आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Cemetery In Bhatpura Is Like A Garden, A Study Of Rs 4 Lakh Has Been Set Up Through Public Participation

मंडे पॉझिटिव्ह:भाटपुऱ्यातील स्मशानभूमी जणू बगिचाच, लोकसहभागातून उभारली 4 लाखांची अभ्यासिका

विकास पाटील | जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धुळ्यातील भाटपुरा गावात जिम्नॅशियम, सर्व 950 कुटुंबांना शासनाच्या योजनेचा लाभ

धुळे जिल्ह्यातील भाटपुरा हे ९५० कुटुंबे असलेले एक छोटेसे गाव. अज्ञान, गरिबीमुळे शासनाच्या योजनांपासून लांब होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या गावातील सर्व कुटुंबांना शासनाच्या किमान एका तरी योजनेचा लाभ मिळाला असून त्यांचे जीवनमान सुधारले आहेे. या गावातील स्मशानभूमी जणू बगीचाच आहे. ११०० वृक्ष जगवल्याने संपूर्ण परिसर हिरवागार बनला आहे. मोठ्या शहरांप्रमाणे या गावातच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ४ लाखांची अद्ययावत अभ्यासिका तसेच जिम्नॅशियम उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायतचे कार्यालय जणू कॉर्पोरेट ऑफिसच. मोफत वायफाय, जॉगिंग ट्रॅक, वॉटर एटीएम एवढेच काय तर या गावात फायर स्टेशनही आहे. संपूर्ण गावात एलईडी स्ट्रीट लाइट अशा एक ना अनेक सुविधा असल्याने राज्यातील आदर्श गावांच्या रांगेत जाऊन बसले आहे.

शैलेश चौधरी नावाचा एक उत्साही तरुण गावचा सरपंच झाला व त्याने पाच वर्षांत जणू विकासयात्रा आणली. एका आमदाराला पाच वर्षांत दहा कोटींचा निधी मिळतो, मात्र या एकट्या गावात विविध शासकीय याेजनांच्या माध्यमातून आठ कोटींचा निधी आला.

अद्ययावत सामग्रीसह जिम्नॅशियम, महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक

शहरात जसे अद्ययावत साधन सामग्री असलेले जिम्नॅशियम असते तसेच या छोट्याशा गावात जिम्नॅशियम आहे. प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षकही आहे. त्याला लागूनच एक जॉगिंग ट्रॅकही आहे. केवळ तरुणच नव्हे तर महिलाही या जॉगिंग ट्रॅकचा वापर शतपावली करण्यासाठी करतात.

सर्वांच्या सहकार्यानेच विकास शक्य

माजी मंत्री अमरिश पटेल यांची साथ, आमदार काशीराम पावरा यांचे मार्गदर्शन, प्रकाश पाटील व गावातील सर्व ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा, बाहेरगावी स्थिरावलेल्या भूमिपुत्रांची मदत, प्रत्येक गावकरी ,ग्रा. पं. सदस्यांच्या एकोप्यामुळे गावाचा विकास करणे शक्य झाले. - शैलेश चौधरी, माजी सरपंच, भाटपुरा.

बातम्या आणखी आहेत...