आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हगांधी टोपीमुळे थांबले असहकार आंदोलन:चौरी-चौरामध्ये देणगीतून उभारले 19 हुतात्म्यांचे स्मारक

उत्कर्ष श्रीवास्तव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत... या मालिकेची चौथी कथा...

10 फेब्रुवारी 1922 रोजी गुजरातच्या बारडोली तालुक्यात महात्मा गांधी सकाळच्या प्रार्थनेनंतर कोपऱ्यात शांत बसले होते. नेहरू तुरुंगात होते आणि पटेलांसह उर्वरित कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा एकच मुद्दा होता - 4 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशच्या चौरी-चौरा येथील घटना. याच घटनेत संतप्त जमावाने 22 पोलिसांना जिवंत जाळले होते.

तेव्हा असहकार आंदोलन महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले होते आणि आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता. गांधीजी अचानक उठले आणि त्यांनी ही चळवळ संपवण्याचा प्रस्ताव मांडला. काही कार्यकर्ते शांत राहिले, परंतु बहुतेकांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर गांधीजी शांत झाले, पण दोन दिवसांनी म्हणजे 12 फेब्रुवारीला त्यांनी असहकार आंदोलन मागे घेत 5 दिवसांचे उपोषण केले.

खरे तर चौरी-चौरा हा पहिल्यापासूनच वादात सापडला आहे. गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले तेव्हा त्यांच्या या निर्णयावर सुभाषचंद्र बोस, मोतीलाल नेहरू, सीआर दास आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी जोरदार टीका केली होती. आता 100 वर्षांनंतर चौरी-चौरा येथील हुतात्मा स्मारकामुळे वाद होतोय.

तेव्हा वाद काय होता आणि आता वादाचे कारण काय, हे तर आपण पाहणार आहोतच मात्र, त्या आधी मी तुम्हाला चौरी-चौरा घटना घडलेल्या ठिकाणी घेऊन जातो…

हे तेच पोलीस ठाणे आहे, जिथे 100 वर्षांपूर्वी 4 फेब्रुवारी 1922 रोजी संतप्त जमावाने 22 पोलिसांना जिवंत जाळले होते.
हे तेच पोलीस ठाणे आहे, जिथे 100 वर्षांपूर्वी 4 फेब्रुवारी 1922 रोजी संतप्त जमावाने 22 पोलिसांना जिवंत जाळले होते.

शहीद स्मारक आणि समाधी स्थळ यांना वेगळे करतो रेल्वे रुळ

जेव्हा मी गोरखपूर शहरापासून 26 किमी अंतरावर असलेल्या चौरी-चौरा येथे पोहोचतो तेव्हा मला ते पोलिस स्टेशन दिसते ज्यामध्ये लपून बसलेल्या 22 पोलिसांना जमावाने जिवंत जाळले होते. 1857 मध्ये सुरू झालेले हे पोलिस ठाणे आज सामान्य पोलिस ठाण्यासारखेच आहे. जप्त केलेली वाहने प्रांगणात उभी आहेत, तक्रारदारांची ये-जा सुरूच असते.

आजही पोलिस ठाण्याच्या जुन्या भागात 100 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांचे समाधी स्थळ आहे. ते 1924 मध्येच ब्रिटिशांनी बांधले होते. यापासून थोड्या अंतरावर चौरी-चौरा येथील हुतात्म्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.

या पोलिसांच्या समाधी स्थळाच्या आणि हुतात्मा स्मारकाच्या मधून रेल्वे ट्रॅक जातो. जणू यामुळे या दोन्ही ठिकाणची विभागणी करण्यात आली आहे. हा तोच ट्रॅक आहेत जिथे पोलिसांनी क्रांतिकारकांवर गोळीबार केला होता आणि त्यानंतर हिंसाचार उसळला होता. रेल्वे आजही या ट्रॅकचा वापर करते.

वास्तविक पाहता चौरी-चौरा ही दोन वेगळी गावे होती. एका रेल्वे वाहतूक व्यवस्थापकाने या गावांना एकत्र नाव दिले आणि जानेवारी 1885 मध्ये रेल्वे स्टेशन सुरू केले. सुरुवातीला रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गोदामाचे नाव फक्त चौरी-चौरा असे होते.

