आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सपर्ट:सुरुवातीची लस 50% उपयुक्त, मास्कने 98% कोरोना रोखण्यात यश

डॉ. व्ही.पी. पांडे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस आल्यानंतरही मास्क दीर्घकाळ लावणे कोरोना रोखण्यासाठी जास्त परिणामकारक असेल

कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याने जग अधीरपणे लसीची वाट पाहते आहे. परंतु सुरुवातीची लस फक्त ५०% उपयुक्त ठरू शकते. कोरोना लसीच्या बाबतीत असेच घडेल. म्हणजे ज्यांना लस दिली जाईल, त्यांच्यापैकी निम्मे लोक कोरोनापासून सुरक्षित राहतील. मात्र, आजवरचे संशोधन सांगते की, मास्कमुळे या साथरोगापासून ९८% पर्यंत सुरक्षित राहू शकता. यामुळे आम्ही सांगतो की, मास्क सुरुवातीच्या लसीपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते. अजून लस तर आलेली नाही. यामुळे साथरोग रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे, हे तिचे प्रथम कर्तव्य आहे. विशेषत: तरुण वर्गाने याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांच्यात लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे त्यांना संसर्ग झाला आहे, हेच समजून येत नाही. परंतु ते घरी येतात, तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. अजून लस येण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर प्रत्येकापर्यंत काही काळ लागेल. यामुळे ज्येष्ठांसाठी अथवा गंभीर आजार असणाऱ्यांसाठी ‘मास्क’ उपयुक्त लस ठरेल.

ढाल हेच शस्त्र : मास्क घालणाऱ्यास कोरोना झाला तरी तो निष्प्रभ ठरेल

मास्क शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंचे प्रमाण ९०% रोखतो. यामुळे संसर्गाचे प्रमाण घटते. तसेच अँटिबॉडी विकसित होतात. यामुळे रुग्ण गंभीर होत नाही. - न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन

लस जवळ, प्रवास दूर : ८० टक्के लोकसंख्येस लस येईपर्यंत मास्क लावणे गरजेचे

जोपर्यंत एखाद्या शहर-गावातील ८०% लाेकांपर्यंत लस मिळत नाही. तोपर्यंत साथरोग रोखण्यासाठी मास्क लावणे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. - डब्ल्यूएचओ

ही काळजी पण घ्या : मास्कला स्पर्श केल्यानंतर पुन्हा साबणाने हात नक्की धुवा

> मास्क ओला झाल्यास ताबडतोब बदला.

> रुमाल, ओढणीने तोंड झाकणे प्रभावी नाही.

> मास्क थ्री लेअर असायला हवा.

> मास्कला स्पर्श केल्यानंतर पुन्हा हात धुवा.

> बोलत असताना मास्क अजिबात काढू नका

बातम्या आणखी आहेत...