आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • The Family Of Those Who Commit Suicide In Corona Will Not Get A Death Certificate From Corona, Know What Is The Government's New Guideline

'कोविडमुळे मृत्यू'ची व्याख्या निश्चित:कोरोनामध्ये आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नाही 'कोविडमुळे मृत्यू'चे प्रमाणपत्र , जाणून घ्या सरकारच्या सुधारित नियमावलीबद्दल सविस्तर

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर...

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या मृत्यूच्या दाखल्यावर अर्थात डेथ सर्टिफिकेटवर कोरोनामुळे मृत्यूच्या उल्लेखाबाबत संभ्रम होता. यासंदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना तशी स्पष्ट नोंद असलेले प्रमाणपत्र देण्याबाबत केंद्र सरकारला बजावले होते. आता केंद्र सरकारने यासंदर्भातल्या नियमावलीमध्ये अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी सुधारीत नियमावली जारी केली आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करणा-या दोन याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतर आता केंद्र सरकार आणि ICMR यांनी संयुक्तपणे कोरोनासंदर्भातल्या मृत्यूंना देण्यासाठीच्या प्रमाणपत्राविषयी सुधारित नियमावली जारी केली आहे.

या सुधारित नियमावलीनुसार, कोरोनाबाधिक व्यक्तीचा जर विष, आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू झाला असले, तर त्याला कोविडमुळे मृत्यू मानले जाणार नाही. मार्गदर्शिकेमध्ये अशा अनेक तरतुदी आहेत.

"कोविडमुळे मृत्यू"ची व्याख्या काय आहे? कोरोना किंवा कोविडमुळे मृत्यू कसे मानले जाईल? प्रमाणपत्रात काही विसंगती असल्यास, कुटुंबातील सदस्य कोठे तक्रार करू शकतात, जाणून घेऊया...

कोरोना किंवा कोविड 19 मुळे मृत्यूची व्याख्या काय असेल?

 • आरटीपीसीआर, मोलेक्युलर टेस्ट, रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा रुग्णालय वा आरोग्य सुविधा केंद्रामार्फत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लागण झाल्याचे स्पष्ट झालेलेचे रुग्ण कोरोना बाधित म्हणून मानण्यात येतील.

काय असतील कोविड मृत्यू प्रमाणपत्रासाठीचे नियम?

 • ICMR च्या अभ्यास निष्कर्षांनुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर 25 दिवसांपर्यंत व्यक्तीचा त्या बाधेमुळे मृत्यू होऊ शकतो. मात्र, केंद्राने कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो कोरोना मृत्यू मानण्याचे जाहीर केले आहे.
 • कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत रुग्णाचा हॉस्पिटल वा हॉस्पिटल बाहेर एखाद्या रुग्णसुविधा केंद्रात जरी मृत्यू ओढवला, तरी तो कोविड मृत्यूच मानला जाईल.
 • कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयातच उपचारांदरम्यान होणारे किंवा घरी मृत्यू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या कोरोना मृत्यूच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून देखील संबंधित मृत्यू कोविड मृत्यू मानला जाईल.
 • विषबाधा, आत्महत्या, अपघात यामुळे घडणाऱ्या मृत्यूंना कोविड मृत्यू मानले जाणार नाही. अशा मृत्यूंमध्ये जरी करोनाची लागण असेल, तरी त्यांना कोविड मृत्यू मानले जाणार नाही.

कोरोनाच्या इतर कॉम्प्लिकेशन्समुळे झालेला मृत्यू देखील कोविडमुळे मृत्यू म्हणून गणला जाईल

 • सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले आहे की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या बाबतीत जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण स्पष्टपणे कोविडमुळे मृत्यू म्हणून नोंदवले जावे.
 • एवढेच नाही तर कोरोनामुळे होणा-या इतर कॉम्प्लिकेशन्समुळे रुग्णाचा मृत्यू झाला असेल, तर मृत्यू प्रमाणपत्रात विशेषतः मृत्यूचे कारण कोरोना अर्थात कोविड -19 मुळे मृत्यू असा उल्लेख असावा.

मृत्यू प्रमाणपत्रावरील तक्रारीचे निवारण करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल

 • मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर मृतकचे कुटुंब मृत्यू प्रमाणपत्रावर लिहिलेल्या मृत्यूच्या कारणाने समाधानी नसेल तर अशा बाबींसाठी जिल्हा स्तरावर एक समिती स्थापन केली जाईल.
 • या समितीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, सीएमओ, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा औषध विभागाचे प्रमुख आणि विषय तज्ज्ञ असतील जे 'कोविड -19 मृत्यूचे अधिकृत दस्तऐवज' जारी करतील. मार्गदर्शक तत्त्वात या समितीद्वारे अवलंबण्यात येणारी प्रक्रियादेखील सांगितली आहे.
 • सर्व तक्रारी 30 दिवसांच्या आत निकाली काढाव्या लागतील.
 • मृताच्या कुटुंबीयांना कागदपत्रांसाठी जिल्हा कलेक्टरला अर्ज द्यावा लागेल.
 • ही समिती कोरोनाच्या मृत्यूच्या बाबतीत अधिकृत दाखला, मार्गदर्शक तत्त्वांसह जारी फॉर्मेटनुासर जारी करेल. समितीला अशाप्रकारच्या सर्व प्रमाणपत्रांची माहिती राज्याच्या जन्म आणि मृत्यू रजिस्ट्रारला द्यावी लागेल.
 • सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रमाणपत्र जारी करणे, त्यातील दुरुस्ती करणे आणि कोविड 19 ला मृत्यूचे स्पष्ट कारण सांगण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनामध्ये आत्महत्येला "कोरोनामुळे मृत्यू" समजले जावे

 • केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाने कोरोनादरम्यान आत्महत्येच्या प्रकरणांना कोरोनामुळे मृत्यू न मानण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
 • हे धोरण राज्यांमध्ये लागू करण्याच्या पद्धती आणि तक्रार समित्या स्थापन करण्याची वेळ मर्यादा यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला प्रश्न विचारला आहे. या सर्व बाबींवर केंद्र सरकार 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत उत्तर देऊ शकते.

मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास विलंब झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारवर नाराज

 • कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विलंब झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तुम्ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल, अशा शब्दांत न्यायमूर्ती शहा यांनी नाराजी व्यक्त केली होती.

कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे जारी करण्याचे आदेश दिले?

 • न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या खंडपीठाने गौरव कुमार बन्सल विरुद्ध भारत सरकार आणि रिपक कन्सल विरुद्ध भारत सरकार यांच्या प्रकरणांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले होते.
बातम्या आणखी आहेत...