आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:आम्ही घाण्यातच झालोय ‘लॉक’, गुऱ्हाळ कामगारांची व्यथा; 400 कामगारांची उपासमार

करवीरनगरीतून रमेश पवार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्यवसायच थांबले किती दिवसात साधी शंभरची नोट पाहिली नाही, चप्पल कारागिरांच्या कथा

पावसाळ्यात बंद होणाऱ्या गुऱ्हाळाला यंदाचे वर्ष अपवाद ठरले. अनेकजण घाण्यावरच अडकले. तेथे काम सुरूच आहे. ‘कसला कोरोना अन् कसलं लॉकडाऊन, काम केल्याशिवाय पोट भरत नाय’ हीच त्यांची भावना आहे. तर प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांचे पण हाल फार चांगले नाहीत.

कार्ली गावातल्या कदमांच्या गुऱ्हाळावर बालाजी चव्हाण काम करत होते. खरं तर पावसाळ्यात गुऱ्हाळे बंद असतात, पण यंदाचं वर्ष याला अपवाद ठरलं. बालाजीसारखे कामगार लॉकडाऊनमुळे घाण्यावरच अडकले. सोलापूरच्या मोडनिंब गावचे बालाजी दरवर्षी ऊसाच्या हंगामात कोल्हापूरला येऊन घाण्यावर काम करतात. हंगाम संपला की फेब्रुवारी - मार्चमध्ये गावाकडे परततात. यंदा मात्र लॉकडाऊन जाहीर झालं आणि ते घाण्यावरच अडकले. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांसाठी गावी परतण्याची सोय केली होती, तरी ते गावी का गेले नाहीत? सगळ्यांच्या मनात उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर त्यांचं थेट उत्तर - गावाकडे जाऊन तिथं तरी काम नाही आणि असलं तरी कोरोनामुळे कुणी कामावर घेत नाही. त्यापेक्षा लहान लेकरासह त्यांनी घाण्यावरच राहणं पसंत केलं.

४०० कामगारांची उपासमार

१९७२ मध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा चप्पल बंद झाली होती, त्यानंतर आता दुसऱ्यांदा धंदा बंद झाला’, पाऊणशे वयोमान पार केलेले महादेव कांबळे सांगत होते. सुभाषनगर म्हणजे कोल्हापुरी चपलाच्या कारागिरांची नगरी. यांच्या कलाकारीनं कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय ब्रँडचा दर्जा दिला. शेकडो हातांना कामे दिली. कोट्यवधींची उलाढाल आणि लाखोंचे परकीय चलनही. पण, लॉकडाऊननं येथील ४०० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोल्हापूरचे मंदिर, पर्यटन बंद. परिणामी चपलेच्या व्यवसायालाही लगाम. सर्वांच्याच दुकानात चपलांचा साठा. दुकानांकडून ऑर्डर्स आटल्या आणि कारागिरांचे जगणेही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser