्रहाचे पटेलांनी 6 ऑगस्ट 1928 पर्यंत यशस्वी आंदोलनात रूपांतर केले. या चळवळीदरम्यान, सत्याग्रही महिलांनी वल्लभभाई पटेलांना पगडी परिधान करुन 'सरदार' हे नाव दिले आणि देशाला एक शक्तिशाली जननेता मिळाला, ज्याने स्वातंत्र्यानंतर 550 हून अधिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले.

चला आजच्या स्वराज आश्रमाकडे परत जाऊया...

बारडोलीच्या स्वराज आश्रमात राहणाऱ्या निरंजनबेन यांना सत्याग्रहाच्या सर्व कहाण्या आठवतात. निरंजनबेन लहाणपणी सरदार पटेलांच्या मांडीवर खेळत असत.
बारडोलीच्या स्वराज आश्रमात राहणाऱ्या निरंजनबेन यांना सत्याग्रहाच्या सर्व कहाण्या आठवतात. निरंजनबेन लहाणपणी सरदार पटेलांच्या मांडीवर खेळत असत.

पांढरी साडी नेसलेल्या ८३ वर्षीय निरंजनाबेन उर्फ बल्लभआई रमेला आश्रमात अभिमानाने बसलेल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात आजही तीच चमक आहे जी त्यांना सरदार पटेल यांच्याकडून मिळाली होती. सरदार हा शब्द ऐकून तिच्या डोळ्यातील चमक वाढली आणि ती लहान मुलांसारखी बारडोली सत्याग्रहाच्या कथा सांगू लागली.

निरंजनबेन बारडोली सत्याग्रहात सामील झाल्या नसतील, पण त्यांचा जन्म आश्रमातच झाला होता. सरदार पटेल आणि त्यांची मुलगी मणिबेन यांच्या मांडीवर त्या खेळल्या आहेत.

लोखंडी झोपाळ्यावर बसलेल्या निरंजनाबेन सांगतात की, वल्लभभाईंनी शेतकऱ्यांशी घेतलेल्या पहिल्याच भेटीत आपला हेतू स्पष्ट केला होता. महिला आल्यानंतरच आपण पुढे जाऊ, असे पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले होते. स्त्रिया इंग्रजांशी कशा लढतील, असा प्रश्न शेतकर्‍यांनी विचारल्यावर त्यांनी सत्याग्रहात महिलांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगितले.

बारडोलीत प्रवेश करताच 'सरदार नगर' लिहिलेले दिसते. स्वराज आश्रमात पोहोचताच सर्वात आधी नजर जाते ती, शाळेत शिकणाऱ्या लहान मुलींवर. या स्वप्नाची बीजे पटेलांनीच बारडोलीत पेरली असावीत.

बारडोलीत एकही खुनाचा गुन्हा घडला नव्हता, म्हणून त्याला सत्याग्रहाचे केंद्र केले

12 फेब्रुवारी 1928 पासून सुमारे सहा महिने चाललेल्या सत्याग्रहाचे बारडोली हे केंद्र होते. 127 गावांतील शेकडो शेतकरी दररोज येथे येऊन रणनीती तयार करत असत.
12 फेब्रुवारी 1928 पासून सुमारे सहा महिने चाललेल्या सत्याग्रहाचे बारडोली हे केंद्र होते. 127 गावांतील शेकडो शेतकरी दररोज येथे येऊन रणनीती तयार करत असत.

निरंजनाबेन सांगतात की सरदार अहमदाबादहून आले आणि त्यांनी प्रथम बारडोली तालुक्यातील जवळची पोलिस स्टेशने पाहिली. सर्वत्र खुनाचे गुन्हे दाखल होते. बारडोली हे असे ठिकाण होते की, तेथील पोलिस ठाण्यात खुनाचा एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

फक्त याच कारणामुळे त्यांनी अहिंसक सत्याग्रहासाठी बारडोलीची निवड केली. पटेलांनी बारडोलीच्या आसपासच्या गावांमध्ये सत्याग्रही शिबिरेही आयोजित केली होती, परंतु सर्व शिबिरांचे मुख्यालय बारडोलीचा स्वराज आश्रम होता. येथे रोज बैठका होत होत्या. वल्लभभाईंनी येथे सत्याग्रहाची प्रत्येक रणनीती तयार केली होती.

त्यावेळी...

27 मे 1928: बारडोली येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन केले. यावेळी सत्याग्रही शेतकऱ्यांच्या मधोमध सरदार पटेल खुर्चीवर बसलेले दिसतात.
27 मे 1928: बारडोली येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन केले. यावेळी सत्याग्रही शेतकऱ्यांच्या मधोमध सरदार पटेल खुर्चीवर बसलेले दिसतात.

आता...

