आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्ट क्रांती दिन विशेष:तेव्हा ऑगस्ट क्रांतीचे वारे, आता लॉकडाऊनमुळे डिजिटल क्रांतीचे नगारे

एकनाथ पाठक| औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे’चा नारा देत ९ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरोधात गर्जना केली व देशभर क्रांतीचे वारे पसरले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून ३४ वर्षांपूर्वी देशात डिजिटल क्रांती झाली. लॉकडाऊनमध्ये याच क्रांतीने यशाचा मंत्र दिला अन् अपेक्षित नसलेली पाच प्रमुख क्षेत्रेही डिजिटल झाली.

९ ऑगस्ट हा भारतीयांच्या मनातील स्वातंत्र्याच्या अस्मितेचा दिवस. कारण १९४२ मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध या दिवशी रणशिंग फंुकले गेले. यंदाचा हा ऑगस्ट क्रांतिदिन कोरोनासारख्या मानव जातीला आव्हान देणाऱ्या शत्रूविरुद्ध रणशिंग फुंकण्याचा काळ आहे. तेव्हाच्या ऑगस्ट क्रांतीने समस्त भारतीयांना स्वातंत्र्यलढ्याची स्फूर्ती दिली...अन् याच काळात २०२० मध्ये लॉकडाऊनच्या दुष्टचक्रामुळे भारतात डिजिटल क्रांतीची जणू भरती आली. सर्वच क्षेत्रांचा या डिजिटल क्रांतीने चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्याचा हा आढावा...

शिक्षण : शाळा बंद, शिक्षण सुरू

लाॅकडाऊन व काेराेनाच्या भीतीने शाळा बंद असल्या तरीही राज्यात ऑनलाइन शिक्षण पद्धती जाेमात आहे. शासनाने यासाठी गुगलसाेबत करार केला.

> ई-लर्निंगचे प्रमाण ९० टक्के वेगाने वाढले. टॅब, आयफाेन,पीडीएफ बुकने अभ्यास.

> वेबिनार, ऑनलाइन लेक्चर व ट‌्युटाेरियल याचा वापर अधिक फायदेशीर ठरत आहे.

> गुगल एज्युकेशनच्या माध्यमातून राज्यातील ८५ टक्के शाळांमध्ये ऑनलाइन क्लास सुरू.

95 टक्के विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात.

जवळ आली नाती : ऑनलाइन निकाह, बारसेही

काेराेना व लाॅकडाऊनने घरात कुटुंबीयांसह राहावे लागत आहे. त्याने नात्यात जिव्हाळा व संवाद वाढला. नातेसंबंधात गाेडवा निर्माण झाला.

> लाॅकडाऊन काळात कुटुंबांत फोनवरचा जिव्हाळा आता थेट संवादातून प्रबळ झाला.

> ऑनलाइनने लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहे. बीडमध्ये ऑनलाइन निकाह कबूल.

> व्हिडिओ काॅलवरूनच पुत्र-कन्यारत्नाचा आनंद, दुसरीकडे शेवटचा निराेप देत आहे.

85 टक्के कुटुंबांत राहिल्याने मानसिक आधार, मन व्यक्त करण्याची संधी.

भक्तिपाठ : घरीच पूजापाठ, मंत्रोच्चार

लाॅकडाऊनमध्ये वैदिक विधी व उपासनेला वेग आला आहे. पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये ऑनलाइन पूजांचे आयोजन केले जात आहे.

> सध्या ६० टक्केपेक्षा अधिक विधी याच ऑनलाइन मंत्राेच्चारातून पार पडत आहेत.

> मंिदरे बंदमुळे ८० टक्के भक्तांनी ऑनलाइन महालक्ष्मी, बालाजी, साईचे दर्शन घेतले.

> राम जन्मभूमी सोहळा पाहून ८५ टक्के भाविकांनी ऑनलाइन रामाचे दर्शन घेतले.

85 टक्के प्रगती ऑनलाइनने वैदिक कार्य, पूजाअर्चा, उपासनेत झाली.

स्पाेर्ट््स : मैदान बंद, वर्कआऊट सुरू

लाॅकडाऊनमुळे स्पाेर्ट््स इव्हेंट बंद हाेते. मात्र, या काळात प्रगल्भ बुद्धीतून, तंत्रप्रणालीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या चेस टुर्नामेंट पार पडल्या.

> टेक्नॉलॉजीने सर्व खेळ प्रकारात खेळाडूंचा ऑनलाइन वर्कआऊटने फिटनेस कायम.

> महाराष्ट्रासह देशात प्रशिक्षकांचा कोचिंगचा ऑनलाइन ज्ञानदानाचा प्रयोग यशस्वीपणे.

> ई-स्पोर्ट््स गेमिंग, ऑनलाइन टुर्नामेंट आयाेजनाला वेग आला आहे.

80 % खेळाडूंची कामगिरीचा दर्जा व फिटनेससाठी तंत्रप्रणालीला पसंती

न्याय प्रक्रिया : न्यायदानाच्या प्रक्रियेला वेग

डिजिटलच्या माध्यमातून न्यायदानाच्या प्रक्रियेला वेग आला. त्यामुळे उच्च व सर्वाेच्च न्यायालयामध्ये सुनावणी व अनेक प्रकरणे निकाली लागली आहेत.

> सर्वोच्च न्यायालयाचे ७० टक्के काम सध्या ऑनलाइन व डिजिटलवर सुरू आहे.

> सुशांत आत्महत्याप्रकरणी रियाबाबतची ऑर्डर सुप्रीम काेर्टाने ऑनलाइन काढली.

> उच्च न्यायालय व खंडपीठात लॅपटॉपवर युक्तिवादाची व्यवस्था केली आहे.

85 टक्के प्रकरणांचा सर्वोच्च व उच्च न्यायालयात ऑनलाइन निपटारा

बातम्या आणखी आहेत...