आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Case Is So Strong That Sonia Rahul Will Go To Jail, There Were Some People In BJP Who Wanted To Save Them.

दिव्य मराठी इंटरव्ह्यूनॅशनल हेराल्ड प्रकरण माझ्यामुळे उघड:स्वामी म्हणाले- सोनिया-राहुल आता तुरुंगात जातील, भाजप नेत्यांवरही टीका

वैभव पळणिटकर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनिया गांधी आणि राहुल यांची चौकशी आणि आता नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात छापेमारी. हे प्रकरण नॅशनल हेराल्ड मधील मनी लाँड्रिंगचे आहे. हे प्रकरण सर्वात आधी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी समोर आणले होते, म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो.

आता स्वामींनी दावा केला आहे की, आता ते म्हणजेच सोनिया आणि राहुल तुरुंगात जाणार आहेत. स्वामी भाजपच्या काही लोकांवर देखील नाराज दिसले. भाजपच्या काही लोकांनी सोनिया-राहुल यांना वाचवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नॅशनल हेराल्ड हाऊस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भ्रष्टाचार झाल्याचे संपूर्ण पुरावे आहेत.

स्वामी पक्षाच्या प्रवक्त्यांवरही नाराज होते. ते म्हणाले- 'हे सर्व भाजपने केल्याचे प्रवक्ते आता सांगत आहेत. मात्र, मी जेव्हा या प्रकरणावर मेहनत करत होतो, तेव्हा ते आराम करत होते'.

थेट प्रश्नांकडे जाऊया...

प्रश्नः नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया-राहुल यांची ED चौकशी आणि आता नॅशनल हेराल्डच्या 10 हून अधिक ठिकाणी छापे, तपास सध्या योग्य सुरू आहे का?

उत्तर: होय, तपास योग्य दिशेने सुरू आहे. सोनिया आणि राहुल यांनी चौकशीत आम्हाला काहीच माहीत नाही एवढेच सांगितले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा दोष मोतीलाल व्होरा यांना दिला.मात्र ते आता या जगात नाहीत. ED सध्या योग्य मार्गावर आहे, कारण या प्रकरणात कागदपत्रे सर्वात महत्त्वाची आहेत.

त्यांच्या मते, असोसिएट जर्नल लिमिटेड (AJL) वर 90 कोटी रुपयांचे कर्ज होते मात्र एकही रुपयाचे कर्ज नसल्याचे म्हटले जाते.यावरून त्यांनी या कंपनीबद्दल दिलेली ही माहिती निम्मित असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी ही कंपनी यंग इंडियाला अवघ्या 50 लाख रुपयांना विकली. नॅशनल हेराल्ड हाऊस इमारतीचा चौथा मजला या प्रकरणाच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्याने भरलेला आहे.

प्रश्‍न: हा घोटाळा नेमका आहे काय? नॅशनल हेराल्डने काय केले आहे? तुम्हाला या प्रकारणाची संपूर्ण माहिती आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता का?

उत्तरः सोनिया आणि राहुल यांनी प्रथम 5 लाख भाग भांडवलावर यंग इंडिया लिमिटेड (YIL) नावाची कंपनी स्थापन केली. यानंतर, त्यांनी असोसिएट जर्नल लिमिटेड (AJL ) ही काँग्रेसची 90 कोटींचे कर्ज असलेली कंपनी केवळ 50 लाखांना विकत घेतली. त्यांनी कंपनी विकत घेताना दावा केला होता, एजेएलमध्ये फक्त कर्ज असूनही आम्ही 50 लाख देऊन ती खरेदी करत आहोत. अशाप्रकारे एजेएलचे बहुतांश शेअर राहुल आणि सोनिया यांच्याच्या नावावर झाले.

हाच घोटाळा आहे-90 कोटींचे कर्ज मुळातच नव्हते. 90 कोटी कर्ज असते तर काँग्रेसला नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेचा लिलाव करता आला असता आणि 2500 कोटी सहज मिळाले असते. मात्र लिलाव झाला असता तर ही रक्कम कर्जदार आणि एजेएलकडे गेली असती. त्यांनी केवळ 50 लाख देऊन एवढी मोठी कंपनी आपल्या नावावर केली. ही मनी लाँड्रिंग कंपनी आहे हे सर्वांनाच माहीत असून सोनिया आणि राहुल यांनी ही रक्कम परदेशी चलनाच्या रूपात आणली असावी आणि त्यांना ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केली असावी असे हे प्रकरण आहे.

प्रश्नः सोशल मीडियावर एक विनोद करण्यात येत आहे की सोनिया आणि राहुल गांधी यांच्या स्वप्नात सुब्रमण्यम स्वामी दिसतात?

