आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Highest Number Of 466 Human Deaths In Ten Years In Maharashtra In Wildlife Attacks, 56 Killed Till September Despite 5 Months Lockdown This Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यात दहा वर्षांत सर्वाधिक 466 मानवी मृत्यू, यंदा 5 महिने लॉकडाऊन असूनही सप्टेंबरपर्यंत 56 बळी

अतुल पेठकर | नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वन्यजीवांच्या अधिवासावर अतिक्रमण झाल्याने मानवावरील हल्ल्यांत झाली वाढ

सध्या वन्यजीव सप्ताह साजरा होत असताना मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनाही घडत आहेत. जंगल, वन जमिनींवर अतिक्रमण केल्यामुळे वाघाच्या हल्ल्यात आबालवृद्धांचा बळी गेल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ वाघच नव्हे तर बिबटे, तरस, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, अस्वल, मगर आदी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रात दहा वर्षांत सर्वाधिक बळी गेल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे यंदा गेल्या ९ महिन्यांपैकी सुमारे ५ महिने लाॅकडाऊन असूनही सप्टेंबरपर्यंत ५६ बळी गेले आहेत.

सन २०१० पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता २०१६ हे वर्ष सर्वात वाईट ठरले. २०१६ मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५७ मानवी मृत्यू झाले. २०२० हे वर्षही यात मागे नाही. सप्टेंबर २०२० पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५६ बळी गेले होते. त्यापैकी ३१ बळी वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. यात बहुतांश बळी पूर्व विदर्भ आणि त्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. सध्या ज्या वेगाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात लोक बळी पडत आहेत, ते पाहता येत्या तीन महिन्यांत २०१६ मधील आकडा मागे पडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात गेल्याचे स्पष्ट होते. २०१० ते २०१३ दरम्यान वाघाच्या हल्ल्यात पडणारे बळी एकटे दुकटे होते. परंतु २०१४ मध्ये १२ बळी गेले. २०१५ मध्ये बळींची संख्या कमी होऊन ६ वर आली, तर २०१६ मध्ये पुन्हा १७ बळी गेले. २०१७ मध्ये २४ बळी गेले, तर २०१८ मध्ये संख्या कमी होऊन १७ वर आली, तर २०१९ मध्ये पुन्हा एकदा २४ जणांचा बळी गेला. २०२० मध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३१ जण बळी गेले आहेत.

अधिवासावरील अतिक्रमणाचा परिणाम

वन्यप्राण्यांच्या अधिवासावरील अतिक्रमणाचा विपरीत परिणाम म्हणून वन्यजीव हल्ल्यांत बळी जात आहेत. एकट्या ताडोबा बफरमध्ये सुमारे ३ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण आहे. यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास तसेच त्यांच्या भ्रमणमार्गाचा संकोच होत आहे. परिणामी मानव व वन्यजीव संघर्षात वाढ होत आहे. -किशोर रिठे , माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

शाकाहारी नीलगायींच्या हल्ल्यात गेले चार बळी

सन २०१० मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ४६६ जणांचा बळी गेला. यात चार बळी चक्क नीलगायींच्या हल्ल्यात गेले आहेत. शाकाहारी असलेल्या नीलगायींच्या हल्ल्यांत पडलेले बळी आश्चर्यकारक आहेत. कारण नीलगायी एकमेकींशी लढताना समोरच्या पायांच्या उपयोग करतात.

बातम्या आणखी आहेत...