आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयआयटी, ट्रिपल आयटी आणि एनआयटी या देशातील सर्वोच्च तंत्रशास्त्र संस्थांत सर्वाधिक ६,७४४ विद्यार्थी तेलगू भाषिक राज्यांतील आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशचे ४,१२० विद्यार्थी, तर राजस्थानचे ४,११६ विद्यार्थी तंत्रशास्त्राचे शिक्षण घेत आहेत. बिहार २,४३५ विद्यार्थ्यांसह चौथ्या, तर महाराष्ट्र २,३०० विद्यार्थ्यांसह देशात पाचव्या स्थानी आहे.
आयआयटी, ट्रिपल आयटी, एनआयटी अशा ९० संस्था तंत्रशिक्षण देतात. एनआयटीच्या ३१, ट्रिपल आयटी ३६, तर २३ आयआयटी संस्था आहेत. या संस्थांत प्रथम वर्षाच्या ४४,५९३ जागा आहेत. लोकसंख्येने अधिक असलेल्या २८ पैकी १८ राज्यांतून ३१,६३० विद्यार्थी या संस्थांत प्रवेश घेतात. त्यापैकी प्रथम वर्षात सर्वाधिक विद्यार्थी तेलंगण (३,५३१) आणि आंध्र प्रदेशचे ३,२१३ शिकत आहेत. म्हणजेच तेलगू भाषिक विद्यार्थ्यांची एकूण संख्या ६,७४४ आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश ४,१२०, तिसऱ्या क्रमांकावरील राजस्थानचे ४,११६ विद्यार्थी आहेत. त्यानंतर बिहार २,४३५ व पाचव्या स्थानी महाराष्ट्रातील २,३०० विद्यार्थी आहेत. कर्नाटकचे ६७० विद्यार्थी आहेत. हरियाणा छोटे राज्य असले तरी येथील १११३ विद्यार्थी आहेत. पश्चिम बंगाल १११३, मध्य प्रदेश १७५७, तामिळनाडू ७९२, गुजरात ८९१, तर पंजाबचे ६८१ विद्यार्थी आहेत.
१००% साक्षरतेच्या केरळातील केवळ १०८ विद्यार्थी आहेत. ओडिशा आणि छत्तीसगडचे अनुक्रमे ६८२ आणि ६८३ आहेत. दिल्लीतील १२४६ आणि झारखंडचे १३२५ विद्यार्थी तिन्ही संस्थांत शिक्षण घेत आहेत. उर्वरित १० छोटी राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशातून १२,९६३ विद्यार्थी आयआयटी, ट्रिपल आयटी आणि एनआयटीमध्ये उच्च तंत्रशिक्षण घेत आहेत.
देशातील ३३ अनुदानित तंत्रशास्त्र संस्थांमध्ये आहेत एकूण ६ हजार ७८ जागा
सरकारी अनुदानावरील (जीएफटीआय) तंत्रशास्त्र संस्थांची संख्या ३३ आहे. या संस्थांत प्रथम वर्षाच्या ६,०७८ जागा आहेत. ज्यांना आयआयटी, ट्रिपल आयटी व एनआयटीला प्रवेश मिळत नाही ते जीएफटीआयला प्राधान्य देतात.
निम्म्या २,९०६ जागा सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. इतर मागासांसाठी १०२८ तर अनुसूचित जातीसाठी ९५३ जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी ५०५ जागा आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी ५८७ जागा आहेत.
या तंत्रशिक्षण संस्थांत उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक, १००% साक्षरतेच्या केरळातील केवळ १०८ विद्यार्थी, तर हरियाणाचे १११३
गेल्या दोन वर्षांत १८ हजार ७०० जागा रिक्त
प्रवेश प्रक्रियेतील क्लिष्टतेमुळे मागील दोन वर्षांत तिन्ही प्रकारच्या ९० संस्थांत १८,७०० जागा रिक्त होत्या. त्यापैकी आयआयटीच्या १० हजार, तर एनआयटीच्या ८७०० जागा रिक्त राहिल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, ‘२०२१-२२ शैक्षणिक वर्षात ५,२९६ जागा रिक्त राहिल्या आहेत. याच संस्थांमधील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या १८५२ जागा रिक्त आहेत.’
आयआयटी, ट्रिपल आयटी व एनआयटीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांत तेलंगण-आंध्र प्रदेशचे ६,७४४, तर महाराष्ट्राचे २,३०० आसामी 700 मराठी 658 आेडिया 471 मल्याळी 398 तेलगू 371 कन्नड 234 पंजाबी 107 उर्दू 24
(स्रोत: इंडियाविद्या. कॉम, एआयएसएचई आणि स्टुडंट मंत्रणा)
आयआयटीतील प्रवेशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थान पहिल्या, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रादेशिक भाषेत परीक्षेस दीड लाख विद्यार्थ्यांची पसंती
आयआयटी एकूण प्रवेश
हिंदी 76459
गुजराती 44094
बंगाली 24841
तामिळ 1264
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.