उत्तरः हा हा हा. ज्यांनी भ्रष्टाचार करून देशाचा विश्वासघात केला. लोकांनी मते देऊन तुम्हाला सत्ता दिली आणि तुम्ही असे केले.

प्रश्‍न: तुम्ही 2013 पासून या प्रकरणाचा तपास सुरू केला. 2022 मध्ये हे प्रकरण केवळ चौकशी आणि छाप्यांपर्यंत पोहोचले आहे, कारवाईला इतका वेळ का लागला?

उत्तर: हे काही नवीन नाही. या प्रकरणात घोटाळा झाल्याचे आम्ही न्यायालयात सिद्ध केले आहे. आम्ही त्यांचे 4 मोठे गुन्हे समोर आणले. त्यानंतर त्यांना जामीन घ्यावा लागला. ते प्रत्येक प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेत असत. मात्र माझ्या मते, यावेळेस या प्रकरणात सर्वात कमी कालावधी लागला आहे.

प्रश्नः जर तुम्हाला नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीला मदत करायची असेल, तर प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण व्हावा यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?

उत्तरः मी ईडीशी बोललो आहे आणि मी या प्रकरणाची संपूर्ण तक्रार ईडीकडे केली होती. ईडीचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.

प्रश्‍न: हे प्रकरण आता पुढे काय वळण घेणार?

उत्तर: ते म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी तुरुंगात जातील. त्यांना आधी तुरुंगात ठेवले जाईल, नंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. युक्तिवादानंतर मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) शिक्षा सुनावली जाईल.

प्रश्नः ज्या दिवशी सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, त्या दिवशी काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. राहुल गांधींनी या प्रकरणाला हुकूमशाही म्हटले. सरकारला महागाई आणि आर्थिक गैरव्यवस्थापनावरून लक्ष हटवायचे आहे, असे लोकांचे म्हणणे आहे

उत्तरः ते गुन्हेगार आहेत.

प्रश्‍न: गुन्हा सिद्ध झाल्यास ते गुन्हेगार असतील सध्या तर ते आरोपीच आहेत ना?

उत्तरः माझ्या दृष्टीने ते गुन्हेगार आहेत. सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतरच मी तक्रार केली आहे आणि मी एक एक पॉल पुढे जात आहे. अरुण जेटलींमुळे थोडा उशीर झाला. आमच्या पक्षातही काही लोक होते ज्यांना राहुल-सोनिया यांना वाचवायचे होते, पण मी ही लढाई एकट्याने लढली आहे. माझ्या विनंतीवरून या प्रकरणात ईडी आणि आयकर विभाग सामील झाले. भाजपने हे कृत्य केल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. जेव्हा मी सर्व कष्ट करत होतो तेव्हा ते आराम करत होते.

प्रश्न: हा राहुल आणि सोनिया गांधींचा भ्रष्टाचार आहे, तो तुम्हाला लोकांमध्ये सिद्ध करायचा असल्यास… तुम्ही तो कसा करणार?

उत्तरः मी न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे त्यात सर्व पुरावे आहेत. न्यायालयाने त्यांना कठड्यात उभे केले आणि जामिनावर सोडले, यापेक्षा दुसऱ्या पुराव्याची काय गरज आहे.आता न्यायालयात या प्रकरणाला सिद्ध करायचे आहे. आता केवळ त्यांना शिक्षा व्हायची राहिली आहे. माझ्याकडे पुरावे नसते तर हे प्रकरण इथपर्यंत पोहोचले नसते.

प्रश्नः राहुल आणि सोनिया गांधी जर आता तुमच्याकडून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आले तर तुम्ही काय म्हणाल? कायदेशीर आणि राजकीय दोन्ही बाजूंनी सांगा.

उत्तरः ते कधीच येणार नाहीत. मी त्यांना कधीच येऊ देणार नाही.

प्रश्‍न: लोक म्हणत आहेत की सरकार विरोधी पक्षनेत्यांकडेच ED ला पाठवत आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचार होत नाही का?

उत्तर: विरोधकांनी काही चूक केली तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही का? यामध्ये सरकारचा हात नसून मी याबद्दल तक्रार केली त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागली. अन्यथा मी न्यालयात गेलो असतो.

प्रश्न: पंतप्रधानांशी चर्चा होते का? शेवटचे संभाषण कधी आणि कोणत्या मुद्द्यावर झाले?

उत्तर: ही माझी आणि पंतप्रधानांमधली बाब आहे.

प्रश्‍न: तुम्हीच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकता का?

उत्तर: तसं काही नाही. मी अजूनही भाजपचा कार्यकर्ता आहे, पक्षाचे लोक मला भेटायला येतात. पक्षांतही लोकशाही आहे. यापूर्वी काँग्रेसमध्येही नेहरूंच्या चीनबाबतच्या धोरणांवर इतर नेत्यांनी टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...