आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Leftist Also Bathed In The Colors Of Ramnama; Former West Bengal Minister Ghosh Was Present At The Ceremony

दिव्य मराठी विशेष:डावेही रामनामाच्या रंगात न्हाले; पश्चिम बंगालचेमाजी मंत्री घोष समारंभात झाले होते सहभागी

त्रिभुवन । अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शरयू तटावर बंकिमचंद्र घोष. - Divya Marathi
शरयू तटावर बंकिमचंद्र घोष.
  • मूर्तिपूजेला विरोध करणारे अनेक भूमिपूजनात सहभागी

अयोध्येत बुधवारी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान काही चकित करणारी दृश्ये पाहायला मिळाली. कार्यक्रमात रामभक्तांबरोबरच पश्चिम बंगालच्या माकप सरकारमधील माजी मंत्री बंकिमचंद्र घोष, आर्य समाज व कबीर पंथाचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. हे लोक राम-राम, सीता-रामच्या धूनवर तल्लीन झाले होते. मुस्लिम कारसेवक मंचाचे लोकही समारंभात सहभागी झाले होते.

घोष ४० वर्षे माकपमध्ये राहिल्यानंतर गेल्या वर्षी भाजपमध्ये सहभागी झाले. ते म्हणाले, मार्क्सवाद गरिबांची लढाई लढण्यासाठी ठीक होता, परंतु १९७२ पूर्वी १४ हजार कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्या काँग्रेसला आता कम्युनिस्ट पार्टीचे नेते पाठिंबा देत आहेत. वास्तविक बंगालच्या प्रत्येक गल्लीत कार्यकर्त्यांचे स्मारक आहे. कालचा शत्रू आजचा मित्र कसा होऊ शकतो? बंगालमधील पक्षाच्या धोरणामुळे मोहभंग झाला. १३ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोतील सात सदस्यांनी ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे घोष यांनी सांगितले.

बुधवारी घोष यांच्यासमवेत असलेले कार्यकर्ते रामनामाचा जयघोष करत होते. चुंडी व गंगा नदीच्या संगमावरील जल व माती येथे आणल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे आर्य समाजाच्या अयोध्येतील शाखेचे अपूर्व कुमार म्हणाले, आम्ही मूर्तिपूजेला विरोध करतो हे खरे आहे. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी एकेकाळी अयोध्येेत राहून तीन महिने राहून मूर्तिपूजेला विरोध केला होता. असे असले तरी आम्ही अयोध्येत भव्य मंदिर व्हावे यासाठी सातत्याने आवाहन केले.

आज वातावरण बदलत आहे. अनेकदा निर्गुण निर्मळ गंगेची धारा सगुण सरस्वतीमध्ये जाऊन मिळते, असे कबीरपंथी साधूंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...