रूळ ओलांडून शहीद स्मारकाचा टॉवर गोरखपूर जिल्ह्यातील लोकांनी घटनेच्या 51 वर्षांनंतर 1973 मध्ये देणगी गोळा करून बांधला होता. 12.2 मीटर उंच मिनार 13,500 रुपये खर्चून बांधण्यात आला. त्याच्या दोन्ही बाजूला एक हुतात्मा फासावर लटकलेला दाखवण्यात आलेला होता. यात नंतर बदल करण्यात आला. याची देखभाल चौरी-चौरा हुतात्मा स्मारक समिती करते.

60 वर्षांनंतर इंदिरा सरकारला झाली आठवण

इंग्रजांनी 1924 मध्येच मारल्या गेलेल्या पोलिसांसाठी समाधी बांधली होती, पण इंदिरा गांधींनी 1982 मध्ये हुतात्म्यांचे स्मारक बांधले. या स्मारकावर सर्व 19 हुतात्म्यांची नावे लिहिली आहेत.
इंग्रजांनी 1924 मध्येच मारल्या गेलेल्या पोलिसांसाठी समाधी बांधली होती, पण इंदिरा गांधींनी 1982 मध्ये हुतात्म्यांचे स्मारक बांधले. या स्मारकावर सर्व 19 हुतात्म्यांची नावे लिहिली आहेत.

चौरी-चौरा घटनेच्या 60 वर्षांनंतर 1982 मध्ये इंदिरा गांधींनी हुतात्म्यांचे नवीन स्मारक बांधले. चौरी-चौरा घटना आणि स्वातंत्र्य चळवळीच्या माहितीसाठी स्मारकाच्या शेजारी एक वाचनालय आणि संग्रहालय देखील बांधले गेले. 1990 मध्ये शहीदांच्या सन्मानार्थ रेल्वेने एक ट्रेन सुरू केली आणि तीला नाव दिले - चौरी-चौरा एक्सप्रेस, जी गोरखपूर ते कानपूरपर्यंत धावते. 1993 मध्ये पीएम नरसिंह राव यांनी येथील संग्रहालयाचे उद्घाटन केले.

चौरी-चौरा येथे हिंसाचार भडकण्याची तीन महत्त्वाची कारणे

1. मुंडेरी बाजाराचे मालक संत बक्ष: चौरी-चौरा घटनेच्या सुमारे 10-12 दिवस आधी डुमरीच्या सुमारे 30 ते 35 काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडेरी बाजार येथे धरणे आंदोलन केले. या बाजाराचे मालक होते संत बक्ष सिंग. संत बक्ष यांच्या माणसांनी या कार्यकर्त्यांना बाजारातून हाकलून दिले.

चौरी-चौरा घटनेच्या 5 दिवस आधी म्हणजेच 31 जानेवारी रोजी 4000 आंदोलक नागरिकांनी बाजारात धरणे येथे मोठी सभा झाली. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी झाली होती. 2 फेब्रुवारी रोजी भगवान अहिर, नजर अली, लाल मुहम्मद यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्ते पुन्हा धरणे देण्यासाठी बाजारामध्ये पोहोचले तेव्हा संत बक्ष यांच्या माणसांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी भगवान अहिर व अन्य दोघांनाही पोलिस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केली.

भगवान अहिर यांना पोलिस ठाण्यात मारहाण करतांना ब्रिटीश पोलिस. भगवान हे पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याच्या वतीने इराकमध्ये लढले होते. असहकार चळवळीत सहभागी कार्यकर्त्यांना शारीरिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती.
भगवान अहिर यांना पोलिस ठाण्यात मारहाण करतांना ब्रिटीश पोलिस. भगवान हे पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याच्या वतीने इराकमध्ये लढले होते. असहकार चळवळीत सहभागी कार्यकर्त्यांना शारीरिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती.