30 जुलै 2022: आज बारडोलीच्या त्याच ठिकाणी पटेलांचा स्वराज आश्रम आहे. येथे मुलींसाठी मोफत शाळा सुरू आहे. या आश्रमाच्या शाळेत दररोज शेकडो मुली शिक्षणासाठी येतात.
30 जुलै 2022: आज बारडोलीच्या त्याच ठिकाणी पटेलांचा स्वराज आश्रम आहे. येथे मुलींसाठी मोफत शाळा सुरू आहे. या आश्रमाच्या शाळेत दररोज शेकडो मुली शिक्षणासाठी येतात.

शेतकऱ्यासारख्या कपड्यात कार ऐवजी मोटारसायकलवरून गावोगावी फिरले

बारडोली येथे राहणारे इतिहासकार पी.डी. नायक स्पष्ट करतात, “पटेल हे उत्तम वकील होते पण त्याहूनही चांगले नेते होते. चळवळीसाठी त्यांनी शेतकऱ्यांप्रमाणे वेषभूषा धारण केली. कमी वेळेत जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहोचता यावे यासाठी त्यांनी कार ऐवजी मोटारसायकलची निवड केली. ते छोट्या होडीतून नदी पार करायचे आणि गरज पडेल तेव्हा बैलगाडीतून प्रवास करायचे.

बारडोलीच्या आंदोलनात शेतकरी सुरतच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जात होते. या जुन्या चित्रात त्यावेळच्या तीन चाकी मोटारीवर शेतकऱ्यांचा समूह बसलेला दिसत आहे.
बारडोलीच्या आंदोलनात शेतकरी सुरतच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जात होते. या जुन्या चित्रात त्यावेळच्या तीन चाकी मोटारीवर शेतकऱ्यांचा समूह बसलेला दिसत आहे.

जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी पथक आले की शेतकरी जंगलात पळून जायचे

बारडोलीच्या लोकांना सत्याग्रहाशी संबंधित कथाही आठवतात. इथेच राजेश वाघ एक किस्सा सांगतात, “सत्याग्रहादरम्यान पटेलांनी शेतकऱ्यांना कर न देण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरादाखल ब्रिटीश सरकार अशा शेतकऱ्यांची घरे, शेतमाल, जमीन जप्त करण्यासाठी पथके पाठवत असे. ढोल-ताशे वाजवत हे पथक पोहोचायचे. अशा परिस्थितीत पटेल यांनी शेतकर्‍यांना सांगितले की, जेव्हा जेव्हा सरकारी पथक गावात येईल तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या जंगलात लपून राहावे. लोक गावात राहत नसल्याने पथके कारवाई न करताच परत जात असत.

आता जाणून घ्या, कर वाढवण्याची शिफारस करणारे PCS अधिकारी एमएस जयकर यांचे 6 अनोखे आधार

 • 1896 मध्ये ताप्ती नदीच्या खोऱ्यात रेल्वे लाईन टाकण्यात आल्याने आणि बारडोली-सुपा रस्त्याच्या बांधकामामुळे परिसरात गुरे व बैलगाड्यांची संख्या वाढली.
 • गावकऱ्यांनी बाहेरून मागवलेले तांदूळ आणि शुद्ध पांढरी साखर वापरण्यास सुरुवात केली आहे.
 • 23 गावांमध्ये पक्क्या घरांची संख्या वाढली होती, याचा अर्थ शेतकरी पूर्वीपेक्षा अधिक सुखी झाला आहे.
 • 23 गावांची लोकसंख्याही वाढली आहे, म्हणजे लोकांकडे पुरेशी संसाधने आहेत.
 • परिसरातील बाजारपेठेतील शेतमालाचे भाव आणि गावागावातील जमिनीही वाढल्या आहेत.
 • परिसरात राहणाऱ्या कालीपराज समाजाची स्थितीही सुधारली आहे. कालीपराजमधील बहुतेक लोक म्हणजे काळसर कातडीचे लोक भूमिहीन मजूर होते आणि कर्जबाजारी होते.

जयकरांच्या 6 कारणाविरोधात बारडोलीतील शेतकऱ्यांची 6 उत्तरे-

 • बारडोलीने यापूर्वीच रेल्वे आणि रस्त्याच्या फायद्यांच्या बदल्यात भरपूर कर भरला आहे.
 • पक्की घरे आणि शुद्ध साखरेचा वापर केल्याने शेतकऱ्यांवरील सावकारांचे कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
 • लोकसंख्या केवळ 5 गावांची वाढली आहे. तेही त्या गावात जास्त व्यवसाय केला जातो. म्हणजेच जिथे दुकाने आहेत, त्याला गाव म्हणता येणार नाही. आजच्या भाषेत आपण त्याला कस्बा म्हणू शकतो.
 • शेतीतील घटत्या उत्पन्नाची भरपाई करण्यासाठी लोकांनी दुभती जनावरे पाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. हे सुखाचे लक्षण नाही.
 • याउलट बैलासारख्या शेतीत वापरल्या जाणाऱ्या गुरांची संख्या घटली आहे.
 • रिपोर्टमध्ये धान्याच्या वाढलेल्या किमती 1914 ते 1923 दरम्यानच्या आहेत. हे वर्ष पहिल्या महायुद्धामुळे आणि पूर आणि दुष्काळामुळे सामान्य नव्हते. त्या दिवसांत जास्त मागणी आणि कमी उत्पन्न यामुळे भाव वाढले होते.

