आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • The Situation Is Not Good For The Media Here, Most Of The Journalists Are Hiding Or Want To Leave The Country Due To The Fear Of Taliban.

अफगाण वृत्तवाहिनीच्या संपादकाची मुलाखत:येथील परिस्थिती माध्यमांसाठी चांगली नाही, तालिबानच्या भीतीमुळे बहुतेक पत्रकार लपून बसले आहेत किंवा देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत

पूनम कौशल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा या मुलाखतीतील मुख्य भाग वाचा...

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे अडचणीत आली आहेत. एकापाठोपाठ पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, विशेषत: महिला पत्रकारांसाठी. सरकारी वृत्तवाहिन्यांवर महिला पत्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. अलीकडेच जर्मन ब्रॉडकास्टर डॉयचे वेलेसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराच्या घरावर तालिबान्यांनी हल्ला केला. त्यात त्याचा एक नातेवाईक ठार झाला, काही लोक जखमीही झाले. जलालाबादमध्येही तालिबानविरोधी रॅली कव्हर करणाऱ्या पत्रकाराला तालिबान्यांनी बेदम मारहाण केली.

परिस्थिती आता अशी झाली आहे की, बहुतेक पत्रकार देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानातील अनेक पत्रकारांनी दैनिक भास्करशी संपर्क साधून भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी मदत मागितली आहे. या सगळ्या दरम्यान, अफगाणिस्तानची सर्वात मोठी वाहिनी टोलो न्यूज आपले काम करत आहे.

पण, चॅनेलच्या कामाच्या पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. टोलो न्यूजने शुक्रवारी अफगाणिस्तानची मानवाधिकार कार्यकर्ती आणि काही वर्षांपूर्वी तालिबानच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या मलाला युसुफजईची मुलाखत घेतली. आम्ही टोलो न्यूजचे संपादक मिरआका पोपाल यांच्याशी बातचीत केली आणि अफगाणिस्तानातील माध्यमांची सद्य परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीतील मुख्य भाग वाचा...

तालिबानने सरकारी वाहिन्यांवर महिला पत्रकारांवर बंदी घातली आहे. या छायाचित्रात महिला अँकरऐवजी एक तालिबानी स्टुडिओमध्ये बसलेला दिसत आहे.
तालिबानने सरकारी वाहिन्यांवर महिला पत्रकारांवर बंदी घातली आहे. या छायाचित्रात महिला अँकरऐवजी एक तालिबानी स्टुडिओमध्ये बसलेला दिसत आहे.

प्रश्न: सध्या अफगाणिस्तानमधील पत्रकारांची परिस्थिती कशी आहे, त्यांना कोणत्या प्रकारच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे?

उत्तर: सध्या पत्रकारांसाठी परिस्थिती फारशी चांगली नाही, म्हणूनच अनेक पत्रकारांना अफगाणिस्तान सोडून बाहेर जायचे आहे. बरेच लोक रस्ते किंवा हवाई मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

प्रश्न: मग अफगाणिस्तानमधील स्वतंत्र माध्यमांचे भविष्य काय आहे?

उत्तर: सध्या तालिबानचा स्वतंत्र माध्यमांकडे काय दृष्टिकोन असेल, याकडे आमचे लक्ष लागले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, स्वतंत्र माध्यमे अफगाणिस्तानच्या भविष्यात भूमिका बजावतील, पण आम्हाला तालिबानकडून अधिक हमीची गरज आहे. त्यांनी माध्यमांना कोणत्याही सेन्सॉरशिप आणि निर्बंधांशिवाय त्यांचे काम करू द्यायला हवे. विशेषतः त्यांनी महिला पत्रकारांना काम करण्याची परवानगी द्यावी.

आतापर्यंत तालिबान राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीवर काम करण्यात व्यस्त आहेत आणि त्यांनी माध्यमांबाबत कोणताही औपचारिक आदेश दिलेला नाही. पुढील काही महिन्यांत माध्यमांबाबतची परिस्थिती स्पष्ट होईल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त माध्यमांसाठी तालिबान काय नियम बनवतात ते आपण पाहू.

