आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021:या दशकात जगभरात संभाव्य संकटांचे धाेके

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाओस संमेलनाचा पहिल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल जाहीर

२५ जानेवारीला दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीपूर्वी “द ग्लोबल रिस्क रिपोर्ट २०२१’ जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, सामाजिक तणावासोबत कार्बन उत्सर्जन, बेरोजगारी व संसर्गजन्य आजाराशी लढण्याची क्षमता घटली आहे. अहवालात या संकटांना आर्थिक, कार्बन उत्सर्जन, राजकीय-सामाजिक, तंत्रज्ञान असे विभागण्यात आले आहे. काळानुसार तीन भागांत विभागणी केली आहे.

5 संकटे... जी चालू दशकातच येण्याची सर्वाधिक शक्यता आहे
1.
प्रचंड थंडी आणि उष्णतेचा प्रकोप होईल.
2. जगभरात कार्बन उत्सर्जनाशी निपटण्यासाठी उचललेली पावले कुचकामी ठरतील.
3. यावरील मानवी उपायांनाही बाधा येईल.
4. कोरोनासारखे संसर्गजन्य आजार वाढतील.
5. नैसर्गिक संपदेचा ऱ्हास होईल.

2021 मध्ये येणारे आणखी दोन धाेके
1. डिजिटल शक्तींची एकाधिकारशाही वाढेल.
2. डिजिटल सेवांच्या उपलब्धतेत असमानता.

अचानक येणाऱ्या संकटांचेही आव्हान

- खोल समुद्रात आणि अवकाशात वास्तव्य करू शकतील असे मानव तयार करण्यासाठी जेनेटिक इंजिनिअरिंगला सरकारे प्रोत्साहन देऊ शकतात.

- व्यवस्थेवर नियंत्रण राहावे म्हणून नागरिकांना नियंत्रित करणाऱ्या औषधांचा वापर होऊ शकतो.