आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Number Of Coronavirus Patients Is Slowly Declining After Reaching The Peak: Task Force Chief Dr. Sanjay Oak

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष मुलाखत:कोराेना विषाणूची रुग्णसंख्या शिखरावर गेल्यानंतर हळूहळू खाली उतरते : टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: चंद्रकांत शिंदे
  • कॉपी लिंक
  • टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांची दिव्य मराठीला विशेष मुलाखत

कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन करून ४५ दिवस झाले. मात्र, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसात राज्यात रोज १ हजारच्या आसपास नव्या रुग्णांची नोंद होत आहे. ही संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी पुढील काळात संख्या वाढणार असून जास्तीत जास्त बेड्स उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे मत दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे?

उत्तर : कोरोना फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आणि नंतर ती एका शिखरावर जाऊन थांबते. एकदा शिखरावर संख्या गेली की नंतर ती हळूहळू खाली उतरू लागते. सध्या आपली वाटचाल कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या शिखराकडे सरू आहे. पुढील काही दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या आपल्याला वाढलेली दिसेल. आपल्यापुढे एक मोठे आव्हान आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायची आहे. काही दिवसांनंतर मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी होताना आढळेल. राज्यात आपण चाचण्यांची संख्या वाढवल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.

प्रश्न : कोरोनाचे संक्रमण झाले म्हणूनच चाचण्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे? संक्रमण झाले नसते तर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेली दिसली नसती असे म्हणता येईल का?

उत्तर : कोरोनाचे सोशल संक्रमण झाले आहे असे आम्ही म्हणणार नाही. सोशल संक्रमणाचे काही निकष आहेत आणि यासाठी जी समिती आहे तीच याबाबत सविस्तर माहिती देऊ शकेल किंवा संक्रमण झाले आहे की नाही हे सांगू शकेल. ती समिती काम करीत आहे. मात्र, हे खरे आहे की कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे एक रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांना संसर्ग झाला असावा. अशा संसर्ग झालेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संक्रमण झाले नसते तर कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आढळली असती हेसुद्धा बरोबर आहे.

प्रश्न : तुमच्यापुढील मोठे आव्हान आता काय आहे?

उत्तर : सर्व प्रकारची आव्हाने आहेत. टास्क फोर्स नेमल्यापासून मी सतत फिरतीवर आहे. सर्व रुग्णालयांना भेटी देत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या जशी जशी वाढेल त्या प्रमाणात बेड्सची संख्या वाढवावी लागणार आहे. मला रोज अनेक भागातून बेड उपलब्ध करून द्या म्हणून फोन येतात. पण बेड्स उपलब्ध नसल्याने मी काहीही करू शकत नाही. आपल्याकडे सध्या वैद्यकीय उपकरणे आहेत. मात्र, बेड्स उपलब्ध नाहीत. मी नुकतीच सायन रुग्णालयाला भेट दिली.

प्रश्न : वैद्यकीय उपकरणे पुरेशी आहेत?

उत्तर : पीपीई किट, मास्क इत्यादी वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत. त्यांची वानवा नाही. मात्र एमएमआरडीए आणि नेस्को आदि ठिकाणी बेड्स उपलब्ध केले जात आहेत. तेथे फक्त बेड्स आहेत, डॉक्टर, नर्स, ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध करणे आवश्यक आहे आणि तेच मोठे आव्हान आहे. यासोबतच आयसीयूचीही मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. या अडचणीवरही मात करण्याचा आमचा प्रयत्न सुरु असून आपण लवकरच कोरोनावर मात करू.

नायर रुग्णालयामध्ये ८५० बेड्स उपलब्ध करणार

सायनमध्ये पुढील आठवड्यात २२० बेड कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध होतील. नायरमध्ये पुढील आठवड्यात आणखी ८५० बेड्स उपलब्ध केले जाती. एमएमआरडीए, नेस्को येथे एक-एक हजार बेड्सची सोय करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात एकूण साडे सहा ते ७ हजार बेड्सची उपलब्ध होतील. याशिवाय मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नौदलाच्या अश्विनी इस्पितळातही कोरोनाग्रस्तांची बेड्सची सोय करण्यात आली आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...