आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:2022 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जाणून घ्या दोन वर्षांत भारत कुठे असेल...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतराळात तिरंगा : भारत प्रथमच पाठवणार गगनयानातून प्रवासी
  • सागरी सामर्थ्य : नौदलाला मिळेल पहिली स्वदेशी विक्रांत युद्धनौका

2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. पुढील दोन वर्षांत आपला देश विविध क्षेत्रांत मोठी झेप घेणार आहे. आगामी दोन वर्षात देशात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार होईल. तसेच गगनयानातून अंतरात माणूस पाठवणार आहे. असे करणार भारत जगातील चौथा देश ठरेल. संरक्षण क्षेत्रात नौदलाला पहिली स्वदेशी विक्रांत युद्धनौका मिळणार आहे. यामुळे भारताचे सागरी सामर्थ्य वाढणार आहे.

जाणून घ्या दोन वर्षांत भारत कुठे असेल

अर्थव्यवस्था : २७ कोटी लोक गरिबीतून बाहेर, २ वर्षांत गरिबी हटवण्याचे लक्ष्य

> २०२२ पर्यंत देशाच्या प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असेल. सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत ४० कोटी बँक खाती उघडण्यात आली. त्यांना जीवन व अपघात विमा देण्याचे लक्ष्य आहे.

> देशात २०२२ पर्यंत १३ कोटी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ३.५ वरून ७.५ लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. २०१९ मध्ये अशी ९.२ कोटी कुटुंबे होती.

> 5.5% असू शकतो २०२२-२३ मध्ये भारताचा वृद्धिदर. ग्लोबल इकॉनॉमिक आउटलूकमध्ये फिच रेटिंग्जचा हा अंदाज. भारत वेगाने पूर्वस्थितीत येईल, असा अंदाज आहे.

> 27.3 कोटी भारतीय यूएननुसार २०१५ पर्यंत गरिबीतून बाहेर निघाले. २०२२ पर्यंत गरिबीमुक्ती भारताचे लक्ष्य.

इन्फ्रास्ट्रक्चर : भारतमाला-सागरमाला देशाची आर्थिक गती वाढवतील

२०२२ पर्यंत १६ राज्यांना जोडणाऱ्या ३५,००० किमी माहमार्ग निर्मितीची भारतमाला योजना २०२२ पर्यंत पूर्ण होईल. यात ९००० किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर होतील. याशिवाय सागरमाला प्रकल्पही पूर्ण होईल. या प्रकल्पात ७५ हजार किमीचे समुद्रकिनारे, १२ महत्त्वाची बंदरे, १८५ छोट्या बंदरांचे आधुनिकीकरण होईल. अशाच प्रकारे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २०२२ पर्यंत देशात २० स्मार्ट सिटी जवळपास तयार होतील. याबरोबरच ९९ स्मार्ट सिटींत २.०१ कोटी रु.ची विकासकामे नंतरच्या २-३ वर्षांत पूर्ण होतील.

2.95 कोटी घरे तयार होण्याचा अंदाज आहे हाउसिंग फॉर ऑल योजनेअंतर्गत. या योजनेत २०२२ पर्यंत देशाच्या प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचे नियोजन आहे.

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार होईल

जम्मू्-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर होत असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पुढील वर्षी पूर्ण होईल. २०२२ मध्ये त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे लक्ष्य आहे. हा पूल भारतीय रेल्वेच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे.

> नदीपासून ३५९ मीटर उंच आहे पूल

> फ्रान्सच्या आयफेल टॉवरहून ३५ मीटर उंच

संरक्षण : पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेने शक्ती वाढेल

पहिल्या स्वदेशी विमानवाहू ‘विक्रांत’ युद्धनौकेची बांधणी तिसऱ्या टप्प्यात आहे. ४० हजार टनांच्या या युद्धनौकेचे जलावतरण २०२१ मध्ये होईल. २०२२ पर्यंत ती भारतीय नौदलात समाविष्ट होऊ शकते. विक्रांतमध्ये ३० फाइटर जेट व १० हेलिकॉप्टर तैनात होतील.

> 2022 पर्यंत नवे तेजस

> भारताला आणखी राफेल मिळतील,

> स्वदेशी तेजसचे नवे रूप ‘एमके १ ए लाइट कॉम्बॅट’ही उड्डाण करेल. त्याचे डिझाइन तयार आहे.

अंतराळ : अंतराळात प्रवासी पाठवणारा चौथा देश ठरेल भारत

स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी अंतराळात प्रवासी पाठवणे ही भारताची मोठी कामगिरी ठरेल. इस्रोच्या अंतराळयान मोहिमेअंतर्गत ३ भारतीय अवकाशात जातील. असे करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.

