आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंडेप्थ:अमेरिकेत या वर्षी 3.4 कोटी लोकांनी नोकरी सोडली, जगभरात राजीनाम्यांची फेरी सुरूच; नोकऱ्या शोधणारे लोक सापडत नाहीत

आदित्य द्विवेदी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

कोणत्याही देशासमोर बेरोजगारी हे सर्वात मोठे आव्हान असते. मात्र जगातील अनेक देश विरुद्ध आव्हानांचा सामना करत आहेत. तिथे रोजगार आहे, पण काम करणारे लोक मिळत नाहीत. हे सर्व 'द ग्रेट रेजिग्नेशन'मुळे घडत आहे.

यावर्षात अमेरिकेत आतापर्यंत 3.4 कोटी लोकांनी राजीनामा दिला आहे. सप्टेंबर महिन्यातच नोकरी सोडलेल्यांचा आकडा 44 लाख इतका आहे. OECD देशांतील 2 कोटी लोक कोरोनानंतर कामावर परतले नाहीत. जगातील 41% कर्मचारी या वर्षी त्यांच्या नोकऱ्या बदलण्याच्या तयारीत आहेत. यूके, जर्मनी आणि भारतातील कंपन्या देखील कुशल कामगारांच्या कमतरतेशी झगडत आहेत. जग 'द ग्रेट रेजिग्नेशन'च्या मध्यभागी आहे आणि याचविषयी आपण जाणून घेऊयात.

लोक नोकऱ्या का सोडत आहेत? नोकरी सोडून ते कुठे जात आहेत? तुम्हालाही तुमची नोकरी सोडण्याचा विचार करायला हवा का? यामुळे कंपन्यांसाठी कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत? 'द ग्रेट रेजिग्नेशन' म्हणजे काय? जाणून घ्या...

'द ग्रेट रेजिग्नेशन' म्हणजे काय
'द ग्रेट रेजिग्नेशन' हा शब्द पहिल्यांदा 2019 मध्ये टेक्सासचे प्राध्यापक अँथनी क्लॉट्झ यांनी वापरला होता. लाखो लोक नोकरी सोडून पलायन करतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. अवघ्या 2 वर्षात ही भविष्यवाणी खरी ठरत आहे.

काम-आयुष्य यांच्यासोबत संतुलन साधण्यासाठी धडपड

नोकरीचा राजीनामा देण्याच्या अनेक कारणांमध्ये बेरोजगारी भत्ता, कमी पगार, कुटुंबापासून अंतर, बदली, कोरोनाची भीती यांचा समावेश आहे, परंतु ही केवळ अर्धी गोष्ट आहे. 'द ग्रेट रेजिग्नेशन'मागील सर्वात मोठे कारण म्हणजे काम आणि आयुष्यातील संतुलन.

ब-याच काळापासून, आपले जीवन कामाभोवती फिरत आहे. ऑफिसच्या कॅलेंडरनुसार आपण आपल्या आयुष्याचे नियोजन करतो. वीकेंडलाच मित्रांना भेटता येते. कामासाठी मित्रांच्या लग्नात सामील होता येत नाही. पालक टीचर मीटिंगऐवजी ऑफिस मीटिंगला प्राधान्य देतात.

साथीच्या रोगाने सर्व काही बदलले आणि लाखो लोकांनी त्यांच्या जीवनाचा पुनर्विचार करण्यास सुरवात केली. Limeade च्या सर्वेक्षणानुसार, 40% लोक बर्नआउटमुळे नोकरी सोडत आहेत. लोकांना कमी कामाचे तास आणि आठवड्यातून कमी दिवस अशी लवचिक नोकरी हवी असते. म्हणजेच त्यांना त्यांच्या जीवनशैलीनुसार नोकरी हवी आहे.

नोकरी सोडण्यात तरुण आघाडीवर आहेत. लिंक्डइनच्या अहवालानुसार, जनरेशन जीचे 80% , मिलेनियल्सचे 50%, जनरेशन एक्सचे 31% आणि 5% बेबी बूमर्स त्यांच्या सध्याच्या नोकऱ्या सोडू इच्छितात. द ग्रेट रेजिग्नेशनमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र म्हणजे हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर हे आहेत.

कंपन्या काय करत आहेत?
फॉर्च्युन आणि डेलॉइट यांनी संयुक्तपणे 117 सीईओंचे नुकतेच सर्वेक्षण केले. सर्वेक्षणानुसार, 73% सीईओ मानतात की कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे पुढील 12 महिन्यांत त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. 57% सीईओ मानतात की प्रतिभा आकर्षित करणे आणि त्यांची नियुक्ती करणे हे त्यांच्या संस्थेचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्याच वेळी, 51% लोक मानतात की चांगल्या लोकांना नोकरीत ठेवणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे.

लोकांना नोकरीत टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या वेगवेगळे प्रयोग करत आहेत. काहीजण फूड कूपनचे वितरण करत आहेत, तर काही आठवडाभराच्या सामूहिक सुट्टीची ऑफर देत आहेत, परंतु जर त्यांना द ग्रेट रेजिग्नेशनमध्ये टिकून राहायचे असेल तर त्यांना कर्मचार्‍यांच्या जीवनात खोलवर जावे लागेल. आजच्या युगात फक्त पगार पुरेसा नाही.

भारताच्या जॉब मार्केटमध्ये काय चालले आहे?

महामारीच्या काळात भारतातील असंघटित क्षेत्रातील नोकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला होता. एका अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान असंघटित क्षेत्रातील 80% लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यातील लाखो लोक आपापल्या गावी स्थलांतरित झाले. मात्र, अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे नोकऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. हायरिंग फर्म टीमलीजच्या एका अहवालानुसार, भारताच्या आयटी उद्योगात यावर्षी दहा लाख राजीनामे अपेक्षित आहेत.

आपण काय करावे?

काय करायला हवे हे फक्त तुम्हीच जाणून घेऊ शकता. तुम्हाला 9-5 जॉबची सिक्युरिटी हवी आहे की फ्रीलान्सिंगची लवचिकता हे तुमचे तुम्हाला ठरवावे लागेल. आपल्या मनाप्रमाणे काम शोधणे ही चांगली गोष्ट आहे, पण टिकून राहणे ही एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर तुमची नोकरी तुमची बिले भरत असेल, तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागत असतील, जर तुम्हाला सोमवारी ऑफिसला जाण्याचा आनंद मिळत असेल... तर द ग्रेट रेजिग्नेशन सारख्या टर्ममध्ये आपण का अडकावे!

बातम्या आणखी आहेत...