2. ठाणेदार गुप्तेश्वर सिंह: संत बक्ष सिंग यांच्या सांगण्यावरून गुप्तेश्वर सिंहने भगवान अहिरवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. याचा लोकांमध्ये प्रचंड राग होता. 4 फेब्रुवारी 1922 रोजी शनिवार होता. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सुमारे 800 लोक मुंडेरी बाजारजवळ जमले. दुसरीकडे गुप्तेश्वर सिंहने गोरखपूरहून अधिक सैन्य मागवले, त्यांच्याकडेही बंदुका होत्या.

संत बक्ष सिंग यांच्यासोबत काम करणारा कर्मचारी अवधू तिवारी पोलिसांच्या वतीने जमावाशी बोलण्यासाठी पोहोचला. त्याला पाहताच लोकाचा संताप आणखी वाढला. दुसरीकडे गर्दीही वाढत होती. यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने सुरू केली. दरम्यान, गुप्तेश्वर यांनी हे निदर्शन बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्याची धमकी दिली.

3. गांधी टोपी : विरोध बेकायदेशीर घोषित होताच पोलिस आणि जमावामध्ये चकमक उडाली. यादरम्यान एका पोलिस शिपायाने मोठी चूक केली. त्याने आंदोलकाची गांधी टोपी काढली आणि तीला पायाने चिरडण्यास सुरुवात केली. प्रकरण हाताबाहेर गेल्याचा आणि तोडफोड सुरू होण्याचा हाच तो क्षण होता. हिंसाचार पाहून निदर्शनात सामील असलेल्या लोकांवर गुप्तेश्वरच्या आदेशानुसार गोळीबार करण्यात आला. यामध्ये 11 आंदोलकांचा मृत्यू झाला. सुमारे 50 जण जखमी झाले.

चित्रात ब्रिटिश सैनिक गांधी टोपी पायाने रगडत आहे. तेव्हा लोकांनी गांधी टोपीला स्वातंत्र्याचे प्रतीक मानले होते. त्यामुळे आंदोलकांचा पारा चढला होता. घाबरलेल्या पोलिसांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये 11 आंदोलकांना प्राण गमवावे लागले.
चित्रात ब्रिटिश सैनिक गांधी टोपी पायाने रगडत आहे. तेव्हा लोकांनी गांधी टोपीला स्वातंत्र्याचे प्रतीक मानले होते. त्यामुळे आंदोलकांचा पारा चढला होता. घाबरलेल्या पोलिसांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये 11 आंदोलकांना प्राण गमवावे लागले.

इंग्रज सैनिकांच्या गोळ्या संपल्या, ते पळून जात पोलिस ठाण्यात लपले

गोळीबार केल्यानंतर जमाव मागे हटला आणि रेल्वे रुळांवर पोहोचला. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. तिथे गोळीबार सुरू असतानाच पोलिसांच्या गोळ्या संपल्या. आता जमावाने पोलिसांवर हल्ला केला.

गर्दीपासून वाचण्यासाठी 22 पोलिसांनी स्वत:ला पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये कोंडून घेतले. दरम्यान, काही आंदोलकांनी एका दुकानातील रॉकेलचे डबे उचलले. गवत आणि घास ठेऊन पोलिस ठाण्याला आग लावली. दुसरीकडे, इन्स्पेक्टर गुप्तेश्वर सिंह यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जमावाने त्यांना पकडून आगीत फेकून दिले.

हिंसाचारात जिवंत जाळलेले पोलिस कर्मचारी

उपनिरीक्षक पृथ्वी पाल सिंह, बशीर खान, कपिल देव सिंग, लखई सिंग, रघुवीर सिंग, विषेशर यादव, महंमद अली, हसन खान, गदाबख्श खान, जमा खान, मंगरू चौबे, रामबली पांडे, इंद्रसन सिंह, रामलखन सिंह, मर्दाना खान आणि जगदेव सिंह, जगई सिंह.

त्यादिवशी पगार घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेले चौकीदार वजीर, घिंसई, जथई आणि कतवारू राम यांनाही आंदोलकांनी पेटलेल्या आगीत टाकले. एकूण 23 पोलिसांना जिवंत जाळून मारण्यात आले. मात्र, जमावाने पोलिस ठाण्याजवळ राहणाऱ्या गुप्तेश्वर सिंह यांच्या पत्नी आणि मुलांना हातही लावला नाही.