प्रश्न: तुम्ही मलाला युसुफजईची मुलाखत घेतली, यामुळे तालिबान नाराज होऊ शकतो का?
उत्तर: या मुलाखतीमुळे तालिबान नाराज होईल असे मला वाटत नाही. त्याला अजून बरेच काम करायचे आहे. आम्हाला वाटते की, ते स्वतंत्र माध्यमांना सहकार्य करतील आणि माध्यमांनीही त्यांना सहकार्य करावे.

प्रश्न: टोलो न्यूजच्या महिला कर्मचारी कामावर येत आहेत की तुम्ही त्यांना येण्यास मनाई केली आहे?

उत्तर: काबूलमध्ये जेव्हा पहिल्या दिवशी तालिबानचे राज्य आले तेव्हा आम्ही आमच्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले नाही, पण दुसऱ्या दिवशी तालिबानला न विचारता आम्ही आमच्या सर्व महिला अँकर आणि रिपोर्टरना बोलावले आणि त्यांनी कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे काम केले. आमच्या महिला कर्मचारी कार्यालयात येऊन काम करत आहेत.

प्रश्न: महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे का, किंवा तुम्हाला महिला कर्मचा-यांबाबत तालिबानकडून काही आदेश मिळाले आहेत का?

उत्तर: आमच्या महिला कर्मचारी पूर्ण उत्साहाने काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम आवडते. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या बंदीविरोधात लढा देण्याचा आणि आपले काम सुरू ठेवण्याचा आग्रह धरला आहे. पण आत्तापर्यंत आम्हाला तालिबानकडून कोणताही आदेश मिळाला नाही किंवा त्यांनी कोणतेही निर्बंध लावले नाहीत. दरम्यान, महिला पत्रकारांनी त्यांचे काम करताना हिजाब घालण्याचा आग्रह तालिबान धरत आहे.

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने महिला मीडिया कर्मचा-यांवर हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने महिला मीडिया कर्मचा-यांवर हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या बातम्याही आल्या आहेत.

प्रश्न: काही अहवालांमध्ये दावा केला आहे की तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर ते टोलो न्यूजच्या कार्यालयातही दाखल झाले होते, त्यांनी तुम्हाला काही आदेश दिले का?

उत्तर: तालिबान आमच्या कार्यालयात आले नाहीत, पण आमच्या कंपाऊंडमध्ये दाखल झाले होते. ते सरकारी बंदुका शोधत इथे आले होते, पण आमच्याकडे सरकारी शस्त्रे नसून खाजगी शस्त्रे आहेत. तुम्ही खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून संरक्षण घेऊ शकता, असे ते म्हणाले. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला सुरक्षेसाठी मदत करू. तालिबान आमच्या न्यूज ऑफिसमध्ये आले नाहीत. त्यांनी आमच्या कामात हस्तक्षेप केला नाही. ते फक्त कंपाउंडमध्ये आले होते.

प्रश्न: तालिबानने म्हटले आहे की ते माध्यमांना स्वतंत्र राहू देतील, या विधानावर तुमचा किती विश्वास आहे?
उत्तर: गेले काही दिवस फार चांगले गेले नाहीत. आम्हाला माहित आहे की यावेळी अनेक माध्यमे कार्यरत नाहीत. तालिबानने अनेक प्रांत ताब्यात घेतल्यानंतर ते बंद करण्यात आले आहेत. प्रांतातील माध्यमांची स्थिती फारशी चांगली नाही. राजधानी काबूलमध्येच मोठे मीडिया आउटलेट चालू आहेत. गेल्या चार दिवसांपासून जे घडत आहे ते बघून मी फार आशावादी नाही, परंतु मला अपेक्षा आहे की तालिबान माध्यमांना त्यांचे काम करू देतील आणि आता काम करत नसलेले आउटलेट देखील त्यांचे काम सुरू करतील.

ही महिला टोलो न्यूजची पत्रकार आहे. तालिबान्यांनी पकडल्यानंतरही टोलो न्यूजच्या महिला पत्रकार बाहेर पडून काम करत आहेत.
ही महिला टोलो न्यूजची पत्रकार आहे. तालिबान्यांनी पकडल्यानंतरही टोलो न्यूजच्या महिला पत्रकार बाहेर पडून काम करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...