आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओटीटीवर आपला सिनेमा यावा किंवा आपली वेब सिरीज यावी, असं वाटणं आता न्यू नॉर्मल झालंय. एकेकाळी छोट्या पडद्याची अनेक मोठ्या स्टार्सना अॅलर्जी होती. आता ते दिवस सरले आहेत. आता उत्पन्नवाढीसोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ दिसून येते. सिनेमा थिएटर्सची सद्दी मोडीत निघाली असून मनोरंजनाचे साधन म्हणून टीव्हीच्या छोट्या पडद्याइतकेच महत्त्व मोबाइलच्या स्क्रीनला आणि अन्य संगणकीय पडद्यांनाही आले आहे. आपला कंटेंट या माध्यमावर नियोजित पद्धतीने सादर करण्याकडे अनेकांचा कल दिसतोय.
याच शृंखलेत ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा- जॉनास हिचे नाव सामील आहे. तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या मालिकेचे काही फोटो तिने नुकतेच शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहता धडाकेबाज अॅक्शन सीन्सची चाहूल लागतेय. काही सीन्समधून थेट अँजेलिना जोलीची आठवण येते! याआधीही प्रियंकाने वेब सिरीजमध्ये काम केले आहे, पण ते पात्र डिझायर, पॅशनने भारलेले होते. आताची गोष्ट वेगळी आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोत ती हातात पिस्तूल घेऊन सज्ज असल्याचे दिसतेय. तिचा लूकदेखील मॅनरिझमवाला आहे. ‘सिटाडेल’ ही एक सायन्स ड्रामा वेब सिरीज आहे. यातला प्रियंकाचा रोल एजंट नादिया ह्या गुप्तहेराचा आहे. रिचर्ड मॅडनने सिटाडेल एजंटची- मेसनची भूमिका केली आहे. स्टॅनली टुसी एक्सदेखील एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरीजचा पहिला सीझन सहा एपिसोडचा आहे. पहिले चार भाग मार्चमध्ये, तर उर्वरित भाग एप्रिलमध्ये प्रदर्शित होतील.
२०१५ मध्ये प्रदर्शित होऊन तीन वर्षे चाललेल्या ‘क्वांटिको’ या वेब सिरीजमधल्या प्रियंकाच्या कामाची भरपूर चर्चा झाली होती. या पहिल्या वेब सिरीजमध्ये तिने अॅलेक्स पॅरिश हे पात्र साकारले होते. ‘द मॅट्रिक्स रिसर्क्शन्स’मध्येही ती झळकली होती. अमेरिकेत आपल्यासोबत वर्णभेद झाल्याची तक्रार तिने केल्यानंतर आपल्या वागण्याबोलण्यात तिने सातत्याने स्पष्टता ठेवली होती. नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘द व्हाइट टायगर’ने तिची इमेज अधिक बुलंद झाली. त्यामुळे तिने ‘सिटाडेल’विषयी सूतोवाच करताच माध्यमांचे लक्ष वेधले गेले. ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’नंतर सुमारे १६० दशलक्ष डॉलरचे प्रारंभिक बजेट असणारी ‘सिटाडेल’ ही अॅमेझॉन प्राइमची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी वेब सिरीज असल्याचा बोलबाला माध्यमात होता. कोविड शिगेला पोहोचला होता तेव्हा २०२१ मध्ये या वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू झाले होते. प्रत्यक्ष स्क्रीन टाइमसाठी दोन वर्षे जावी लागली. प्रियंकाच्या सिटाडेलचे स्वागत कसे होते, हे येत्या काही दिवसांतच दिसून येईल. असो.
मार्च महिन्यात नेटफ्लिक्सवर आणखी काय प्रदर्शित होतेय ? { १ मार्च - लिटिल एंजेल : व्हॉल्यूम २, ईजी ए, बिग डॅडी, चीट, टू-नाइट यू आर स्लीपिंग विद मी, रॉन्ग साइड ऑफ द ट्रॅक्स : सीजन २ { २ मार्च - मोनिक ऑलिव्हियर : अॅक्सेसरी टू एव्हिल, सेक्स / लाइफ : सीझन २, फ्रेम्ड! ए सिसिलियन मर्डर, मिस्ट्री : सीझन २, कराटे शिप, मसामीर काउंटी : सीझन २ {३ मार्च - नेक्स्ट इन फॅशन : सीझन २, लव्ह अॅट फर्स्ट किस { ४ मार्च - डिव्होर्स एटॉर्नरी शीन, वीकली { ५ मार्च - क्रीस रॉक : सिलेक्शन आउटरेज { ६ मार्च - राइडली जोनस : सीजन ५ { ८ मार्च - फार अवे, MH370 : द प्लेन दॅट डिसअॅपिअर्ड {९ मार्च - यू : सीझन ४ पार्ट २ {१० मार्च - आउटलास्ट, राणा नायडू नेटफ्लिक्स एक्स नाइक ट्रेनिंग क्लब वर्कआउट सेशन्स, द ग्लोरी पार्ट २, हॅव अ नाइस डे, लूथर : द फॉलन सन {१४ मार्च - बर्ट क्रेइशर : रेजल डॅजल, एरियोशी आर्टिस्ट्स {१५ मार्च - मनी शॉट : द पॉर्न हब स्टोरी, द लॉ ऑफ द जंगल {१६ मार्च - स्किल टाइम, शॅडो अॅण्ड बोन : सीझन २ {१७ मार्च - मेस्ट्रो इन ब्लू, द मॅजिशियन एलिफेंट, नॉइस, स्काय हाय : द सिरीज डान्स 100, इन हिज शॅडोज {२० मार्च - केरोल, गेबीज डॉलहाउस सीझन ७ {२१ मार्च - वुई लॉस्ट अवर ह्यूमन. {२२ मार्च - इनव्हिजिबल सीट सीझन २, द किंग्डम सीझन २, Waco : American Apocalypse {२३ मार्च - जॉनी, द नाइट एजंट {२४ मार्च -चोर निकल के भागा, लव इज ब्लाइंड सीझन ४ {२८ मार्च - मे मार्टिन : SAP {३० मार्च - बिग मॅक गँगस्टर अँड गोल्ड, अनस्टेबल {३१ मार्च - कॉपीकॅट किलर, किल बुकसून, मर्डर मिस्ट्री २.
समीर गायकवाड sameerbapu@gmail.com संपर्क : 9766833283
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.