हे चित्र चौरी-चौरा स्टेशनचे आहे. 29 जुलै 1990 रोजी चौरीचौरा एक्स्प्रेस गाडी येथून धावली. ही ट्रेन दररोज गोरखपूर ते अलाहाबाद (आता प्रयागराज) असा प्रवास करत असे. आता ही गोरखपूर ते कानपूर ट्रेन अनवरगंज येथून धावते.
हे चित्र चौरी-चौरा स्टेशनचे आहे. 29 जुलै 1990 रोजी चौरीचौरा एक्स्प्रेस गाडी येथून धावली. ही ट्रेन दररोज गोरखपूर ते अलाहाबाद (आता प्रयागराज) असा प्रवास करत असे. आता ही गोरखपूर ते कानपूर ट्रेन अनवरगंज येथून धावते.

225 लोकांवर खटला, 19 जणांना फाशी

या घटनेनंतर ब्रिटीश सरकारने कठोर भूमिका घेत या भागात मार्शल लॉ लागू केला. पोलिसांच्या अहवालानुसार या गर्दीत 6000 लोक होते. त्यापैकी सुमारे 1000 जणांची चौकशी करण्यात आली. गोरखपूर जिल्हा न्यायालयात 225 जणांवर खटला चालवला गेला. काँग्रेस कार्यकर्ता मीर शिकारी या खटल्यात अधिकृत साक्षीदार झाले. सत्र न्यायाधीश एच.ई. होल्म्स यांनी 9 जानेवारी1923 रोजी निकाल दिला. 172 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

गोरखपूर जिल्हा काँग्रेस कमिटीने न्यायाधीशांच्या निर्णयाविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील दाखल केले आणि मदन मोहन मालवीय यांनी खटला लढवला. या निर्णयात उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश सर ग्रिमउड पीयर्स आणि न्यायमूर्ती पिगॉट यांनी 19 आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. 16 जणांना काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठवण्यात आले तर 38 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2 ते 11 जुलै 1923 या कालावधीत सर्व 19 जणांना फाशी देण्यात आली.

कोण होते ते 19 हुतात्मा

विक्रम, दुदही, भगवान, अब्दुल्ला, काली चरण, लाल मुहम्मद, लौटी, मादेव, मेघू अली, नजर अली, रघुवीर, रामलगन, रामरूप, रुदाली, सहदेव, मोहन, संपत, श्याम सुंदर आणि सीताराम.

मुंडेरी ही कपड्यांची मोठी बाजारपेठ होती

चौरी-चौरा वर पुस्तक लिहिणारे इतिहासकार के.के.पांडे सांगतात की, ही घटना घडली, त्या काळात हा परिसर कपड्यांचा मोठा बाजार होता. स्वदेशी आणि खादीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे येत असत. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही एक वर्ग संतप्त झाला होता.

जेव्हा मी मुंडेरी मार्केटमध्ये पोहोचलो तेव्हा इथे चौरी-चौरा हिंसाचाराचे एकही चिन्ह दिसत नाही. एका छोट्या शहरातील हा एक सामान्य बाजार आहे, जिथे त्या रक्तरंजित दिवसाची आठवण देखील नाही.

चौरी-चौरा येथील क्रांतिकारकांनी 'करो या मरो'चा नारा देत पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यामुळे गांधींनी त्याला हिंसा म्हटले आणि असहकार आंदोलन रद्द केले, असे के.के. पांडे यांनी सांगितले. मात्र, 1942 मध्ये जेव्हा गांधींनी पुन्हा असहकार आंदोलन सुरू केले तेव्हा त्यांनी ‘डू ऑर डाय’ चा नारा दिला होता. जालियनवाला बाग येथील घटना सर्वांना आठवते, मात्र चौरी चौराबाबत अजूनही दुर्लक्ष होते.