> इस्रो चांद्रयान ३चे लाँचिंग पुढच्या वर्षी करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव क्षेत्रात ते जाणार आहे. > २०२१च्या सुरुवातीला भारत पहिल्या सोलर मिशनची सुरुवात करणार आहे.

> 36 मिशन पूर्ण करणार इस्रो.

> नासासोबत मिळून इस्रो एनआयएसएआर सॅटेलाइटवरदेखील काम करणार आहे. ते भूकंप, चक्रीवादळाचा अंदाज यावर संशोधन करतील.

कृषी : कृषी निर्यात व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य

> 4.5 लाख कोटी रु. कृषी निर्यातीचे लक्ष्य २०२२ पर्यंत, सध्या २.७ लाख कोटींच्या आसपास

> रोजगार निर्मितीची पुढची लाट कृषी क्षेत्रातून येऊ शकते. कृषी क्षेत्रात एकूण खासगी गंुतवणूक २०१५-१६ मध्ये ६१ हजार कोटी रु. होती, ती २०२२-२३ पर्यंत १.३९ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची आशा आहे.

> भारताचे खाद्यान्न उत्पादन सध्या विक्रमी २९६ दशलक्ष टन आहे. धान्याचा सरासरी साठा आधीपेक्षा २.२ टक्के जास्त आहे. येत्या काही वर्षांत भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था समग्र विकासात मजबूत योगदान देईल.

> संकटात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्र अर्थव्यवस्था वाचवू शकते. २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे.

आरोग्य/ शिक्षण : आरोग्य व शिक्षण आता प्रत्येक मुलापर्यंत पोहोचेल

> देशातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा देण्यासाठी २०२२ पर्यंत १.५ लाख आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सोंटर्स सुरू केली जातील. आता २८,००५ सोंटर्स आहेत. आयुष्मान भारत योजनेत १० लाख कम्युनिटी आरोग्य अधिकाऱ्यांना रोजगार मिळेल. २०२५ पर्यंत टीबी निर्मूलन करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. केरळ २०२०, हिमाचल प्रदेश २०२१, सिक्कीम आणि लक्षद्वीप २०२२ पर्यंत टीबीमुक्त होतील. डब्ल्यूएचओने २०३० पर्यंत जगाला टीबीपासून मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

> 2022 भारतातील शैक्षणिक सुधारणांसाठी नवी यंत्रणा राबवली जाईल. शिक्षण हक्क व्याप्ती वाढेल. ३ ते १८ वर्षे वयोगटातील मुले आरटीईत येतील. ही वयोमर्यादा ६ ते १४ वर्षे होती.

तंत्रज्ञान : प्रत्येक गावात ब्रॉडबँड इंटरनेट, ७ लाख कोटींचा होईल खर्च

> नॅशनल ब्रॉडबँड मिशनअंतर्गत २०२२ पर्यंत प्रत्येक गावात ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचवले जाईल. यासाठी ७ लाख कोटींची गुंतवणूक होईल. यात ३० लाख किलोमीटर रूट ऑप्टिकल फायबर अंथरले जाईल.

> देशात २०२२ पर्यंत 83 कोटी स्मार्टफोन युजर्स होतील. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या मते. सध्या ही संख्या ५० कोटी.

> आंत्रप्रेन्योरशिप आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहनासाठी सुमारे ६० इन्क्युबेशन सेंटर तयार केले. त्यांची संख्या वाढवून १०० करण्याची योजना आहे. १००० पेक्षा जास्त ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ तयार केल्या आणि दोन वर्षांत त्यांची संख्या १० हजार होईल. टिंकरिंग लॅब्जचा उद्देश विद्यार्थ्यांची विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणितात जिज्ञासा वाढवणे हा आहे.

मनोरंजन : जगाच्या टॉप-१० मध्ये असेल भारताचा ओटीटी बाजार

> अर्नेस्ट अँड यंगच्या एका रिपोर्टनुसार.. २०२१-२२पर्यंत मनोरंजनाचे डिजिटल माध्यम, पारंपरिक माध्यमे (टीव्ही-रेडिओ) च्या पुढे जाईल.

> २.४ लाख कोटी रुपयांचे होईल २०२२ पर्यंत माध्यम व मनोरंजन जगत.

> १४ कोटी लोक स्मार्ट टीव्हीचा वापर करण्याची अपेक्षा. हा आकडा ४० लाखांपर्यंत जाईल.

> असोचेम आणि पीडब्ल्यूसीच्या अध्ययनानुसार २०२२पर्यंत भारताची व्हिडिओ ओटीटी (नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब इ.) बाजारपेठ जगातील पहिल्या १०मध्ये असेल. हा बाजार ५३६३ कोटींचा होईल. स्टेटिस्टाच्या मते, २०२२ पर्यंत ओटीटी महसूल ४८०० कोटी रुपयांपर्यंत जाईल.

बातम्या आणखी आहेत...