आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाकाळात पहिल्यासारखे काहीच राहिले नाही. अर्थात प्रत्येक उत्सवाप्रमाणे कोलकातातील दुर्गा पूजाही अपवाद नसणार. ही गोष्ट तुम्हाला कोलकातामध्ये पाऊल टाकताच जाणवते. दरवर्षी पूजेच्या ४-५ महिन्यांआधीच जो उत्साह या शहरात जाणवतो तो नक्कीच आहे, मात्र यावेळी त्याची तीव्रता कमी आहे. रस्त्यांवरील गर्दी आणि पूजेच्या खरेदीचा बाजार दरवर्षाच्या तुलनेत फिका आहे. अर्थात ही गोष्ट ६ महिन्यांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये एक महिना घालवल्यानंतर व्यापारी व दुर्गा पूजा समित्यांना लक्षात आली होती. मात्र, जे शहर दुर्गा पूजा उत्सव साजरा केल्याशिवाय राहू शकत नाही तेथे अखेर यंदा या नऊ दिवसांत काय होईल? हा प्रश्न जेवढा गंभीर आहे त्याचे उत्तरही तेवढेच सहज, सरळ आणि शांती देणारे आहे. दरवर्षी पूजा मंडपांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पूजा समित्यांचे यावेळी बजेट कमी आहे, मंडप व मूर्तीच्या आकारावर मर्यादाही आहेत. यामुळे यावेळी कोलकातातील पूजेचे नाते भव्यतेशी नव्हे तर सामाजिक जबाबदारीशी आहे. येथील जवळपास प्रत्येक पूजा समिती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या बजेटचा एक भाग समाजाच्या त्या वर्गासाठी खर्च करत आहे ज्याने कोरोना, लॉकडाऊन किंवा अम्फान वादळामुळे आपल्या उपजीविकेचे साधन गमावले आहे.
कन्फेडरेशन ऑफ वेस्ट बंगाल ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुशील पोद्दार सांगतात, बंगालमध्ये दुर्गा पूजेदरम्यान जवळपास ३ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय व्हायचा. मात्र, कोविड- १९ मुळे थंड अर्थव्यवस्था आणि बाजाराची स्थिती बघता मे, जूनमध्ये शक्यता निर्माण झाली होती की, व्यवसाय २० ते २५ टक्क्यांपर्यंत राहील. मात्र, अनलॉकमुळे नंतर त्यात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली.
बॉलीगंजच्या समाजसेवक संघाच्या पीजेला यावेळी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी त्यांनी अम्फान वादळाने प्रभावित दुर्गम हिंगलगंज गावातील ७५ कुटुंबांची निवड केली आहे. या कुटुंबांना व्होकेशनल ट्रेनिंग तसेच आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडा व सार्वजनिक बांधकाम मंत्री अरूप बिस्वास यांच्या न्यू अलीपूरच्या सुरुची संघाच्या पूजेची थीम आहे ‘यावेळी उत्सव नाही- मानवतेची पूजा.’ या अंतर्गत दहा हजार गरजू व गरिबांना कपडे वाटप करण्यात आले. शिक्षणमंत्री व तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांच्या नाकतला उद्यान संघाने मंडप करण्याचे काम लॉकडाऊनमुळे काम गेल्याने घरी परतलेल्या ६० मजुरांना दिले आहे.
कुंभार आळीत ऑर्डरमध्ये घट, बजेट कमी झाले, पण काम सुरू
दुर्गा मूर्तींसाठी प्रसिद्ध कुंभार आळीतही यंदा नुकसानाचा हिशेब लावला जात आहे. अॉस्ट्रेलिया, सिंगापूरसह अनेक देशांत फायबरच्या मूर्ती विकणारे कौशिक घोष यांनी सांगितले की, फेब्रुवारीपर्यंत दोन ऑर्डर मिळाल्या होत्या. एक कॅनडाची आणि दुसरी ऑस्ट्रेलियाची. त्यानंतर आतापर्यंत विदेशातून कुठलीही ऑर्डर मिळालेली नाही. यंदा स्थानिक पंडाललाच मूर्ती पुरवठा करून उदरनिर्वाह सुरू आहे. आम्ही दर वर्षी ३५ मूर्ती तयार करतो, पण यंदा फक्त १५ मूर्तीच तयार केल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.