न्यायालयाचा निर्णय आजही संग्रहालयात सुरक्षित

चौरी-चौरा हुतात्मा स्मारकाच्या जागेत शहीद संग्रहालयही बांधण्यात आले आहे. जिथे या घटनेतील शहीदांचे पुतळे बसवले आहेत. येथे या प्रकरणाच्या एफआयआरची प्रत, पूर्ण आरोपपत्र आणि न्यायालयाचा निर्णय आजही पाहायला मिळतो. शेजारीच पर्यटन विभागाने शहीद जवानांच्या नावाने सभागृहही बांधले आहे. दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी शहीदांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

गांधींच्या निर्णयाला विरोध का झाला याचे कारणही समजून घ्या

12 फेब्रुवारी 1922 रोजी महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. 4 दिवसांनंतर म्हणजेच 16 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी त्यांच्या 'चौरी-चौरा का अपराध' या लेखात लिहिले की, हे आंदोलन मागे घेतले नसते तर इतर ठिकाणीही अशाच घटना घडल्या असत्या.
12 फेब्रुवारी 1922 रोजी महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. 4 दिवसांनंतर म्हणजेच 16 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी त्यांच्या 'चौरी-चौरा का अपराध' या लेखात लिहिले की, हे आंदोलन मागे घेतले नसते तर इतर ठिकाणीही अशाच घटना घडल्या असत्या.

फेब्रुवारी 1922 मध्ये गुजरातच्या बारडोली आणि आणंद तालुक्यात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याची गांधींची योजना होती. यामध्ये शेतकरी ब्रिटीश सरकारला कर देणे बंद करतील आणि त्यानंतर ते संपूर्ण देशात लागू केले जाईल. मात्र, त्या आधीच चौरी-चौराची घटना घडली. गांधींनी आंदोलन मागे घेतले आणि यूपीच्या या भागातील काँग्रेस समित्या रद्द केल्या.

मात्र, त्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी गांधींच्या निर्णयाशी असहमती दर्शवली होती. आपली नाराजी व्यक्त करताना सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, 'जेव्हा जनतेचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो, तेव्हा माघार घेण्याचा आदेश देणे हे राष्ट्रीय आपत्तीपेक्षा कमी नाही'.

सीआर दास म्हणाले होते की, असहकार आंदोलन मागे घेणे ही मोठी चूक आहे. गांधीजींच्या या निर्णयामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे मनोधैर्य बऱ्याच अंशी घसरले आहे. मोतीलाल नेहरूंनाही गांधींच्या निर्णयाचा खूप राग आला होता. यामुळेच सीआर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी जानेवारी 2023 मध्ये स्वराज पक्षाची पाया रचला.

अखेरीस आज होत असलेल्या वादावरही एक नजर…

चौरी-चौरा स्मारकाचे उद्घाटन जानेवारी 2021 मध्ये झाले. त्याचवेळी एका नव्या वादातही भर पडली. नावांच्या जुन्या शिलेवर असलेल्या हुतात्मांच्या नावापुढील दलित आणि मागास जातीमधील हुतात्मांची आडनावे नव्या शिलेवरुन काढून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

उदाहरणार्थ, श्री लौटू पुत्र शिवनंदन कहार यातील 'कहार' हा शब्द नवीन शिलालेखातून नाहीसा झाला. शहीद रामलगन लोहार या नावाची जागा शहीद रामलगन अशा अक्षरांनी घेतली. तसेच शहीद लाल मुहम्मद यांचे वडील हकीम फकीर यांच्या नावावरून फकीर ही पदवी काढून टाकण्यात आली आहे. तेव्हा सपा नेते काली शंकर यांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून ते या वादापासून ते दूर झाले आहेत.

जानेवारी 2021 मध्ये चौरी-चौरा स्मारकाचे उद्घाटन झाले तेव्हा शहीदांच्या नावासमोरुन त्यांचे आडनाव काढून टाकण्यात आले. यावरून वाद सुरू आहे.
जानेवारी 2021 मध्ये चौरी-चौरा स्मारकाचे उद्घाटन झाले तेव्हा शहीदांच्या नावासमोरुन त्यांचे आडनाव काढून टाकण्यात आले. यावरून वाद सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...