आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:जन्मानंतर काही तासांतच समजले हा काेरोना रुग्णांचा हाेता बेड, आम्ही हिंमत सोडली नाही, पराक्रमने मिळवला विजय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनावर मात करणाऱ्या देशातील सर्वात लहान मुलगा पराक्रमची कथा

(मनीषा भल्ला)

भीती आणि निराशेवर मात केल्याने सपना व त्यांचे पती विकीसिंग खूप खुश आहेत. कारण त्यांचा मुलगा पराक्रम आता हसत-खेळत आहे. त्याच्या डोळ्यात आता कोरोनाच्या संघर्षाचे दु:ख दिसत नाही. सपना यांनी सांगितले, लॉकडाऊन सुरू होण्याच्या एक दिवस आधी मला प्रसववेदना सुरू झाल्या. मी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी सांगितले, गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. त्यामुळे लगेच भरती व्हावे लागेल. त्यांनी चेंबूरमधील दुसऱ्या रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला होता. मी पतीसोबत २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता रुग्णालयात गेले. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता एका मुलास जन्म दिला. आम्हाला साहजिकच आनंद झाला. दुपारी एका खोलीत नेण्यात आले. काही वेळातच बाळंतपण करणाऱ्या डॉक्टरांनी फोनवर सांगितले की, आम्हाला जी खोली देण्यात आली आहे, ती एका कोरोना रुग्णाला देण्यात आली होती. आमचा आनंद पार मावळून गेला. आता तुमच्याजवळ कोणी डॉक्टर अथवा परिचारिका येणार नाही, हा निरोप एेकून पती विकीला धक्का बसला. ‘रुग्णालयाने ज्या खोलीत कोरोनाचा रुग्ण ठेवला ती आम्हाला दिलीच कशी? ही चूक कशी घडली? असा प्रश्न माझे पती विकी यांनी विचारला तेव्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने तोंडाला पट्टी बांधली होती. प्रशासनाने आम्हाला खोली रिकामी करण्याचे सांगून दुसरा माेठा धक्का दिला. आम्हाला बाळाच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. यामुळे कोरोना चाचणी करण्याचा हट्ट धरला. खूप आरडाओरड केल्यानंतर अाम्हा तिघांची कोरोना चाचणी घेतली. माझी चाचणी निगेटिव्ह आली पण पत्नी व बाळांची चाचणी पॉझिटिव्ह आली. सपना व बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तेथे तीन अहवाल तिन्ही वेळा पॉझिटिव्ह आले. पण आता दोघे बरे आहेत. मुलाचे नाव पराक्रम ठेवले.

सपना यांनी सांगितले, सर्व बरे होईल असा विश्वास

सपना सांगतात, माझी व बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली, तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. परंतु आता पराक्रमला हसत-खेळताना पाहून हा माझ्या आयुष्यातील सुखाचा क्षण असल्याचे वाटते. डाॅक्टर, परिचारिकांसह आम्हा सर्वांचा विजय आहे. आता कोरोनाचा इतकी भीती बसली आहे की, वारंवार आमचे तापमान सतत तपासत असतो.

     

बातम्या आणखी आहेत...