आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Results Of The World's Largest Study On The Effectiveness Of The Vaccine Say That The Covishield Vaccine Gives 93% Protection From Corona, The Death Rate Is Also 98% Less

कोवीशील्ड दमदार:कोवीशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची शक्यता 93% कमी होते, 15 लाख आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सवरील अभ्यासात दावा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असल्याच्या वृत्तांमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातही प्रामुख्याने एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण, देशातील सशस्त्र दलांच्या 15 लाख 90 हजार पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर झालेल्या अभ्यासात दिलासादायक बाब समोर आली आहे. या सर्वांना कोवीशील्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांच्यातील ब्रेक-थ्रू इन्फेक्शन (Breakthrough Infection) 93% कमी झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ असा की कोवीशील्ड लस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका 93% कमी झाला आहे.

ब्रेक-थ्रू इन्फेक्शनवर झालेल्या देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासानुसार, देशात व्हॅक्सीनेशन झाल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ 1.6% आहे. म्हणजेच, दोन्ही डोस घेतलेल्या 1000 लोकांपैकी केवळ 16 जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने दोन्ही डोस घेऊन दोन आठवडे झाल्यानंतरच त्याला पूर्णपणे व्हॅक्सीनेटेड असे म्हटले जाते. त्यांच्यावरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ब्रेक थ्रू इन्फेक्शनच्या प्रमाणावर चंदिगडच्या पीजीआय येथे आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज (AFMC) ने अभ्यास केला आहे. या अभ्यासाला विन-विन कोहोर्ट (VIN-WIN cohort) असे नाव दिले. तसेच हे जर्नल 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (The New England journal) मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

लसींच्या कामगिरीवर जगातील सर्वात मोठे अध्ययन
आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज (AFMC) ने केलेल्या या अध्ययनाला आतापर्यंतचे सर्वात मोठे अध्ययन म्हटले जात आहे. सध्या या अभ्यासातील प्राथमिक निष्कर्ष जारी करण्यात आले आहेत. संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत व्हॅक्सीनच्या कामगिरीवर करण्यात आलेले अभ्यास 10 लाख लोकांपेक्षा कमीवर करण्यात आले आहेत. त्यामुळेच, विन-विन कोहोर्ट (VIN-WIN cohort) लसींच्या प्रभावावर करण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे अध्ययन ठरू शकते.

कोवीशील्ड लस ही ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या AZD-1222 फॉर्मूलेशनचा का मेड इन इंडिया प्रकार आहे. भारतात कोरोनाच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या लसींमध्ये सर्वाधिक प्रमाणात याच लस वापरल्या जात आहेत.

नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी अभ्यासावर बोलताना सांगितले, की "हा अभ्यास 15 लाखांपेक्षा अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्सवर करण्यात आला आहे. ज्यांनी कोवीशील्डचे दोन डोस घेतले त्यातील 93% लोकांना कोरोनाच्या विरोधात संरक्षण मिळाले आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक सुरू असतानाच हा अभ्यास करण्यात आला."

भारतात कोरोनावर लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारी रोजी करण्यात आली. यात सर्वप्रथम सशस्त्र दलातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना डोस देण्यात आले. हा अभ्यास 30 मे पर्यंत दोन्ही डोस घेतलेल्या 15 लाख 90 हजार लोकांवर करण्यात आला आहे. या अभ्यासात एकूणच 15,95,630 लोकांचे सरासरी वय 27.6 वर्षे असून त्यातील 99% पुरुष होते. 135 दिवस चाललेल्या या स्टडीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्यांपैकी 95.4% लोकांनी 30 मे पर्यंत सिंगल डोज आणि 82.2% लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. त्या सर्वांची वर्गवारी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये सिंगल आणि डबल डोस घेणारे आणि व्हॅक्सीन घेऊन 2 आठवडे झालेले असे प्रकार होते. त्यांची संख्या रोज बदलत होती. त्याच्या नोंदी ठेवण्यात आल्या. त्यांची संख्या मोजण्यासाठी पर्सन डे या मापकाचा वापर करण्यात आला होता.

त्यानुसार 50 पर्सन डे चा अर्थ असा...

  • 50 लोकांना एका दिवसासाठी त्या वर्गात ठेवण्यात आले
  • 1 व्यक्ती 50 दिवसांपर्यंत त्या वर्गात ठेवण्यात आली
  • 25 लोक 2 दिवसांसाठी त्या वर्गवारीत होते
  • 2 लोक 25 दिवसांसाठी त्या वर्गवारीत ठेवले होते
  • 5 लोक 10 दिवसांसाठी त्या वर्गात ठेवण्यात आले
  • 10 लोक 5 दिवसांसाठी त्या वर्गात ठेवण्यात आले

या प्रमाणे वर्गवारीत मोजणी रोज केली जात होती.

व्हॅक्सीनचे सिंगल डोस 82% प्रभावी

याच महिन्याच्या सुरुवातीला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तामिळनाडू पोलिस विभाग, ICMR-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांच्यामार्फत करण्यात आलेला अभ्यासाची माहिती जारी केली. त्यानुसार, लसीचा सिंगल डोस घेतल्यास तो कोरोनावर 82% पर्यंत प्रभावी ठरू शकतो. दोन्ही डोस घेतल्यास कोरोनापासून 95% संरक्षण मिळते.

रुग्णालयात दाखल होणारे 87.5 लोक व्हॅक्सीन न घेतलेले
महाराष्ट्र मेडिकल एजुकेशन अँड रिसर्चच्या संचालकांनी आपल्या अखत्यारीतील 20 सरकारी कोविड केअर सेंटरचा अभ्यास केला. त्यानुसार, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांपैकी 87.5% लोकांनी लसीचा डोस घेतलाच नव्हता.

अभ्यासातील निष्कर्ष लसींवरील शंका दूर करतील
अभ्यासातील सहाय्यक लेखक आणि आर्म्ड फोर्सेज मेडिकल सर्विसेजचे महासंचालक रजत दत्ता यांच्या मते, अभ्यासातील निकालांवरून कोरोना लस किती प्रभावी आहेत हे स्पष्ट होत आहे. यामुळे लसींवर असलेल्या लोकांच्या शंका दूर करण्यात निश्चितच मदत होईल.

लस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करा
नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना विरोधात लढण्याचा एकमेव शस्त्र लसीकरण आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. पण, यातून कोरोना होणारच नाही अशी गॅरंटी नाही. त्यामुळे, लसीकरण झाल्यानंतरही कोरोना काळातील निर्धारित नियमांचे पालन करा, सोशळ डिस्टन्सिंग ठेवा, मास्क लावा. जगातील कुठलेही व्हॅक्सीन सध्या कोरोना 100 टक्के होणार नाही अशी गॅरंटी देत नाही. तरीही गंभीर परिणामांपासून लस आवश्य बचाव करत असते. त्यामुळे लस घ्या असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...