आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पश्चिम बंगाल:बंगालमध्ये मदतकार्याला राजकारणाचा संसर्ग, घाेटाळ्याच्या वादळात दीदी; सामग्रीची वसुली

कोलकाताहून शशिभूषण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना महामारी, अंफान वादळाच्या संकटाला ताेंड देणाऱ्या पं. बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणूक
  • ममतांना भ्रष्टाचारावरून घेरण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे

‘काेराेना’ महामारी व ‘अंफान’ चक्रीवादळ अशा दुहेरी संकटात पश्चिम बंगाल सापडले असतानाच बचावाचे राजकारणही तापू लागले आहे. राज्यात एप्रिल-मे २०२१ मध्ये निवडणूक हाेणार आहे. केंद्राशी संघर्ष हेच ममतांच्या राजकारणाचे बीज आहे. भाजपलाही तेच महत्त्वाचे वाटते. दाेन्हीही पक्षांना हा संघर्ष फायद्याचा वाटताे. त्यामुळे डावे व काँग्रेस यांना राज्यात काही जागाच राहणार नाही.

काेराेनाचा तडाखा बसलेले काेलकाता व इतर जिल्हे सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे वादळामुळे घरांच्या नुकसान भरपाईत घाेटाळा, मदत साहित्य वाटपातही तक्रारी वाढल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. नुकसान भरपाईशी संबंधित तक्रार मिळालेल्या ठिकाणी तत्काळ कारवाई केली, असे अलीकडेच राज्य पाेलिसांच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले हाेते. राजकीय लाभासाठी विराेधी पक्षाचा तिळपापड हाेत आहे. भ्रष्टाचार तर डाव्या माेर्चाच्या सरकारमध्ये हाेता. ताे ९० टक्के राेखण्यात यश मिळाले आहे. परंतु, हे सर्व घडत असल्याने विराेधी पक्षाचा तिळपापड झाला असून त्यातूनच ते आराेप करू लागले आहेत. घाेटाळा करणाऱ्यांकडून किंमत वसूल केली जात आहे. दक्षिण २४ परगणात २५० लाेकांना मदत निधी परत करावा लागला. आतापर्यंत २० लाख रुपयांची रिकव्हरी झाली आहे. दुसरीकडे मदतकार्यातील वाटपात झालेल्या घाेटाळ्यांच्या तक्रारी नाेंदवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घाेष यांनी सायक्लाॅन-अम्फान पाेर्टल सुरू केले आहे. पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या पाेर्टलवर १०५६ तक्रारी दूर झाल्या आहेत. जनतेकडे वहीखाते आहे. योग्य वेळ आल्यावर जनता भाजप-तृणमूलचा हिशेब करेल. काँग्रेस राज्यसभेचे खासदार प्रदीप भट्टाचार्य म्हणाले, राज्य असो की केंद्र सरकार दोघांनीही जनतेला देवाच्या भरवशावर सोडले आहे. दोन्ही पक्ष राजकीय स्कोअर नीट करण्यात व्यग्र आहेत.

एक हजार कोटींची मदत तृणमूलच्याच लोकांत वाटप

२० हजार ते पाच लाख लाेकांमध्ये सरकारने १ हजार काेटी रुपयांचे वितरण केले. परंतु, त्यातून आपल्याच लाेकांना लाभ मिळवून दिला. एका घरात पाच ते सात लाेकांची नावे देण्यात आली आहेत. भ्रष्टाचार वाढला आहे. घाेटाळा करणाऱ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत. परंतु, त्यांच्यावर खटला दाखल का केला जात नाही ? असा आरोप भाजपने केला.