आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Country Could Still Become A Major Manufacturing Hub; But Expensive Electricity, Necessary Resources Should Be Cheaper, Tax Relief Should Be Given : R C Bhargava

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ओरिजिनल:देश अजूनही मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब होऊ शकते; परंतु महागडी वीज, आवश्यक संसाधने स्वस्त व्हायला हवीत, करांत सूट मिळावी

नवी दिल्ली (स्कंद विवेक धर)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात मोठी कारनिर्माती कंपनी मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांच्याशी बातचीत

आपल्या देशात उद्योगांना प्रत्येक गोष्ट महाग दिली जाते. सर्वाधिक करही उद्योगांवरच लावला जातो. याचा परिणाम म्हणजे उत्पादनासाठीची गुंतवणूक वाढते. तसेच आपण जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकत नाही. देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब करायचे असेल तर आपल्याला ही रचना बदलावी लागेल. सर्वात मोठी कारनिर्माती कंपनी मारुती-सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी भास्करशी विशेष मुलाखतीत हे स्पष्ट केले.

भार्गव म्हणाले, पाच-सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, देशात उत्पादनास प्राेत्साहन द्यावयाचे आहे. याबाबत पुढे खूप काम झाले. भारतात उद्योग-व्यापार करणे सोपे झाले. तरीही उत्पादन मात्र वाढले नाही, ना एफडीआय आली. चीन सोडणाऱ्या बहुतांश कंपन्या भारतात न येता व्हिएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशियात जात आहेत. वास्तविक आपल्या देशात खूप फायदे आहेत. आपली बाजारपेठ मोठी आहे, मनुष्यबळ मुबलक आहे, दर्जेदार व्यवस्थापन आहे, लोकशाही आहे आणि कायदेशीर काटेकोर नियम आहेत. तरीही देशात उत्पादन का वाढत नाही? याचे कारण म्हणजे, भारतात हे उत्पादन जागतिक स्पर्धेच्या तुलनेत नाही. येथे उद्योगांना सर्वात महाग वीज आणि सर्वात कमी सुविधा दिल्या जातात. उद्योगांनी या सुविधा स्वत: कराव्यात, असे सरकारला वाटते. याशिवाय सर्वाधिक करही उद्योगांना लावला जातो. यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढतो आणि आपली उत्पादने स्पर्धेत टिकू शकत नाहीत. सरकारने या उद्योगांना कमी खर्चात ही संसाधने उपलब्ध करून द्यायला हवीत. यातून आपण जगाशी स्पर्धा करू शकू. यानंतर उद्योगांतून जो कर मिळेल त्यातून विकास व सुधारणा कराव्यात. आर्थिक सुधारणांसाठी केंद्र सरकार काही निर्णय घेते, परंतु राज्याच्या पातळीवर हे निर्णय अडकून पडतात. आर्थिक सुधारणांबाबत राज्यांची मानसिकता अजूनही बदललेली नाही, असे भार्गव म्हणाले.

ऑक्टाेबरपर्यंत मारुतीचे प्रॉडक्शन गेल्या वर्षीपेक्षा अधिक होईल

मारुतीचे चेअरमन म्हणाले, कोरोना काळ ही काही कालावधीसाठीची समस्या आहे. लस येताच ती संपून जाईल. या समस्येमुळे देशाला मोठी संधी मिळाली आहे. मारुतीचे उत्पादन या वर्षी ऑक्टोबरपर्यंत गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या बरोबरीत पोहोचेल. सध्या आम्ही सावधगिरीने काम करत आहोत म्हणून उत्पादन कमी आहे. जसजशी देशात कारची मागणी वाढत जाईल तसे आम्ही उत्पादन वाढवू. ते म्हणाले, कंपनीचे जिम्मी हे नवे मॉडेल याच महिन्यात लाँच होणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे यास विलंब झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...