आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल जवाहिरीचे रहस्यमय जीवन:पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे सांगितली होती सहकाऱ्यांची नावे, इजिप्तला पळाला तर लादेनने केले होते डॉक्टर

लेखक - आदित्य द्विवेदी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयमान अल जवाहिरी. इजिप्तच्या एका श्रीमंत कुटुंबात जन्मला, डॉक्टर झाल्यानंतर अतिरेकी बनला, लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाचे नेतृत्व केले व वयाच्या 71 व्या वर्षी काबूलमधील एका ड्रोन हल्ल्यात मारला गेला.

अल जवाहिरीच्या संपूर्ण आयुष्याची कथा याच 4 ओळींमध्ये संपते. पण थोडा बारकाईने अभ्यास केला असता त्याच्या आयुष्याचे अनेक रहस्य, धोका, कट-कारस्थान व हिंसाचाराचे पदर उलगडतात.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणला अल जवाहिरीचा संपूर्ण जीवनपट...

अल जवाहिरीचे ओसामा बिन लादेनसोबतचे हे छायाचित्र 2001 चे आहे. शुभ्र पगडी, काळी-पांढरी दाढी व माथ्यावर जखमेचा व्रण असणारा अल जवाहिरी अल कायदाचा मुख्य रणनितीकार होता.
अल जवाहिरीचे ओसामा बिन लादेनसोबतचे हे छायाचित्र 2001 चे आहे. शुभ्र पगडी, काळी-पांढरी दाढी व माथ्यावर जखमेचा व्रण असणारा अल जवाहिरी अल कायदाचा मुख्य रणनितीकार होता.

इजिप्तच्या श्रीमंत कुटुंबात जन्मला

अयमान मुहम्मद रबी अल जवाहिरीचा 19 जून 1991 रोजी इजिप्तच्या कैरो शहरात जन्म झाला. त्याचे वडील प्रोफेसर, तर चुलते 1 हजार वर्ष जुन्या अल अजहर यूनिव्हर्सिटीचे ग्रँड इमाम होते. जवाहिरीचे आजोबा कैरो यूनिव्हर्सिटीचे अध्यक्ष व रियाधमध्ये किंग सौद यूनिव्हर्सिटीचे संस्थापक व संचालक होते.

अल जवाहिरी अत्यंत हुशार विद्यार्थी होता. लहानपणापासूनच त्याने इस्लामिक लिटरेचर वाचणे सुरू केले होते. त्याच्यावर इस्लामी विचारवंत सय्यद कुत्ब यांच्या विचारांचा प्रभाव होता. कुत्ब जगाकडे केवळ 2 चष्म्यांतून पाहत होता -अल्लाहला मानणारे किंवा काफीर (तो मवाळ मुस्लिमांनाही काफीर मानत होता). 1966 मध्ये कुत्बला सूळावर चढवण्यात आले.

एकीकडे वैद्यकीय शिक्षण, दुसरीकडे, अंडरग्राउंड मिलिटेंट सेल

1966 मध्ये अल जवाहिरीने एक मिलिटेंट सेल स्थापन केला. त्याचा उद्देश इजिप्तमधील सेक्युलर सरकार हटवून इस्लामिक सरकार स्थापन करण्याचे होते. त्यावेळी जवाहिरी केवळ 15 वर्षांचा होता. 5 सदस्यांपासून सुरूवात झालेल्या संघटनेची सदस्यसंख्या 1974 मध्ये 40 वर पोहोचली.

अल जवाहिरी एकीकडे कैरो विद्यापीठात मेडिकलचे शिक्षण घेत होता. तर दुसरीकडे, अतिरेकी संघटनाही चालवत होता. 1974 मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याने 3 वर्ष लष्करात सेवा केली. 1978 मध्ये सर्जरीची मास्टर डिग्री घेतली.

कट्टरतेच्या बाबतीत जवाहिरीहून एक पाऊल पुढे होती त्याची पत्नी अज्जा

लॉरेन्स राइटचे पुस्तक 'द लूमिंग टॉवर: अल कायदा अँड द रोड टू 9/11' नुसार अज्जा अत्यंत धार्मिक महिला होती. ती बुरखा घालत होती. तसेच रात्रभर कुरानचे वाचन करत होती. दोघांची भेट कुटुंबांच्या माध्यमातून झाली. पण जवाहिरीने लग्नानंतरच अज्जाचा चेहरा पाहिला होता. अज्जाच्या सूचनेनुसार त्यांच्या लग्नात म्यूझिक वाजले नाही किंवा फोटोही काढण्यात आले नाही.

अज्जाची कट्टरता 2001 च्या एका घटनेवरुन दिसून येते. ऑक्टोबर 2001 मध्ये अमेरिकन हल्ल्यात जखमी अज्जा ढिगाऱ्यात दबली गेली होती. तिने आपला चेहरा कुणालाही दिसू नये म्हणून तिने या ढिगाऱ्यातून बाहेर येण्यासाठी मदत नाकारली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अज्जा व जवाहिरीच्या 4 मुली व एक मुलगा होता.

पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे सहकाऱ्यांची नावे सांगितली

आता पुन्हा परत येऊया अल जवाहिरीच्या कथेवर. 1981 मध्ये इजिप्तचे माजी राष्ट्रपती अन्वर सादात सादात यांच्या हत्येप्रकरणी अल जवाहिरीला अटक करण्यात आली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी जवाहिरीच्या कानशिलात मारली. त्यानंतर जवाहिरीनेही त्यांना मारहाण केली. पण अखेर पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे त्यांचा संयम संपला आणि त्याने आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांची नावे सांगितली.

द न्यूयॉर्करच्या एका रिपोर्टनुसार, आपल्या सहकाऱ्यांची फसवणूक केल्याचा अल जवाहिरीला मोठा पश्चाताप झाला होता. त्यामुळे 1984 मध्ये तुरुंगातून आल्यानंतर लगेचच त्याने इजिप्त सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो सौदी अरेबिया व पेशावरला पोहोचला. तिथे त्याने ओसामा बिन लादेनचा डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर त्याच्या कारनाम्याची कहाणी अवघ्या जगाने पाहिली.

अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यामागे अल जवाहिरीचाच हात?

  • 11 सप्टेबर 2001 रोजी 19 अतिरेक्यांनी 4 प्रवाशी विमानांचे अपहर केले. त्यातील 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तर व दक्षिण टॉवरला धडकवण्यात आली. तर तिसरे विमान पेंटागनवर क्रॅश झाले. या हल्ल्यात 93 देशांचे 2,977 जण ठार झाले होते. हा हल्ला अल कायदाने केला होता.
  • बिन लादेनला 9/11 या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हटले जाते. पण अमेरिकेच्या CIA व FBI च्या अधिकाऱ्यांनी हा हल्ला अल जवाहिरीचे अपत्य असल्याचा दावा केला होता. अल जवाहिरी सर्वच हल्ल्यांची जबाबदारी व निगराणी करत होता.
  • 9/11 हल्ल्यांपूर्वीच अल जवाहिरी अल कायदाच्या निर्णय प्रक्रियेत केंद्रस्थानी आला होता, असे 2004 च्या एका हार्ड डिस्कद्वारे स्पष्ट झाले होते. तो लादेन व उच्चपदस्थ कमांडरमध्ये माहितीचे आदान-प्रदान करत होता.
  • अल जवाहिरी इराक व पाकिस्तानच्या अल कायदाच्या नेत्यांसोबत संबंध प्रस्थापित करण्यातही त्याची महत्वाची भूमिका होती.

आणखी काही मोठ्या हल्ल्यांमागे होता अल कायदाचा हात...

सोमालियात 1993 मध्ये झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या हत्येमागेही अल जवाहिरीचे डोके होते. 4 ऑक्टोबर 1993 चा दिवस होता. अमेरिकन रेंजर्स व सोमालियातील अल कायदाशी संबंधित अतिरेक्यांत तुंबळ धुमश्चक्री सुरू होती. यावेळी अतिरेक्यांचा लीडर जनरल आयदीदच्या अतिरेक्यांनी राजधानी मोगादिशुमध्ये 2 अमेरिकन हेलिकॉप्टर पाडले होते. त्यात 18 अमेरिकन सैनिक शहीद झाले होते.

7 ऑगस्ट 1998 रोजी नैरोबी, केन्या व टांझानियाच्या दार एस सलाममध्ये अमेरिकन दुतावासासमोर साखळी बॉम्बस्फोट करण्यामागेही जवाहिरीचा हात होता. या हल्ल्यात 224 जण ठार झाले होते. यात 12 अतिरेक्यांचा समावेश होता.

2000 मध्ये अदानच्या येमेन बंदरावर अल कायदाशी संबंधित अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेले जहाज अमेरिकन युद्धनौका USS कोलवर धडकवले होते. या हल्ल्यात अमेरिकेचे 17 नौसैनिक मारले गेले होते.
2000 मध्ये अदानच्या येमेन बंदरावर अल कायदाशी संबंधित अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेले जहाज अमेरिकन युद्धनौका USS कोलवर धडकवले होते. या हल्ल्यात अमेरिकेचे 17 नौसैनिक मारले गेले होते.
2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागेही जवाहिरीचा हात असल्याचे मानले जाते. त्यातही 56 जणांचा बळी गेला होता. जवाहिरी ब्रिटनला इस्लामला सर्वात मोठा शत्रू मानत होता.
2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागेही जवाहिरीचा हात असल्याचे मानले जाते. त्यातही 56 जणांचा बळी गेला होता. जवाहिरी ब्रिटनला इस्लामला सर्वात मोठा शत्रू मानत होता.

बायडेन म्हणाले -शोधून मारले, ऑपरेशन यशस्वी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अल जवाहिरीच्या खात्म्यानंतर देशाला संबोधित केले. ते म्हणाले -'आम्ही जवाहिरीचा शोध घेऊन त्याचा खात्मा केला. अमेरिका व येथील नागरिकांसाठी जो कुणी धोकादायक ठरेल, त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही अफगाणिस्तानातील अतिरेक्यांवर हल्ले कायम सुरू ठेवू.'

बायडेन आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले होते की, 'अमेरिकेने शनिवारी माझ्या निर्देशांनुसार अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये एक हवाई हल्ला केला. त्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी मारला गेला. न्याय झाला.'

बातम्या आणखी आहेत...