आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना ग्राउंड रिपोर्टिंग:आतापर्यंतचे सर्वात मोठे ग्राउंड रिपोर्टिंग; भास्करच्या 5 टीम, 50 दिवस, 28 राज्ये

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते सिक्कीमपर्यंत 28 राज्यांमधील बित्तंबातमी देतील ‘भास्कर’चे पत्रकार

कोरोना प्रादुर्भावामुळे देश अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे. या अनपेक्षित संकटात ‘दैनिक भास्कर’ने एक मोठा पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या या काळात पत्रकारितेच्या धर्माचे पालन करून पुढील ५० दिवस अाम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून ‘आँखो देखा हाल’ मांडणार आहोत.भास्करच्या पत्रकारांच्या ५ टीम देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करणार आहते. हे अत्यंत जोखमीचे काम असूनही भास्करचे रिपोर्टर कोरोना हॉटस्पॉट, देशातील औद्योगिक-धार्मिक शहरे, गावे आणि दुर्गम भागात जाणार आहेत. स्थलांतर, संघर्ष, परिवर्तन आणि यशाची बित्तंबातमी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. विपरीत परिस्थितीत जिद्द, ध्येयासक्त,दुर्दम्य आशावाद घेऊन संकटाशी मुकाबला करणाऱ्या व्यक्तींचीही भास्करचे पत्रकार आपली भेट घडवून आणणार आहेत. ‘फेक न्यूज’च्या आजच्या काळात आपल्याला अत्यंत तथ्यपूर्ण, अचूक आणि विश्वसनीय बातम्या देण्याचा संकल्प भास्करने सोडला आहे.

कोरोना काळात आपल्याला माहिती असावी अशी प्रत्येक गोष्ट

> भास्करचे पत्रकार देशातील सर्व २८ राज्यांत जातील.सुमारे २०० शहरे आणि हजार गावांना भेट देऊन रिपोर्टर तेथील परिस्थिती सांगतील

> भास्करचे फोटो जर्नालिस्ट कोरोना काळातील देशाची परिस्थिती छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत.

> कोरोना काळातील विविध मुद्द्यांची सखोल व वस्तुस्थितीची माहिती त्या-त्या राज्य व प्रदेशातील तज्ज्ञांकडून भास्कर आपल्यापर्यंत पोहोचवणार अाहे

टीम १ दिल्लीहून उत्तर भारताकडे

नवी दिल्ली, पश्चिम यूपी, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड

टीम-२ मध्य प्रदेश ते पश्चिम भारत

मध्य प्रदेश,राजस्थान, गुजरात

टीम-३ उत्तर प्रदेशातून ईशान्येकडील राज्यांत

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल, आसाम, सिक्कीम

टीम-४ मध्य भारतातील परिस्थिती

ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश

टीम-५ महाराष्ट्रातून दक्षिण भारताकडे

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र, तेलंगण.

बातम्या आणखी आहेत...