आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेस्लाचे मालक एलन मस्क 240 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन हे 95 अब्ज संपत्तीसह जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. दोघेही जुने मित्र आहेत. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एका रिपोर्टमध्ये या दोन अब्जाधीशांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा झाला आहे.
एलन मस्कचे सर्गेई ब्रिनची पत्नी निकोल शनहानसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ब्रिनने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून मस्कसोबतची जुनी मैत्रीही तोडली आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये निकोल शनहान यांची कहाणी सांगणार आहोत..ज्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला आणि आता दोन अब्जाधीशांमध्ये झालेल्या वादाच्या त्या कारण बनल्या.
बालपण: वडील आजारी होते, आई इतरांच्या घरी काम करायची
निकोल शनहानचा जन्म 1989 मध्ये ऑकलंड, कॅलिफोर्निया येथे झाला.त्यांच्या जन्माच्या केवळ दोन वर्षांपूर्वी, पालक चीनमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. निकोल फक्त 9 वर्षांच्या होत्या जेव्हा बायपोलर डिसऑर्डर नावाचा मेंदू विकार असल्याचे निदान झाले.
आई इतरांच्या घरी काम करायची, पण खर्च भागत नसे. सरकारच्या शैक्षणिक योजनांच्या जोरावर निकोलचे कुटुंब जगत होते.
करिअर: पेटंट विशेषज्ञ आणि ClearAccessIP संस्थापिका
शनहानच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी प्युगेट साउंड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. तिथे त्यांनी अर्थशास्त्र, आशियाई अभ्यास आणि मँडरिन चायनीजचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी सेंटा क्लारा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
शनहान यांना आरपीएक्स कॉर्पोरेशनमध्ये पेटंट स्पेशालिस्ट म्हणून पहिली नोकरी मिळाली. मात्र तिथे त्यांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आणि अवघ्या 10 महिन्यांत नोकरी सोडावी लागली. यानंतर त्या नैराश्यात गेल्या आणि काही दिवसांसाठी त्यांनी सर्व काही सोडले.
नैराश्यातून सावरल्यानंतर शनहानने पेटंट हाताळण्यासाठी ClearAccessIP हा सॉफ्टवेअर व्यवसाय सुरू केला. यानंतर, 2019 मध्ये त्यांनी Bia-Echo नावाने स्वतःचे फाउंडेशन सुरू केले. याद्वारे त्यांनी 100 दशलक्ष म्हणजेच सुमारे 800 कोटी रुपये दान केले, जेणेकरून महिलांना त्यांच्या वाढत्या वयातही (35 वर्षांपेक्षा जास्त) आई होण्यास मदत होईल.
सर्गेईही ब्रिन यांच्याआधी एक विवाह झाला होता
निकोल शनहान आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन 2015 मध्ये योग रिट्रीट दरम्यान भेटले होते. त्यावेळी शनहानचे एका फायनान्स एक्झिक्युटिव्हशी लग्न झाले होते आणि ब्रिनचा घटस्फोट झाला होता.
इनसाइडरच्या मते, ब्रिन आणि शनहान पहिल्यांदा डेटिंग अॅपच्या सीईओच्या लग्नात एकत्र दिसले होते. जवळपास 3 वर्षे डेटिंग केल्यानंतर, ब्रिन आणि शनहान यांनी 7 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न केले.
याच वर्षी अनेक प्रयत्नांनंतर त्यांना मुलगी झाली. 2019 मध्ये 'पेज सिक्स' ला दिलेल्या मुलाखतीत, शनहानने सांगितले होते की, त्यांनी मूळ होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. WSJनुसार, ब्रिनने जानेवारी 2022 मध्ये शनहानकडून घटस्फोट मागितला. घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
अफेअर आरोप: गेल्या वर्षी मियामी येथे एका कार्यक्रमात मस्कशी जवळीक
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, एलन मस्क आणि शनहान डिसेंबर 2021 मध्ये मियामीमध्ये एका आर्ट इव्हेंटमध्ये जवळ आले आणि त्यांचे अफेअर सुरू झाले. मात्र ते फार कमी काळासाठी होते.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर ब्रिनने घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाची माहिती मिळाल्यानंतर मस्क खूप निराश झाले आणि त्यांनी ब्रिनची गुडघे टेकून माफी मागितली.
ब्रिनने माफी स्वीकारली, पण घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहिले. या अफेअरमुळे दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, मस्क यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
मस्क म्हणाले - हे सर्व निराधार आहे. सर्गेई आणि मी मित्र आहोत. काल रात्री आम्ही एका पार्टीत एकत्र होतो. गेल्या तीन वर्षांत मी निकोलला फक्त दोनदा पाहिलं आहे, दोन्ही वेळा आमच्या आजूबाजूला बरेच लोक होते, जवळीक नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.