तेव्हाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी 575 चौरस किलोमीटरमध्ये तीन नद्यांच्या जवळ वसलेल्या बारडोलीची माहिती जाणून घ्या

प्रारंभी सत्याग्रहात सहभागी होण्यास नकार देणारे महात्मा गांधी 2 ऑगस्ट 1928 रोजी बारडोलीला पोहोचले. या दरम्यान त्यांनी सरदार पटेल यांच्यासोबत सत्याग्रहात भाग घेतला.
प्रारंभी सत्याग्रहात सहभागी होण्यास नकार देणारे महात्मा गांधी 2 ऑगस्ट 1928 रोजी बारडोलीला पोहोचले. या दरम्यान त्यांनी सरदार पटेल यांच्यासोबत सत्याग्रहात भाग घेतला.

बारडोली तालुक्यात तेव्हा 137 गावे होती. ताप्ती, पूर्णा आणि मिंडोला या तीन प्रमुख नद्या सुमारे 575 चौरस किलोमीटर क्षेत्रातून वाहतात. त्यावेळी या परिसरात 87 हजारांहून अधिक लोक स्थायिक झाले होते, त्यापैकी बहुतांश शेतकरी होते.

1920 पूर्वी, परिसरातील सुमारे 90% शेतकरी कापसाची शेती करत असत. इंग्रज त्यांच्या लाखो कापड गिरण्यांसाठी मँचेस्टरला हा कापूस पाठवत होते. मँचेस्टरमधील कापसाची भूक या वस्तुस्थितीवरून लावता येते की, पहिल्या महायुद्धापर्यंत मँचेस्टरमध्ये दरवर्षी 700 दशलक्ष मीटर कापड तयार केला जात होता.

त्यासाठी इंग्रजांनी दोन गोष्टी केल्या. पहिला- बारडोली-सुपा रस्ता बांधला आणि दुसरा- ताप्तीची ही दरी रेल्वेने जोडली. त्यामुळे शेतकऱ्याला बारडोली व नवसारी येथील बाजारपेठेत सहज प्रवेश मिळाला.

परिणामी 1894 पर्यंत 25 हजार एकर जमिनीवर कापसाची लागवड होत होती, ती 1923-24 पर्यंत 40,099 एकर इतकी वाढली. याउलट ज्वारीसारख्या पिकांचे क्षेत्र 27,554 एकरांवरून 18,642 एकरांवर आले.

बारडोलीतून इंग्लंडपर्यंत पोहोचली घोषणा - 'बारडोली इज इंडिया'

बारडोली आश्रमात राहणाऱ्या कलार्ती सांगतात की, सरदार पटेलांच्या सत्याग्रहाच्या चौथ्या महिन्यात बारडोलीतील एका महिलेने सभेत सांगितले होते की, आजपासून तुम्ही आमचे 'सरदार' आहात. येथून वल्लभभाई पटेल यांच्या नावासोबत सरदार पदवी जोडली गेली. लोक त्यांना सरदार पटेल म्हणू लागले. या सत्याग्रहातूनच 'बारडोली इज इंडिया' ही घोषणा इंग्लंडमध्ये पोहोचली.

इतिहासकार पी.डी. नायक सांगतात की सरदार पटेल यांना स्त्रीशक्तीचे महत्त्व चांगलेच माहिती होते. इंग्रजांना स्त्रियांवर हिंसक कारवाया करता आल्या नाहीत. त्यामुळे सरदारांनी महिलांना सत्याग्रहात सामील करून घेतले. हळूहळू लोकांच्या मनातील भीती नाहीशी झाली आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध शांततेत यशस्वीपणे लढा दिला.

बारडोलीचा स्वराज आश्रम आणि हे शहर आजही 'सरदार' यांचेच

स्वराज आश्रमात पोहोचलो तेव्हा कळले की, पटेल हे पर्यावरणवादीही होते. त्यांनी आश्रमात स्वतःच्या हाताने कडुलिंब, आंबा आणि चिकूची अनेक झाडे लावली जी, आजही येथे आहेत. पटेल यांची मुलगी मणिबेन हिने लहान मुलांसाठी बाल मंदिर सुरू केले जेथे मोफत शिक्षण दिले जाते. याशिवाय मुलींची शाळा आणि वसतिगृह देखील आहे, जिथे विद्यार्थिनींना गांधीवादी विचारांचे मोफत शिक्षण दिले जाते. बारडोली सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी आश्रमाजवळ एक संग्रहालयही आहे. संग्रहालयाचे सहायक व्यवस्थापक रतनजी पटेल यांनी सांगितले की, या संग्रहालयात सरदार पटेल यांच्या इतिहासाशी संबंधित 562 कृष्णधवल छायाचित्रे आहेत.

अखेरीस बारडोली सत्याग्रहाचा तारखेनुसार घटनाक्रम वाचा...

बातम्या आणखी आहेत...